Tata Altroz 2024 info in Marathi

Tata Altroz 2024 info in Marathi | Tata | Tata Altroz 2024 | Altroz 2024 | Altroz 2023 | Tata Nexon | Tata Punch | Harrier | Tata Safari | Tata Altroz 2024 info in Marathi |

Tata Altroz 2024 info in Marathi : Tata ने नेहमीच आपल्या ग्राहकांचा विचार करून बाजारात एकापेक्षा एक दमदार प्रोडक्ट आणले आहेत. अगदी चहा, कॉफी पासून ते बलाढ्य मशिनरी, ट्रक, बसेस, आर्मी वेहिकल या सगळ्यांमध्येच टाटाने भारतीय नागरिकांची मने जिंकून घेतली आहेत. टाटाच्या प्रोडक्ट बद्दल एक वेगळाच विश्वास सर्व भारतीयांमध्ये आहे. तसेच टाटा मोटर्स ने त्यांच्या वाहनांमध्ये केलेल्या डिझाईन लाईनच्या बदलांमुळे आणि सेफ्टी फीचर्स मुळे कार प्रेमींच्या हृदयात जागा केली आहे. एकापेक्षा एक दमदार कार्स लॉन्च करून ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये आपले स्थान बळकट केले आहे. या व्यतिरिक्त ईव्ही सेक्टर मध्ये देखील अनेक दमदार रेंज देणाऱ्या कार लॉन्च करून ईव्ही सेक्टर मध्ये देखील आपला ठसा उमटवला आहे. Tata Nexon, Tata Punch, Tata Harrier, Tata Safari इत्यादी नव्या कार लॉन्च करून ग्राहकांना परवडणाऱ्या सेफेस्ट कार्स ते अगदी प्रीमियम कार अशा सगळ्या कॅटेगरीतल्या कार लॉन्च केल्या आहेत. आजच्या लेखात आपण टाटा अल्ट्रोज बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

Tata motors नेहमीच ऑटो सेक्टर मध्ये ग्राहकांची पसंती राहिली आहे. अलीकडच्या काळात लॉन्च झालेल्या टाटा च्या कार्स ग्राहकांमध्ये खूप प्रसिद्ध होत आहेत. यामुळे टाटा मोटर्सचा ऑटो सेक्टर मधील आलेख वाढत आहे. अशीच एक टाटाची लोकप्रिय कार टाटा अल्ट्रोज या कारच्या दमदार लुक मुळे आणि यामध्ये मिळणाऱ्या फीचर्स मुळे या कारला लोक खूप पसंत करत आहेत. या लेखात आपण याच कार बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

टाटा अल्ट्रोज ही एक प्रीमियम 5 सीटर हॅचबॅक आहे. तिची किंमत ६ लाख ६० हजार पासून सुरु होऊन याचे टॉप मॉडेल १० लाख ७४ हजार रुपयांपर्यंत जाते. Tata motors, Altroz चे बरेच वेरियंट आपणास ऑफर करते. पेट्रोल, सीएनजी, डिझेल इंजिन पर्याय आपणास मिळतात.

डिझाईन TATA Altroz 2024 info in Marathi

टाटा अल्ट्रोज ही एक स्पोर्ट लुक असलेली एक एक प्रीमियम हॅचबॅक आहे. गोल्ड स्टैंडर्ड Futuristic शार्प डिझाईन, modern exterior आणि ड्युअल टोन रूफ ऑप्शन यामुळे कमालीची सुंदर दिसते. आणि हिचा रोड प्रेझेन्स लोकांना एकदा तरी वळून बघण्यास भाग पाडतो. दमदार लुक सोबत बरेच कलर ऑप्शन यामध्ये मिळतात. सोबतच ड्युअल टोन लेझर कट अलॉय व्हील साईड प्रोफाईल मध्ये भर घालतात.

tata Altroz
tata Altroz

कलर ऑप्शन

डाउनटाउन रेड
अवेन्यू व्हाईट
हार्बर ब्लू
ऑपेरा ब्लू
हाय स्ट्रीट गोल्ड
डिटोना ग्रे

प्लॅटफॉर्म

टाटा अल्ट्रोज ही Agile Light flexible advance architecture (अल्फा एआरसी) एक नवीन प्लॅटफॉर्म अल्ट्रोज साठी डेव्हलप केला गेला आहे, याद्वारे टाटाची सुरक्षाही वाढते आणि एनर्जी ऑब्झर्विंग बॉडी डिझाईन. सुरक्षितते बाबतीत टाटा अल्ट्रोज ला ग्लोबल ncap मध्ये फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे.

टाटा अल्ट्रोज इंजिन

टाटा अल्ट्रोज मध्ये तीन इंजिन पर्याय मिळतात, आपणास पावरफुल इंजिन मिळतं जे १.२ लिटर ३ सिलेंडर नॅचरल एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन, तसेच १.२ लिटर ३ सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन, १.५ लिटर ४ सिलेंडर डिझेल इंजिन मिळते. जे ९० बी.एच.पी. पॉवर आणि २०० एन.एम. टॉर्क प्रोडूस करते. ईया दमदार इंजिन मुळे मायलेज देखील चांगला मिळतो पेट्रोल इंजिन १९.३३ के एम पी एल आणि सीएनजी इंजिन २६.२ चा मायलेज देते.

Altroz फीचर्स

टाटा अल्ट्रोज मध्ये खूप सारे फीचर्स मिळतात. टाटा अल्ट्रोज मध्ये अनेक दमदार आणि आधुनिक फीचर्स दिले आहेत. फ्रंट आणि रियर पावर विंडो, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, हाईट ऍडजेस्टेबल ड्रायव्हर सीट, लेदर स्टेरिंग व्हील, ऍडजेस्टेबल हेडलाईट, रियर डीफॉगर, रेन सेन्सिंग वायपर, पॉवर अँटेना इत्यादी.

Key Features

१६ इंच अलॉय व्हील
एलईडी डी आर एल
डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर
कुल ग्लोव्हबॉक्स
ऑटो हेड लॅम्प
रिव्हर्स कॅमेरा
रेन सेंसिंग वायपर
७ इंच हरमन इन्फोटेंमेंट सिस्टीम
iRA कनेक्टेड कार टेक
आयडियल स्टार्ट – स्टॉप
क्रूज कंट्रोल
बटन स्टार्ट
क्लायमेट कंट्रोल
वायरलेस चार्जर

कनेक्टिव्हिटी

टाटा अल्ट्रोज मध्ये तुम्हाला iRA कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी मिळते. यामुळे गाडी लॉक अनलॉक, हेडलाईट ऑन ऑफ, हॉर्न, DTE (डिस्टन्स टू एमटी चेक) इ. तसेच वेहिकल सिक्युरिटी त्यामध्ये इमर्जन्सी एस.एम.एस., स्टोलन व्हेईकल Tracking, फाइंड माय कार, Panic नोटिफिकेशन, ट्रीप डिटेल, ड्रायव्हिंग स्कोर, इलेक्ट्रिक पॉवर स्टेरिंग स्टेटस, आयडियल अलर्ट, स्पीड अलर्ट, सर्विस, एअर बॅग स्टेटस, नॅचरल व्हाईस टेक, इ. पर्याय मिळतात.

सुरक्षा

टाटा अल्ट्रोज सुरक्षेच्या बाबतीत देखील खूप पुढे आहे. मध्ये सुरक्षे संबंधित अत्याधुनिक दर्जेदार फीचर्स मिळतात. यामध्ये २ एअर बॅग, चाइल्ड लॉक, ओवर स्पीड वॉर्निंग, स्पीड सेन्सिंग डुअर लॉक, इंजिन सेंट्रल लॉकिंग सिस्टीम, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम, एबीएस, एबीडी, बीएससी इत्यादी.

व्हेरियंट आणि किंमत

Petrol

Altroz XE Manual19.33 kmpl6.60 Lakh
Altroz XM Manual19.05 kmpl6.90 Lakh
Altroz XM S Manual19.05 kmpl7.35 Lakh
Altroz XM plus Manual19.33 kmpl7.55 Lakh
Altroz XM plus S Manual19.33 kmpl8 Lakh
Altroz XT Manual19.33 kmpl8.08 Lakh
Altroz XZ Manual19.33 kmpl8.50 Lakh
Altroz XMA + DCT Automatic18.5 kmpl8.55 Lakh
Altroz XMA + S DCT Automatic18.5 kmpl9 Lakh
Altroz XZ+S Manual19.33 kmpl9.04 Lakh
Altroz XTA DCT Automatic18.5 kmpl9.10 Lakh
Altroz XZ Turbo 18.5 kmpl9.10 Lakh
Altroz XZ+S Dark Edition 19.33 kmpl9.44 Lakh
Altroz XZ+ OS19.33 kmpl9.56 Lakh
Altroz XZA DCT Automatic18.5 kmpl9.60 Lakh
Altroz XZ+ S Turbo Manual18.5 kmpl9.64 Lakh
Altroz XZA+ S DTC Automatic18.5 kmpl10 Lakh
Altroz XZA+ S Dark Edition DTC Automatic18.5 kmpl10 Lakh
Altroz XZA+ S18.5 kmpl10.24 Lakh
Altroz XZA+ OS DTC Automatic18.5 kmpl10.56 Lakh

CNG

Altroz XE CNG Manual26.2 km/kg7.55 Lakh
Altroz XM+ CNG Manual26.2 km/kg8.40 Lakh
Altroz XM+ S CNG Manual18.5 km/kg8.85 Lakh
Altroz XZ CNG Manual26.2 km/kg9.53 Lakh
Altroz XZ plus S CNG Manual26.2 km/kg10 Lakh

Diesel

Altroz XM+ Diesel Manual23.64 kmpl8.80 Lakh
Altroz XM+ S Diesel Manual23.64 kmpl9.25 Lakh
Altroz XT Diesel Manual23.64 kmpl9.35 Lakh
Altroz XZ Diesel Manual23.64 kmpl9.85 Lakh
Altroz XZ+S Diesel Manual23.64 kmpl10.39 Lakh

Automatic

Altroz XMA + DCT Automatic18.5 kmpl8.55 Lakh
Altroz XMA + S DCT Automatic18.5 kmpl9 Lakh
Altroz XTA DCT Automatic18.5 kmpl9.10 Lakh
Altroz XZA DCT Automatic18.5 kmpl9.60 Lakh
Altroz XZA+ S DTC Automatic18.5 kmpl10 Lakh
Altroz XZA+ S Dark Edition DTC Automatic18.5 kmpl10 Lakh
Altroz XZA+ OS DTC Automatic18.5 kmpl10.56 Lakh

दशग्रीवा

Amazing TATA HARRIER facelift

Tata Safari Facelift

Maruti Jimny Price 2023

Tata Motors official Website https://www.tatamotors.com

टाटा अल्ट्रोज ची स्पर्धा हुंडाई आय २०, मारुती बलेनो, टोयोटा ग्लांझा, मारुती स्विफ्ट यांच्यासोबत आहे.

तुम्ही जर एका बजेट फ्रेंडली सुरक्षित कारचा विचार करत असाल, तर टाटा अल्ट्रोज हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. टाटा मोटर्स ने अलीकडच्या काळात ४४ लाख पॅसेंजर व्हेईकलचा टप्पा ओलांडला आहे, आतापर्यंत टाटा ४४ लाख कारचे उत्पादन घेतले हा एक अनोखा विक्रम टाटा मोटर्सच्या नावावर आहे.

4 thoughts on “Tata Altroz 2024 info in Marathi”

  1. Many people look forward this car as a dream purchase. The way you explain it is surely help those who really planning and quite confuse about their purchase now.
    Even Tata motors earn profit by your analysis…🤞🏻

  2. Pingback: Foldable iPhone ॲपल देखील लॉन्च करणार जाणून घ्या अपडेट...

  3. Pingback: New Ferrari Purosangue information in Marathi

  4. Pingback: एका चार्ज मध्ये 500 किमी रेंज देणारी Tata Curvv ev

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Vinesh Phogat ने जाहीर केली निवृत्ती Golden boy ने रौप्य पदक जिंकत रचला इतिहास Neeraj Chopra Won Silver Medal मराठमोळ्या Avinash Sable ने रचला इतिहास पण मेडल हुकले. Mumbai’s most famous street food Famous places for Monsoon Trip in India