Tata Curvv ev : भारतीय ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये टाटा मोटर्स हे नाव अग्रगण्य आहे. तसे पाहाल तर भारत ही जगभरातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी ऑटोमोबाईल बाजारपेठ आहे. अनेक कंपन्या आपली अनेक वाहने भारतीय बाजारपेठेत विक्री करतात. अनेक कंपन्यांनी भारतीय बाजारात आपल्या इलेक्ट्रिक कार्स लॉन्च केल्या आहेत. पुरेशा पायाभूत सुविधांच्या अभावी भारतातील लोकांचा या इलेक्ट्रिक वाहनांना संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसतो. अशातच भारतीय कंपनी टाटा मोटर्स अनेक दर्जेदार वाहने भारतीय बाजारपेठेत लॉन्च करत चांगले फीचर्स देत, आपले स्थान या सगळ्या कंपन्यांच्या स्पर्धेमध्ये अग्रगण्य ठेवले आहे. चांगली सुरक्षा आणि उत्तम रेंज देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स लॉन्च करून ग्राहकांना उत्तम समाधान टाटा मोटर्स देत आहे
टाटा मोटर्स मागील आठवड्यात भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक कुपे एसयूव्ही Tata Curvv ev लॉन्च केली आहे. जी एका चार्ज मध्ये 500 किलोमीटर रेंज देण्यास सक्षम आहे. Tata Curvv ev १७ ते २१ लाखांच्या बजेटमध्ये दमदार रेंज देणारी इलेक्ट्रिक कार लॉन्च करून प्रतिस्पर्ध्यांना तगडे आव्हान दिले आहे. टाटा आपल्या ग्राहकांचा विचार करून अगदी बजेट सेगमेंट पासून ते लक्झरी सेगमेंट पर्यंत अनेक कारची विक्री करते. कमी किमतीमध्ये अधिक सुरक्षित आणि आधुनिक डिझाईन सह खिशाला परवडणारी वाहने बनवून टाटा मोटर्सने भारतीय बाजारपेठेत आपला विश्वास संपादन केला आहे.
Tata Curvv ev फीचर्स
Tata Curvv चे इलेक्ट्रिक आणि डिझेल व्हेरिएंट देखील लॉन्च केले जाणार आहे, इलेक्ट्रिक वेरियंट ७ ऑगस्टला टाटा मोटर्सने भारतात लॉन्च केले आहे. लवकरच डिझेल व्हेरिएंट देखील भारतीय बाजारपेठेत आणले जाईल असे टाटा मोटर्स कडून सांगण्यात आले. टाटा कर्व्ह मध्ये अनेक आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत, यामध्ये ADAS लेव्हल टू, क्रूज कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल, ३६० कॅमेरा, रिअर पार्किंग सेन्सर, पॅनारॉमिक सनरूफ, पॉवर ड्रायव्हर सीट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह आधुनिक इंटेरियर ऑफर करण्यात आले आहे. याशिवाय ५०० लिटर बूट स्पेस, पॉवर टेल गेट, मल्टिपल ड्राइव्ह मोड, एअर प्युरिफायर, रेन सेन्सिंग वायपर या एसयूव्हीमध्ये १८ इंच व्हील सह १९० एम एम ग्राउंड क्लिअरन्स, टाटा मोटर्सने भारतात पहिली बजेट कुपे एसयूव्ही भारतीय बाजारात लॉन्च केली आहे, जी अनेक आधुनिक फीचर्स सह चांगली रेंज देते.
Tata Curvv ev मोटार आणि बॅटरी
Tata Curvv ev मध्ये नेक्सॉन पेक्षा जास्त कॅपॅसिटी चा बॅटरी पॅक ऑफर करण्यात आला आहे, यामुळे कर्व्ह ५००-५८५ किमी रेंज प्रदान करते. कर्व्ह मध्ये वेगवेगळ्या व्हेरियंट मध्ये वेगवेगळे बॅटरी पॅक ऑफर केले आहेत ४५ किलोवॅट व्हेरियंट मध्ये 502 किलोमीटर रेंज, तसेच ५५ किलोवॅट व्हेरियंट 585 किमी ड्रायव्हिंग रेंज देते. यामधील इलेक्ट्रिक मोटर १६५ बीएचपी पॉवर आणि २१५ एन एम टॉर्क जनरेट करते.
५ स्टार सुरक्षेसह दमदार हॅचबॅक अवघ्या दहा लाखात
Tata Curvv ev बुकिंग
Tata Curvv ev या दमदार रेंज देणाऱ्या कारच्या बुकिंग साठी ग्राहकांची झुंबड पडलेली पाहायला मिळते, टाटा कर्व्ह चा वेटिंग पिरेड आठ आठवड्यांवर गेला आहे. ४५ किलोवॅट व्हेरियंट साठी ग्राहकांना आठ आठवडे वेटिंग पिरेड आहे. तर ५५ किलोवॅट व्हेरिएंट साठी सहा आठवड्यांचा वेटिंग पिरेड आहे, अगोदर बुकिंग केली होती त्यांना डिलिव्हरी मिळणे सुरू झाले आहे. अधिक माहितीसाठी टाटा मोटर्स च्या वेबसाईटला भेट द्या.
याशिवाय टाटा मोटर्स भारतीय बाजारात टाटा पंच, नेक्सॉन, टियागो, टिगोर इलेक्ट्रिक ईलेक्ट्रिक कारची विक्री करते.
Pingback: Jawa 42 FJ launch जाणून घ्या किंमत आणि फीचर्स