आता सोलर पॅनलवर मिळणार १००% अनुदान Solar Panel Subsidy

Solar Panel Subsidy : देशातील जनतेसाठी राज्य सरकार तसेच केंद्र सरकार विविध कल्याणकारी योजना राबवीत असते. या योजनांचा उद्देश हा संसाधनावर होणारा ताण कमी करणे हा असून या मार्फत लोकहित जपणे हा आहे. महाराष्ट्र राज्यातील वीज निर्मिती आणि वितरण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योजना आणून विज उद्योगावरील भार कमी करण्यासाठी राज्य शासनाने सौर पॅनल योजनेच्या माध्यमातून विजेची तूट भरून काढण्याचा महत्त्वकांक्षी निर्धार केला आहे. या योजने अंतर्गत ज्या गावांमध्ये वीज पोहोचली नाही, अशा गावांमधील घरांना Solar Panel Subsidy १०० % अनुदान देऊन सौर ऊर्जा पॅनल बसवून देण्यात येणार आहे, ही योजना राज्यातील अतिरिक्त विजेच्या मागणीला पूर्ण करण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. महाराष्ट्र शासनाने पुढील पाच वर्षात १७३६० मेगावॅट विज निर्मितीचे लक्ष्य समोर ठेवले आहे. हे लक्ष पूर्ण करण्यासाठी सरकारने दरवर्षी किमान दहा हजार घरांवर सोलर पॅनल बसवण्याचे नियोजन केले आहे. यासाठी भरीव निधीची तरतूद देखील करण्यात आली आहे, जो या योजनेच्या यशस्वी होण्यात वापरण्यात येईल.

 Solar Panel Subsidy
Solar Panel Subsidy

Solar Panel Subsidy ठळक वैशिष्ट्ये

१. लाभार्थी महाराष्ट्रातील ज्या भागात अद्याप वीज पोहोचली नाही किंवा कमी प्रमाणात वीज पुरवठा होतो अशा दुर्गम भागातील घरांना प्राधान्याने या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

२. १००% अनुदान सदर योजनेमार्फत बसविण्यात येणारे सौर पॅनल हे पूर्णतः शासनाच्या खर्चातून बसविण्यात येणार आहे. याचा संपूर्ण खर्च हा सरकार द्वारे केला जाणार असून लाभार्थ्याला या योजनेसाठी कोणताही खर्च किंवा आर्थिक भार सोसावा लागणार नाही.

३. अर्ज सौर पॅनल योजनेची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी शासनामार्फत सदर योजनेसाठी ऑनलाईन (पोर्टल) अर्ज प्रणाली प्रक्रिया सुरू केली आहे. शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन या योजनेसाठी आपण सहज अर्ज करू शकतो.

महत्त्व आणि फायदे

सदर योजनेच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणासाठी नैसर्गिक स्त्रोतांचा मुबलक वापर करून ऊर्जा निर्मितीचे ध्येय साध्य करणे, तसेच कार्बन उत्सर्जन घट करून पर्यावरण पूरक वीज निर्मितीला हातभार लावून विकास साधने.

सदर योजनेच्या मार्फत दुर्गम ग्रामीण भागाचा विकास करून शैक्षणिक आणि आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे प्राथमिक उद्दिष्ट साध्य करणे तसेच लाभार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत करणे.

सोलर पॅनल योजनेच्या मार्फत विज बचत करून दीर्घकालीन गुंतवणूक आणि शाश्वत ऊर्जा स्त्रोताचा वापर करून वीज निर्मिती वर भर देणे.

योजना अंमलबजावणी टप्पे

१. पहिल्या टप्प्यामध्ये लाभार्थ्यांच्या गावांचे सर्वेक्षण करणे.

२. लाभार्थ्यांची योजनेच्या निकष आणि नियमाप्रमाणे पारदर्शक पद्धतीने निवड.

३. अनुभव असलेल्या दिग्गज संस्थामार्फत सोलर पॅनल ची उभारणी करणे.

४. सोलार पॅनल (इन्स्टॉलेशन) नंतर देखभाल, दुरुस्ती व्यवस्था करणे.

Solar Panel Subsidy – अर्ज

१. शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

२. ऑनलाइन अर्ज भरून विचारलेले आवश्यक कागदपत्र अपलोड करा.

३. अर्ज सबमिट करून अर्जाची स्थिती तपासा.

सदर योजनेबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

सोलर पॅनल योजना महाराष्ट्र शासनाने राबवलेली महत्त्वकांक्षी योजना असून याद्वारे राज्यातील वाढती विजेची मागणी पूर्ण करणे तसेच पर्यावरण पूरक शाश्वत विकासाला चालना देणे ही या योजनेची मुख्य उद्दिष्टे असून याद्वारे शाश्वत विकास साधता येईल. Solar Panel Subsidy १०० % अनुदान दिल्याने तळागाळातील सर्वसामान्य या योजनेचा लाभ घेण्यास मदत होईल. महाराष्ट्र मध्ये पीएम सुर्यघर मुफ्त बिजली PM Suryaghar Muft Bijli Yojana योजने साठी अर्ज करून आपणास अनुदानाचा लाभ घेता येतो.

हे देखील वाचा –विहीर अनुदान योजना २०२४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Vinesh Phogat ने जाहीर केली निवृत्ती Golden boy ने रौप्य पदक जिंकत रचला इतिहास Neeraj Chopra Won Silver Medal मराठमोळ्या Avinash Sable ने रचला इतिहास पण मेडल हुकले. Mumbai’s most famous street food Famous places for Monsoon Trip in India