विज्ञान सृजन स्पर्धा २०२४ : राजापूर हायस्कूल व गोडे- दाते कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजापूर च्या वतीने आयोजित केलेल्या विज्ञान सृजन स्पर्धा २०२४ या स्पर्धेत माध्यमिक विद्यालय गोठणे- दोनिवडे शाळेने सहभाग घेऊन वनस्पतीमधील लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक “फुल” हे मॉडेल सादर केले.
विज्ञान सृजन स्पर्धा २०२४
सदर स्पर्धेत तालुक्यातील अनेक शाळांनी सहभाग नोंदवला, या स्पर्धेत माध्यमिक विद्यालय गोठणे – दोनिवडे प्रशालेच्या वनस्पतीमधील लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक “फुल” या मॉडेलला द्वितीय क्रमांकाने गौरवण्यात आले.
मार्गदर्शक विज्ञान शिक्षक श्री. येरुडकर सर व इयत्ता १० वी तील सहभागी विद्यार्थी कु. प्रेरणा हरी फळसमकर, कु. पायल प्रभाकर हातणकर, कु. निशा सीताराम वारंगे, कु. दर्शन पांडुरंग जड्यार, कु. अतुल आत्माराम सौंदाळकर यांना गौरविण्यात आले.
Gothane Doniwade Highschool चे मुख्याध्यापक श्री. रमेश देसाई सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर विज्ञान सृजन स्पर्धा २०२४ स्पर्धेत सहभाग नोंदविण्यात आला होता. या मिळालेल्या यशाचे पंचक्रोशीतील विविध स्तरातून शिक्षक तसेच विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
हे देखील वाचा – सोलर पॅनलवर मिळणार १००% अनुदान