Shevga Recipes : शेवगा ही बाजारपेठेत सहज उपलब्ध होणारी भाजी आहे. आपल्या आरोग्यासाठी आवश्यक प्रथिने, जीवनसत्व या शेवग्याच्या भाजीत आढळतात. भारत हा शेवग्याचा प्रमुख उत्पादक देश आहे, पावसाळ्या व्यतिरिक्त इतर सर्व महिन्यात शेवग्याची भाजी आपणास बाजारपेठेत मिळते, शेवग्याच्या भाजी पासून आपण अनेक पदार्थ बनवू शकतो. त्याच्या पानांची/ शेंगांची देखील भाजी केली जाते. तसेच शेवग्याला आयुर्वेदामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेवग्याच्या बऱ्याचशा भागांचा उपयोग आयुर्वेदात औषध म्हणून केला जातो. या भाजीपासून तयार होणारे वेगवेगळे चविष्ट पदार्थ, भाज्या, सूप यांच्या पाककृती आपण या लेखात पाहणार आहोत.शेवग्याचे आरोग्यासाठी खूप सारे फायदे आहेत. शेवगा ही मोरिंगा Moringa Oleifera प्रजातीतील वनस्पती आहे. जी महाराष्ट्रातील बहुतेक भागांत आढळून येते. शेवग्याच्या भाजीमध्ये विटामिन ए, थायमीन बी १, रीबोफ्लेविन बी २, नियासीन बी ३, विटामिन बी ६, फो बी ९, विटामिन सी इत्यादी जीवनसत्व आढळून येतात. जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात.शेवग्यामध्ये पालक पेक्षा जास्त लोह, दुधा पेक्षा जास्त कॅल्शियम आणि प्रथिन्यांचे भांडार आढळते, शेवग्याच्या भाजीमध्ये मुबलक प्रमाणात खनिजे देखील आढळतात ती पुढील प्रमाणे कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, मॅंगनीज, पोटॅशियम, सोडियम, झिंक, फॉस्फरस. यासोबत अँटिऑक्सिडंट, अँटी एजींग आणि एंटी फंगल गुणधर्म आढळतात.शेवग्याच्या सात्विक भाजीच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, मुतखडा, कोलेस्ट्रॉल, रक्तदाब, पचनक्रिया, सांधेदुखी इ. समस्या वर फायदा होतो, शिवाय त्याच्या पूर्ण तयार झालेल्या बियांपासून खाद्यतेल काढले जातात, तेल काढल्यानंतर त्याचा उर्वरित टाकाऊ भाग खत म्हणून किंवा पाणी शुद्ध करण्यासाठी वापरला जातो.
Shevga Recipes शेवग्याचे पौष्टिक मूल्य प्रति १०० ग्रॅम
ऊर्जा | ६४ कॅलरीज |
कर्बोदके | ८.२८ ग्रॅम |
फायबर | २.० ग्रॅम |
प्रथिने | ९.४० ग्रॅम |
फॅट | १.४० ग्रॅम |
शेवग्याच्या पाल्याची भाजी Shevga Recipes
शेवग्याच्या पाल्याची भाजी ही झटपट होणारी भाजी आहे यासाठी जास्त साहित्य लागत नाही, कमी वेळात तुम्हाला टेस्टी भाजी बनवायची असेल तर शेवग्याच्या पाल्याची भाजी हा एक चांगला पर्याय आहे.
साहित्य
- शेवग्या ची जुडी
- २ मध्यम आकाराचे कांदे
- ४-५ लसूण
- किसलेला ओला नारळ
- २ हिरव्या मिरच्या
- १/२ टेबल स्पून जिरे
- १/२ टेबल स्पून राई
- १/२ टेबल स्पून हिंग
- १ टेबल स्पून तेल
- चवीनुसार मीठ
कृती
- सर्वप्रथम एक ते दोन वेळा स्वच्छ धुऊन घ्या व कापडामध्ये सुकवून घ्या, नंतर पाने व कोवळी भाजी बारीक चिरून घ्या.
- गॅसवर मंद आचेवर कढई ठेवून त्यामध्ये फोडणीसाठी तेल, राई, जिरे, चिमूटभर हिंग आणि कांदा, लसूण घालून कांदा लालसर होईपर्यंत छान परतून घ्या.
- कांदा लसूण लालसर झाल्यानंतर त्यामध्ये चिरलेल्या मिरच्या टाका व बारीक चिरलेला शेवग्याचा पाला घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्या.
- चवीनुसार मीठ टाकून एकजीव करून घ्या.
- त्यावर झाकण घालून ८-१० मिनिटे वाफेवरती शिजू द्या.
- आता त्यामध्ये किसलेले ओले खोबरे टाकून छान असे परतून घ्या.
आणि झटपट अगदी दहा ते पंधरा मिनिटात तयार झालेली भाजी सर्व्ह करा.
वरील भाजीमध्ये मध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार शेंगदाणे कूट/ डाळी ॲड करून अधिक लज्जतदार भाजी बनवू शकता.
शेवग्याची पाने हे देठापासून वेगळी करणे हे वेळखाऊ काम आहे, याच्या पासून वाचण्यासाठी तुम्ही शेवग्याच्या पानाची जुडी ही धुऊन आदल्या दिवशी कापडामध्ये गुंडाळून ठेवल्यास दुसऱ्या दिवशी सगळी पाने देठापासून वेगळी होतात.
शेवग्याचा पराठा Shevga Recipes
साहित्य
- ३-४ शेवग्याच्या शेंगा
- २/५ टेबलस्पून आले लसूण पेस्ट
- १/२ टेबलस्पून हळद
- १ टेबलस्पून मिरची पावडर
- एक कप गव्हाचे पीठ
- १ टेबलस्पून ओवा आणि धने पावडर
- १/३ बेसन
- बारीक चिरलेली हिरवी मिरची
- कोथिंबीर
- चवीनुसार मीठ
कृती
- सर्वप्रथम शेवग्याच्या शेंगा धुवून त्याचे लहान तुकडे करून घ्या.
- एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यात एक चमचा मीठ टाका त्यामध्ये त्या शेंगांचे तुकडे टाकून मध्यम आचेवर शिजण्यास ठेवा.
- दहा ते पंधरा मिनिटानंतर शेंगा शिजतील.
- त्या शेंगा थंड करून घ्या, व चमचा च्या सहाय्याने शेंगांच्या आतील भाग गर एका भांड्यामध्ये काढून घ्या व साले वेगळी करा.
- शेंगांच्या आतील भाग व बिया चांगल्या स्मॅश करून घ्या.
- एका भांड्यामध्ये स्मॅश केलेला शेंगांचा गर घेऊन त्यात मिरची पावडर, चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, बेसन, ओवा आणि धने पावडर, थोडे हिंग टाकून त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून सगळे मिश्रण छान एकजीव करून घ्या.
- या या मिश्रणामध्ये जेवढा गर आहे तेवढी (अंदाजानुसार) कणीक टाकून, कणिक मळून घ्या, कणिक मळताना पाणी कमी पडल्यास शेंगा शिजवलेले पाणी त्यात तुम्ही वापरू शकता.
- अगदी चपाती लाटण्यासाठी जसे पीठ मळतो तसे पीठ मळून घ्या. खूप घट्ट न ठेवता एकदम मऊसूत कणिक मळून घ्या.
- आता सगळे पराठे लाटून घ्या, सगळे पराठे लाटून झाल्यानंतर ते तव्यावरती किंवा पॅन वरती तेल किंवा बटर च्या साह्याने खरपूस भाजून घ्या त्यावरती छान असेच टेक्सचर येईल. पराठा भाजून झाल्यानंतर त्यावर तूप किंवा लोणी घालून ते दही, चटणी, लोणचे किंवा टोमॅटो कॅचप सोबत सर्व्ह करा.
शेंगांची भाजी खाण्यास टाळाटाळ करणाऱ्याना असे पौष्टिक पराठे जरूर द्या.
Rice Flour Ghavan Recipes in Marathi
शेवग्याच्या शेंगांचे सुप
साहित्य
- ३-४ शेवग्याच्या शेंगा
- १ कांदा
- १ टोमॅटो
- २ लसुन पाकळ्या
- १-२ हिरव्या मिरच्या
- चवीनुसार मीठ
- १ टेबलस्पून आमचूर पावडर
- १/२ टेबलस्पून हळद
कृती
- सर्वप्रथम शेवग्याच्या शेंगा धुवून त्याचे लहान तुकडे करून घ्या.
- एका कुकरमध्ये शेवग्याच्या शेंगा, कांदा, लसूण, टोमॅटो, हिरव्या मिरच्या तुकडे करून टाका. व मंद आचेवर ठेवा आणि २ शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्या.
- पाच ते दहा मिनिटात शेवग्याच्या शेंगा छान शिजतात.
- शेंगा, कांदा, टोमॅटो थंड झाल्यावर पाणी वेगळे करून घ्या,
- पुढे शेंगा, कांदा, टोमॅटो मिक्सरला लावून छान अशी पेस्ट तयार करून घ्या. पाणी आवश्यक असल्यास शेंगा शिजवलेले पाणी त्यात तुम्ही वापरू शकता.
- पेस्ट तयार झाल्यावर ही संपूर्ण पेस्ट शेंग शिजवलेल्या पाण्यामध्ये गाळून घ्या शेंगांचा गाळ वेगळा करा.
- गॅस मंद आचेवर ठेवून हे पाणी एका भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये चवीनुसार मीठ, हळद, उपलब्ध असल्यास आमचूर पावडर, मिरचीचा एक तुकडा टाकून छान उकळी काढून घ्या.
- उकळी आल्यानंतर शेवग्याचे सूप सर्व्ह करा.
झटपट तयार होणारे सूप अतिशय चविष्ट असून पौष्टिक देखील आहे. भरपूर कॅल्शियम असलेले हे शेवग्याच्या शेंगांचे सूप नक्की ट्राय करा.
ते देखील वाचा
Palak Paneer Recipe in few minutes