Foldable iPhone : जगभरात तंत्रज्ञानाने केलेली प्रगती पाहता पुढील काळाचा अंदाज बांधणे कठीण होऊन बसलं आहे. संगणक क्षेत्र, दूरसंचार क्षेत्र, विज्ञान, तंत्रज्ञान अशा सगळ्याच क्षेत्रात मजल मारली आहे. टेक्नॉलॉजी च्या मदतीने मानवाने दूरसंचार क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवून संपूर्ण जग हे जवळ आणले आहे. एका क्लिकवर जगभरातील कोणतेही ठिकाण आपण घरबसल्या पाहू शकतो. आज आपण फोल्डेबल आयफोन बद्दल जाणून घेणार आहोत. फोल्डेबल आयफोन बाबत आलेले अपडेट या लेखात आपण पाहणार आहोत.
Foldable iPhone ॲपल देखील फोल्डेबल फोन लॉन्च करणार
आयफोनची क्रेझ ही अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आहे. आयफोन म्हटलं की स्टेटस, दर्जा किंवा रॉयलपणा म्हणा. तशा इतरही कंपन्या काही कमी नाहीत, आयफोनला तोडीस तोड देणाऱ्या गुगल पिक्सल, सॅमसंग अशा अनेक कंपन्या आहेत. पण आय फोनची गोष्टच वेगळी आहे. सध्या बाजारात मोटरोला, सॅमसंग अशा अनेक कंपन्या आपले फोल्डेबल फोन मार्केटमध्ये लॉन्च करत आहे. सॅमसंग या बाबतीत सगळ्यात वरचढ आहे. मग ते फीचर्स असो किंवा फोल्डेबल फोनचा डिस्प्ले. मोटरोला कंपनीने देखील आपले दर्जेदार फोन लॉन्च करून भारतीय बाजारपेठेत चांगले कमबॅक केले आहे. फोल्डेबल फोनच्या बाबतीत सॅमसंगचे नाव सगळ्यात अगोदर येते, सॅमसंग ने बाजारात आणलेले फोल्डेबल फोन लोकांच्या पसंतीस उतरत आहेत, सॅमसंग पाठोपाठ इतरही कंपन्या आपला फोल्डेबल फोन लॉन्च करत आहे. या स्पर्धेमध्ये आता ॲपल कंपनी देखील उतरली आहे. रिपोर्टनुसार ॲपल सॅमसंगला टक्कर देण्यासाठी आपला फोल्डेबल फोन लवकरच भारतीय बाजारपेठेत लॉंच करू शकते. यामुळे भारतीय बाजारपेठेत सर्वांना आता ॲपलच्या फोल्डेबल फोनची प्रतीक्षा आहे.
रिपोर्टनुसार ॲपल 2018 पासून फोल्डेबल प्रोटोटाईप वर काम करत आहे, आणि ॲपल नेहमीच मार्केटमध्ये नवीन काहीतरी भन्नाट घेऊन येत असते. जसे हल्लीच लॉन्च केलेले Apple Vision Pro आपण पाहिले असेल, या आगामी फोल्डेबल फोन मध्ये सॉफ्टवेअरच्या बाबतीत iOS नवीन आवृत्ती आणू शकते. फोल्डेबल फोन मध्ये यूएसबी टाइप सी पोर्ट मिळण्याची शक्यता आहे यासोबतच टच आयडी आणि फेस लॉक देखील मिळेल, प्रोसेसर बाबत फारशी माहिती नाही पण iphone 15 सारखा दमदार प्रोसेसर ॲपल ऑफर करू शकते. 7.5 inch-8 inch डिस्प्लेसह फ्लिप डिझाईन सह मॅगसेफ सपोर्ट, याची किंमत सुमारे दोन हजार डॉलर रुपयाच्या आसपास असू शकते. ॲपल डिस्प्ले साठी सिल्वर नॅनो वायर टच सोल्युशन चा वापर करू शकते. तसेच या फोनच्या किमती बाबतही ॲपल कडून अधिकृत कोणतेही अपडेट आलेले नाहीत. परंतु काही रिपोर्ट नुसार असे म्हटले जात आहे की या फोल्डेबल आयफोन चे लॉन्चिंग ही 2026 च्या आसपास होऊ शकते. आगामी फोल्डेबल आयफोन सॅमसंग गॅलेक्सी फ्लिप डिवाइस प्रमाणे क्लॅमशेल डिझाईन मध्ये येण्याची अपेक्षा आहे.
बाजारातील इतर फोल्डेबल फोनच्या किमती लक्षात घेता फोल्डेबल आयफोन ची किंमत iPhone 15, iPhone 15 pro पेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.
असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या कोकण कल्चर पेजला नक्की फॉलो करा, तसेच वरील लेख कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा.
हे देखील वाचा