Maruti Suzuki Swift 2024 info in marathi

Maruti Suzuki Swift 2024 : सर्व भारतीय ग्राहकांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण करणारी एक लोकप्रिय कार म्हणजे सुजुकी स्विफ्ट. या गाडीने आपल्या आकर्षक डिझाइन, उच्च कार्यक्षमता आणि अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह भारतीय बाजारात विक्रीमध्ये देखील आपले स्थान पुन्हा सिद्ध केले आहे. नवीन सुजुकी स्विफ्टच्या नव्या जनरेशन बाबत संपूर्ण माहिती या लेखामध्ये पाहू. मारुती सुझुकी ने भारतीयांच्या गरजांचा विचार करून आजपर्यंत अनेक वाहने भारतीय बाजारपेठेत उतरवली आणि भारतीयांनी देखील या परवडणाऱ्या आणि किफायतशीर किमतीमध्ये उपलब्ध असणाऱ्या कार्सना भरभरून प्रेम दिले. मारुती ८००, अल्टो, झेन, स्विफ्ट, स्विफ्ट डिझायर, बलेनो, विटारा ब्रेझ्झा इ. कार भारतीय रस्त्यांवर धावतात. तसं पाहिलं तर भारतीय रस्त्यांवर धावणाऱ्या दर दहा कार मध्ये चार ते पाच कार या सुझुकीच्या असतात, यावरून यांची लोकप्रियता लक्षात येते.

Maruti Suzuki Swift 2024
Maruti Suzuki Swift 2024

Maruti Suzuki Swift 2024

Maruti Suzuki Swift 2024 मध्ये मध्ये फ्युचरिस्टिक आणि स्पोर्टी लूक देण्यात आला आहे, पुढील बाजूस आपणास संपूर्ण एलईडी सेटअप मिळतो. त्यामध्ये एलईडी हेडलाईट, एलईडी डी आर एल (डे-टाइम रनिंग लाइट्स) मागे एलईडी टेल लॅम्प यामुळे गाडीला एक आकर्षक लूक मिळतो. तसेच नवीन स्विफ्ट मध्ये फार असे मोठे बदल करण्यात आले नाही, या अगोदरची जनरेशन आणि आत्ताची जनरेशन यामध्ये थोडाफार कॉस्मेटिक बदल करण्यात आला आहे. आणि अंतर्गत बदल हे फ्युल एफिशियन्सी वाढवण्यासाठी करण्यात आले आहेत असे कंपनीकडून सांगण्यात आले.

Maruti Suzuki Swift 2024 – लुक आणि नवीन बदल

नवीन सुजुकी स्विफ्टची डिझाइन ही आधुनिक, आकर्षक आणि स्पोर्टी आहे. गाडीच्या पुढील बाजूस एलईडी हेडलाइट्स आणि डीआरएल (डे-टाइम रनिंग लाइट्स) यांची जोड आहे, ज्यामुळे गाडीला एक आकर्षक लूक मिळतो. गाडीच्या मागील बाजूस नवीन एलईडी टेल लाइट्स, १५-इंच अलॉय व्हील्स, १६३ एमएम ग्राउंड क्लिअरन्स मिळतो. Suzuki Swift चे अनेक वेरियंट्स सुजुकीने लॉन्च केले आहेत, अनेक कलर पर्यायांमुळे गाडीचा लूक अधिक स्टायलिश आणि आकर्षक दिसतो. आणि या गाडीची इंधन क्षमता ३७ लिटर असून उत्तम ड्रायव्हिंग रेंज प्रधान करते.

बजाज ने लॉन्च केली जगातील पहिली सीएनजी बाईक

Maruti Suzuki Swift 2024
Maruti Suzuki Swift 2024

Maruti Suzuki Swift 2024 – फीचर्स

गाडीच्या आतील भागात उच्च दर्जाच्या मटेरियलचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे गाडीच्या इंटिरियर्सला चांगली फिट अँड फिनिश मिळते. नवीन सुजुकी स्विफ्टमध्ये एक ७-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम आहे, ज्यामध्ये अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले यासह ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, युएसबी पोर्ट, ऑडिओ कंट्रोल्स, आणि व्हॉईस कमांड यांसारखे अनेक अत्याधुनिक फीचर्स मिळतात.

Mahindra XUV 3XO झाली लॉन्च, मिळणार तगडे फीचर्स

इंजिन

नवीन सुजुकी स्विफ्टमध्ये Z12E प्रकारचे १.२ लीटर पेट्रोल इंजिन मिळते जे ८०.४६ बीएचपी पॉवर आणि १११.७ एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ५-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही पर्यायासह उपलब्ध आहे. हे दमदार इंजिन २५ किमी/लीटर मायलेज देण्यास सक्षम आहे.

Maruti Suzuki Swift 2024
Maruti Suzuki Swift 2024
इंजिन११९७ सीसी
पॉवर८०.४६ बीएचपी
टॉर्क१११.७ एनएम
ट्रान्समिशनमॅन्युअल / ऑटोमॅटिक
मायलेज२४.८-२५.७५ kmpl
इंधनपेट्रोल

सुरक्षा आणि कंफर्ट

सुरक्षा वैशिष्ट्ये या गाडीची ग्लोबल NCAP चाचणी रेटिंग बाबत कळू शकले नाही, सुरक्षितता ही महत्त्वाची बाब आहे आणि नवीन सुजुकी स्विफ्ट यामध्ये कोणतीही तडजोड केलेली नाही. या गाडीमध्ये ड्युअल एअरबॅग्स, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (एबीएस) विथ इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्यूशन (ईबीडी), ब्रेक असिस्ट, सीट बेल्ट प्री-टेन्शनर्स, आणि आयसोफिक्स चाइल्ड सीट माउंट्स यांसारख्या अत्याधुनिक सुरक्षितते वर भर दिला आहे.

नवीन सुजुकी स्विफ्टच्या आरामदायीतेवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. गाडीमध्ये आरामदायी सीट्स, भरपूर लेगरूम आणि हेडरूम यांची सोय आहे. याशिवाय, स्विफ्टमध्ये ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, रिअर पार्किंग कॅमेरा, की-लेस एंट्री, आणि पुश स्टार्ट/स्टॉप बटन यांसारखे फिचर्स दिले आहेत.

मोबाईल बनवणाऱ्या कंपनीने बनवली इलेक्ट्रिक कार

कनेक्टिव्हिटी

नवीन सुजुकी स्विफ्टमध्ये ७-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम आहे, ज्यामध्ये अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले यांची सुविधा आहे. याशिवाय, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, युएसबी पोर्ट, ऑडिओ कंट्रोल्स आणि व्हॉईस कमांड यांसारखे अनेक फीचर्स आहेत. यामुळे चालक आणि प्रवाशांना सहजरित्या कनेक्टिव्हिटी आणि मनोरंजनाची सुविधा मिळते. आणि तुमचा प्रवास आरामदायी होतो. प्रगत ड्रायव्हिंग अनुभव
नवीन सुजुकी स्विफ्टमध्ये चांगल्या ड्रायव्हिंग अनुभवासाठी आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. हिल होल्ड कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ईएसपी), आणि क्रूझ कंट्रोल यांसारखे फीचर्स आहेत, ज्यामुळे गाडी चालवणे अधिक आरामदाई आणि सुरक्षित होते.

मायलेज

नवीन सुजुकी स्विफ्टची इंधन कार्यक्षमता अगोदरपासूनच उत्तम आहे आणि आता केलेल्या अंतर्गत बदलांमुळे आणि प्लास्टिक च्या वापरामुळे गाडीचे वजन हे 875 किलोग्रॅम आहे यामुळे पावर टू वेट रेशो उत्तम आहे. गाडीच्या पेट्रोल व्हेरिएंट्सचे मायलेज २३.२० किमी/लीटर आहे, जे इंधनाच्या किंमतींच्या वाढत्या काळात आर्थिक दृष्ट्या किफायतशीर ठरते. यामुळे स्विफ्ट हे एक आर्थिक दृष्ट्या संतुलित वाहन आहे.

रेंज रोवर सारखे फीचर्स आता टाटा हॅरिअर मध्ये

कलर पर्याय

नवीन सुजुकी स्विफ्ट अनेक आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये रेड, ब्लू, व्हाइट, सिल्वर, ग्रे, आणि ब्लॅक यांचा समावेश आहे. या विविध रंगांमुळे ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार रंग निवडण्याची सुविधा मिळते.

मेंटेनन्स आणि सर्विस

सुझुकी भारतीय बाजारात बराच वर्षापासून असल्याने यांची सर्विस संपूर्ण भारतभर उत्तम आहे, सुजुकी स्विफ्टची सेवा आणि देखभाल सोपी आणि कमी खर्चिक आहे. सुजुकीच्या भारतभर पसरलेल्या सेवा केंद्रांच्या जाळ्यामुळे ग्राहकांना सहजगत्या सेवा सुविधा मिळतात. आणि पार्ट्स देखील सहज उपलब्ध होतात, ग्राहकांना वाहन खरेदी केल्यानंतर चांगली सेवा सुविधा मिळते.

किंमत आणि वेरिएंट्स

नवीन सुजुकी स्विफ्ट अनेक वेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे, ज्यामुळे ग्राहकांना आपल्या बजेटनुसार आणि गरजेनुसार वेरिएंट निवडता येतो. स्विफ्ट ६.४९ लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होऊन तिचे टॉप एरिएंट हे ९.६४ लाख रुपये (एक्स-शोरूम) रुपयांपर्यंत जाते.

व्हेरियंटकिंमत (एक्स शोरूम)
Swift LXi रुपये ६.४९ लाख
Swift VXiरुपये ७.२९ लाख
Swift VXi Optरुपये ७.५७ लाख
Swift VXi AMTरुपये ७.७९ लाख
Swift VXi Opt AMTरुपये ८.०६ लाख
Swift ZXiरुपये ८.२९ लाख
Swift ZXi AMTरुपये ८.७९ लाख
Swift ZXi Plusरुपये ८.९९ लाख
Swift ZXi Plus DTरुपये ९.१४ लाख
Swift ZXi Plus AMTरुपये ९.४९ लाख
Swift ZXi Plus AMT DTरुपये ९.६४ लाख

नवीन सुजुकी स्विफ्ट ही एक अत्याधुनिक, स्टायलिश आणि परवडणारी कार आहे. याची डिझाइन आणि इंधन कार्यक्षमता या सर्व बाबी विचारात घेता, ही गाडी भारतीय बाजारात एक उत्तम पर्याय आहे.

असेच नवनवीन ऑटो अपडेट मिळवण्यासाठी कोकण कल्चर ला नक्की फॉलो करा तसेच सदर लेख कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा.

Maruti Suzuki Official website Click here

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Vinesh Phogat ने जाहीर केली निवृत्ती Golden boy ने रौप्य पदक जिंकत रचला इतिहास Neeraj Chopra Won Silver Medal मराठमोळ्या Avinash Sable ने रचला इतिहास पण मेडल हुकले. Mumbai’s most famous street food Famous places for Monsoon Trip in India