Jawa 42 FJ launch जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Jawa 42 FJ launch : भारतीय बाजारपेठेत बऱ्याच वर्षानंतर कमबॅक करणाऱ्या Jawa कंपनीने भारतीय बाजारपेठेत आपल्या रेट्रो डिझाईन आणि आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेल्या बाईक लॉन्च करून क्लासिक लुक पसंत असणाऱ्या लोकांसाठी एक चांगला पर्याय उपलब्ध करून दिला. भारतीय बाजारपेठेत सध्या जावा कंपनीच्या Jawa 42 Bobber, Jawa 42, Jawa Parek, Jawa 350 या दुचाकींची विक्री करते. आणि आता त्यात Jawa 42 FJ ची भर पडली आहे.

Jawa 42 FJ launch
Jawa 42 FJ launch

भारतात Jawa 42 FJ launch ३ सप्टेंबर २०२४ रोजी झाली असून तिची सुरुवातीची किंमत १,९९,१४२ एक्स शोरूम इतकी आहे. नवीन तंत्रज्ञानासह अपडेटेड वर्जन कंपनीने लॉन्च केले आहे. नवीन जावा ४२ सिरीज मध्ये एक स्पोर्टी आणि अधिक पावरफुल दुचाकीची भर पडली आहे असा कंपनीचा दावा केला आहे.

Jawa 42 FJ हा एक नवीन पर्याय बाजारात उपलब्ध झाला आहे. दिवाळीपूर्वी बाईक खरेदी करणाऱ्यांसाठी ही एक चांगली संधी आहे.

Jawa 42 FJ launch
Jawa 42 FJ launch

हे देखील वाचा – एका चार्ज मध्ये 500 किलोमीटर रेंज देणारी टाटा कंपनीची कार

Jawa 42 FJ launch- features

Jawa 42 FJ मध्ये तुम्हाला एक रेट्रो डिझाईन मिळते जी तुम्हाला एक क्लासिक लूक प्रदान करते. यामध्ये टीआर ड्रॉप प्रमाणे फ्युल टॅंक मिळतो त्यावरती क्रोम पॅनलवर जावाची ब्रॅण्डिंग उठून दिसते. तसेच यामध्ये आयकॉनिक जावा टेल लाईट सह साईड पॅनल आणि फ्रेंडस हे अगोदरच्या जावा प्रमाणेच आहेत. त्यामध्ये तुम्हाला स्पोर्टी मल्टी स्पोक आलॉय व्हील मिळतात तर बेस्ट मॉडेलमध्ये वायर्स स्पोक येतात.

या नवीन बाईक मध्ये तुम्हाला एलईडी लाईट मिळतात, यासह यूएसबी चार्जिंग पोर्ट डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर ऑफर करण्यात आला आहे.

उत्तम रायडिंग अनुभवासाठी पुढील बाजूला 41mm चे टेलिस्कोपिक फोर्क आणि मग बिल बाजूस ट्वीन शॉक ऑफर करण्यात आले आहेत. तसेच ड्युअल चॅनल एबीएस सह सुरक्षित ब्रेकिंग प्रदान करते.

Jawa 42 FJ launch
Jawa 42 FJ launch

इंजिन स्पेसिफिकेशन

या Jawa 42 FJ नवीन बाईक मध्ये ३३४ सीसी चे लिक्विड कुल्ड इंजिन मिळते जे २८.७ बीएचपी पावर आणि २९.६२ एन एम टॉर्क जनरेट करते. सहा स्पीड गिअर बॉक्स हे इंजिन टुरिंग साठी विकसित करण्यात आलेले आहे.

Jawa 42 FJ ही पाच रंगांमध्ये उपलब्ध असून या दुचाकीची बुकिंग सुरू झाली असून लवकरच डिलिव्हरी देखील सुरू होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Vinesh Phogat ने जाहीर केली निवृत्ती Golden boy ने रौप्य पदक जिंकत रचला इतिहास Neeraj Chopra Won Silver Medal मराठमोळ्या Avinash Sable ने रचला इतिहास पण मेडल हुकले. Mumbai’s most famous street food Famous places for Monsoon Trip in India