Apple Vision Pro जगभरात तंत्रज्ञानाने केलेली प्रगती पाहता पुढील काळाचा अंदाज बांधणे, अगदी कठीण होऊन बसलं आहे. येणाऱ्या काही वर्षात संपूर्ण जग हे आधुनिक तंत्रज्ञानाने व्यापून जाणार आहे. संगणक क्षेत्र, दूरसंचार क्षेत्र, विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती अशा सगळ्याच क्षेत्रात विज्ञान तंत्रज्ञानाने मजल मारली आहे. झालेली क्रांती, अतिशय विलोभनीय आहे. टेक्नॉलॉजी च्या मदतीने मानवाने जीवनात अमुलाग्र बदल घडवले आहेत. आज आपण अशाच एका आधुनिक डिवाइस बद्दल जाणून घेणार आहोत. मित्रांनो सदर लेख तुम्हास कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा.
आपण सध्या पाहत आहोत ए आय AI नी केलेली प्रगती आर्टिफिशियल इंटेलिजन्स द्वारे मानवाने साधलेली उत्क्रांती, यासोबतच वर्चुअल रियालिटी मध्ये देखील आधुनिक अपडेट येत आहेत. व्ही आर संबंधित ॲपल ने हल्लीच लॉन्च केलेल्या Apple Vision Pro या डिवाइस बद्दल खूप चर्चा होत आहे. भारतात Apple Vision Pro ची किंमत किती असेल, या डिवाइस चे फीचर्स यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, ॲपल व्हिजन प्रो सोबत आपण घरबसल्या काय काय करू शकतो आपण ॲपल व्हिजन प्रो ची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
Apple Vision Pro साधारण माहिती
डिस्प्ले | २३ मिलियन पिक्सल मायक्रो ओलेड थ्रीडी डिस्प्ले, फ्रेश रेट ९० Hz, ९६Hz, १०० Hz. |
व्हिडिओ | २४fps, ३०fps, १०८०p Vision OS |
प्रोसेसर | Apple M2 एप्पल R1 ड्युअल चीप |
स्टोरेज | २५६/५१२ जी.बी. / १ टी.बी. |
सेन्सर्स | 2x High Resolution कॅमेरा, 6x World Facing Tracking, 4x Eye Tracking Camera True Depth Camera, LiDAR Scanner, 4x IMUs |
कनेक्टिव्हिटी | वायफाय ६ |
वजन | ६५० ग्राम |
स्टँडबाय टाईम | दोन तास |
Apple Vision Pro डिस्प्ले
Apple Vision Pro ची खास गोष्ट म्हणजे futuristic डिवाइस चा डिस्प्ले. यामध्ये दोन्ही डोळ्यांसाठी 4K डिस्प्ले देण्यात आले आहेत. २३ मिलियन पिक्सल ची स्क्रीन देण्यात आली आहे. सोबत यामध्ये १२ कॅमेरे देण्यात आले आहेत जे आपल्या हातांच्या हालचाली, आणि डोळे/नजर देखील ट्रॅक करतात. यावर वापरकर्ते चित्रपट पाहू शकतील, संगीत ऐकू शकतील, ब्राउझ करणे, थ्रीडी सादरीकरण पाहणे इ. अनेक कामे करु शकतात.
Apple Vision Pro प्रोसेसर
यामध्ये ॲपल मॅकबुक मध्ये मिळणारा प्रोसेसर एम टू सोबत अजून एक चिप सेट आर वन येतो. अनेक कॅमेऱ्यांचे इनपुट मिळून येणारा डेटा प्रोसेस करण्यासाठी आर वन प्रोसेसर मदत करतो.
Apple Vision Pro किंमत
ॲपल कंपनीने लॉन्च केलेले हे futuristic डिवाइस AR आणि VR मदतीने विकसित केले गेले आहे. यामुळे लॅपटॉप मोबाईल न वापरता तीच कामे या डिवाइस च्या माध्यमातून आपण करू शकतो. गेम खेळणे, पिक्चर पाहणे, मल्टी टास्किंग इत्यादी वर्चुअल रियालिटी च्या माध्यमातून अनुभवू शकतो.
ॲपल कंपनीने यूएस मध्ये ३५०० डॉलर किमतीला लॉन्च केले आहे. भारतात अजूनही हे लॉन्च झालेले नाही. भारतात विक्रीसाठी कधी उपलब्ध होईल याविषयी ॲपल ने कोणतेही भाष्य केलेले नाही. भारतात लॉन्च झाल्यास Apple Vision Pro ची साधारण किंमत ही २.८० लाख ते ३.०० लाख रूपये असू शकते.
या डिवाइस सोबत तुम्ही मल्टी टास्किंग खूप चांगल्या प्रकारे करू शकता.
Apple Vision Pro बॉक्स कंटेंट
त्यासोबत मिळणारा बॉक्स आकाराने बऱ्यापैकी मोठा असून यामध्ये ॲपल व्हिजन प्रो, सोलो नीट बँड, लुप बँड, यूएसबी टाइप सी केबल, ॲडाप्टर, बॅटरी, लाईट सील कुशन, कवर, पॉलिश क्लॉथ इ.
Apple Vision Pro ऑपरेटिंग सिस्टीम
वरील डिव्हाइस साठी ॲपल ने स्वतंत्र अशी व्हिजन ओ.एस. डेव्हलप केली आहे. जी ios (आय.ओ.एस. )आणि mac os (मॅक ओ.एस.) या दोन ऑपरेटिंग सिस्टीम मिळून नवीन व्हिजन ओएस विकसित केली आहे. ॲपल ने बाजारात आणलेल्या या फ्युचरिस्टिक डिवाइस मुळे तंत्रज्ञान क्षेत्रात अमुलाग्र बदल घडणार आहे.
Xiaomi Pad 6 Best Android Tablet
Pingback: फ्रांस मध्ये आता युपीआय ने पेमेंट शक्य UPI Launch in France
Pingback: Foldable iPhone