AICTE Internship info in Marathi : All India Council for Technical Education
2025 पर्यंत एक कोटी इंटर्नशीप संधी उपलब्ध करून देण्याच्या मोहिमेचा भाग म्हणून या इंटर्नशिप सुरू करण्यात आल्या आहेत. देशातील तरुणांना चांगले भविष्य देण्यासाठी ही इंटर्नशिप खूप महत्त्वाची ठरणार आहे. याची सुरुवात ही ए.आय.सी.टी.इ. ने 25 ऑगस्ट 2021 पासून सुरू केली आहे. या इंटर्नशिपमुळे देशभरातील विद्यार्थी आणि कंपन्या या दोघांनाही यांचा लाभ होणार आहे विविध राज्य आणि शहरांमधील बऱ्याच विद्यार्थ्यांना AICTE Internship ची संधी उपलब्ध होणार आहे. संधीचा लाभ घेण्यासाठी व अर्ज करण्यासाठी स्वतंत्र असे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी इंटर्नशिप पोर्टलला भेट देऊन त्यावर नोंदणी करावी लागेल. तुम्ही अधिकृत संकेतस्थळावरून या संधीचा लाभ घेऊ शकता.
AICTE Internship info in Marathi : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) ची संपूर्ण माहिती
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) ही भारतातील तंत्रशिक्षणाचे नियमन करणारी प्रमुख केंद्रीय संस्था आहे. जी १९४५ मध्ये स्थापन करण्यात आली, AICTE तंत्रशिक्षणाच्या गुणवत्ता आणि प्रमाणिकतेसाठी कार्यरत आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे (AICTE) मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) ची मुख्य भूमिका तंत्रशिक्षण संस्थांची मान्यता आणि त्यांच्या अभ्यास क्रमांच्या गुणवत्तेचा तपास करणे आहे.
3 Easy Way to Earn Money Online
उद्दिष्टे आणि कार्ये AICTE Internship info in Marathi
नियमन: तंत्रशिक्षण देणाऱ्या संस्थांची मान्यता, पाठ्यक्रमाची रचना, आणि गुणवत्ता नियंत्रण हे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे मुख्य कार्य आहे.
धोरण : तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रात देशात नवीन शैक्षणिक धोरणे तयार करुन त्यांची अंमलबजावणी करणे हे या परिषदेची मुख्य उद्दिष्ट आहे.
संस्थांची मान्यता : भारतातील तंत्रशिक्षण देणाऱ्या संस्था AICTE कडून मान्यता प्राप्त करण्यासाठी अर्ज करतात. AICTE त्यांच्या सुविधांची, शिक्षकांची, शिक्षणाची गुणवत्ता, आणि शैक्षणिक कार्यक्रमांची तपासणी करून मान्यता देते.
शोध आणि विकास : तंत्रशिक्षण क्षेत्रातील शोध आणि विकास कार्यांना प्रोत्साहन देऊन आर्थिक मदत पुरवण्याचे कार्य ही परिषद करते.
शिष्यवृत्ती व अनुदाने: हरहुन्नरी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे, तंत्रशिक्षण संस्थांना अनुदाने पुरवणे हे AICTE चे कार्य आहे.
50+ Birthday Wishes for Mother
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे (AICTE) विविध उपक्रम
प्रगती योजना : महिलांना तंत्रशिक्षणात प्रोत्साहन देण्यासाठी प्रगती योजना राबवली जाते. यामध्ये महिलांना आर्थिक सहाय्य आणि शिष्यवृत्ती दिल्या जातात. यामुळे महिला सक्षमीकरणास हातभार लागतो.
सामर्थ्य योजना : अपंग / दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सामर्थ्य योजना राबवली जाते. यामध्ये शैक्षणिक सुविधा आणि आर्थिक सहाय्य दिले जाते.
विकास योजना : विद्यार्थ्यांमध्ये उद्यमशील वृत्ती विकसित करण्यासाठी ही योजना राबवली जाते यामध्ये उद्योग, व्यापार आणि नाविन्यपूर्ण उद्योजकता क्षेत्राबाबत प्रशिक्षण दिले जाते.
नीट (NEAT) योजना : तांत्रिक शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये नवीन तंत्रज्ञान आणि नवीन पद्धतींचा प्रसार करण्यासाठी नीट योजना आहे. यात ऑनलाईन शिक्षण आणि इतर आधुनिक तंत्रज्ञानावर भर दिला आहे.
AICTE ची संरचना
AICTE चे व्यवस्थापन आणि संचलन केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येते असून तिची संरचना :
अध्यक्ष : AICTE चे प्रमुख असतात, यांची नियुक्ति भारत सरकारद्वारे केलेली असते.
सचिव : AICTE चे सचिव म्हणून कार्य करत असतात आणि सर्व प्रशासनिक कामकाजाचे प्रमुख असतात.
प्रादेशिक कार्यालये : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद AICTE चे राज्याच्या विविध भागांमध्ये प्रादेशिक कार्यालये आहेत. यामध्ये प्रत्येक प्रदेशात असणाऱ्या तंत्रशिक्षण संस्थांची तपासणी केली जाते.
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) ही भारतातील तंत्रशिक्षणाचे नियमन करणारी देशातील अग्रगण्य संस्था असून. तिचे उद्दिष्ट तंत्रशिक्षणाची गुणवत्ता सुधारणे, शैक्षणिक धोरणे तयार करणे आणि शोध आणि विकासाला प्रोत्साहन देणे आहे.अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद ही विविध योजनांच्या माध्यमातून AICTE विद्यार्थ्यांना आणि संस्थांना आर्थिक सहाय्य पुरवते, ज्यामुळे तंत्रशिक्षण क्षेत्रात विकास साधता येतो. AICTE चे कार्य देशातील तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रात अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि तिच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण आणि अनुभव मिळतो.
AICTE internship portal Click Here
नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी कोकण कल्चर ला नक्की फॉलो करा तसेच सदर लेख कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा.
हे देखील वाचा
एक विलोभनीय पर्यटन स्थळ जेथे निसर्ग आणि अध्यात्माचे एकत्र दर्शन होते.