Ladki Bahin Portal

Ladki Bahin Portal : महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी सुरू केलेल्या Mukhyamantri Ladki Bahin Yojana या योजनेस जनतेचा भरघोस प्रतिसाद मिळत असून फॉर्म भरणे, बँक खात्याला आधार लिंक करणे, ज्यांचे पासबुक नाही अशांची पासबुक काढण्याची लगबग सगळीकडेच पाहायला मिळत आहे. “येथे लाडकी बहीण योजनेसाठी बँक खाते खोलले जाईल” बँकांनी देखील आपल्या कार्यालयात फ्लेक्स लावलेले पाहायला मिळत आहेत. ज्या महिलांनी अगोदर फॉर्म भरले त्या महिलांचे पैसे खात्यामध्ये जमा झाल्याने उर्वरित महिलांनी देखील फॉर्म भरण्यासाठी सुरू केलेले धावपळ सध्या सगळीकडे दिसत आहे सदर लेखांमध्ये आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यासाठी फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेपासून बँक खाते लिंक आहे की नाही, बँक सीडिंग स्टेटस तपासणे, खात्यामध्ये पैसे आले की नाही ते तपासणे या सगळ्या बाबी या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत.

Mukhymantri Ladki Bahin Yojana या योजनेअंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील महिलांच्या सन्मानार्थ दर महिन्याला पंधराशे रुपये रक्कम शासनामार्फत त्यांना देण्यात येईल, अशी घोषणा महाराष्ट्र शासनाने केली व योजना राबवण्यास सुरुवात देखील केली आहे, त्यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाने नारीशक्ती ॲप मार्फत फॉर्म स्वीकारण्यास सुरुवात केली होती. त्यावर काही महिलांनी फॉर्म भरले देखील पण आता ॲपद्वारे फॉर्म स्वीकारणे बंद केले असून महाराष्ट्र शासनाने एक नवीन पोर्टल “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पोर्टल” सुरू केले असून त्या संकेतस्थळावर पाऊल स्वीकारणे सुरू केले आहे या पोर्टल द्वारे आपण ऑनलाइन फॉर्म भरून या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुमच्याकडे महत्त्वाची आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे.

Ladki Bahin Portal
Ladki Bahin Portal

Ladki Bahin Portal – आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • जन्म जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला
  • रेशन कार्ड / उत्पन्न प्रमाणपत्र
  • हमीपत्र
  • बँक पासबुक
  • लाभार्थ्याचा फोटो

Ladki Bahin Portal – असा करा अर्ज

Ladki Bahin Portal
Ladki Bahin Portal
  • सर्वप्रथम खाली दिलेल्या पोर्टल च्या लिंक वर क्लिक करून पोर्टल ओपन करून घ्या.
  • पोर्टल ओपन केल्यानंतर तुम्हाला पोर्टल वरती – तुम्हाला मुख्यपृष्ठ तसेच योजनेची माहिती आवश्यक कागदपत्रे, पात्रता इत्यादी माहिती मिळेल.
  • आपणास अर्जदार लॉगिन हा पर्याय दिसेल या पर्यायावर क्लिक करा.
  • तुम्ही अगोदरच रजिस्ट्रेशन केले असेल तर मोबाईल नंबर, पासवर्ड आणि कॅपच्या कोड टाकून लॉगिन करून घ्या.
  • तुम्ही रजिस्ट्रेशन केले नसल्यास Create Account क्रिएट अकाउंट या पर्यायावर क्लिक करा.
  • विचारलेली माहिती भरून रजिस्ट्रेशन करून घ्या.
  • रजिस्ट्रेशन झाल्या नंतर मोबाईल नंबर आणि पासवर्ड आणि कॅपच्या कोड टाकून लॉगिन करून घ्या.
  • पुढे तुम्हाला दोन पर्याय दिसतील Application Submitted आणि Mukhyamantri – Ladki bahin Yojana
  • Mukhyamantri – Ladki bahin Yojana या पर्यायावर क्लिक करा.
  • पुढे फॉर्म ओपन होईल त्यामध्ये विचारलेली माहिती Basic Deatils, Address Details, other information भरा.
  • व विचारलेले डॉक्युमेंट अपलोड करा.
  • सर्व माहिती भरून झाल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित वाचून घ्या व आपला फॉर्म सबमिट करा.

Ladki Bahin Portal – असा तपासा अर्जाचा स्टेटस

१. सर्वप्रथम खाली दिलेल्या पोर्टल च्या लिंक वर क्लिक करून पोर्टल ओपन करून घ्या.

२. आपणास अर्जदार लॉगिन हा पर्याय दिसेल या पर्यायावर क्लिक करा.

३. मोबाईल नंबर, पासवर्ड आणि कॅपच्या कोड टाकून लॉगिन करून घ्या.

४. पुढे तुम्हाला दोन पर्याय दिसतील Application Submitted आणि Mukhyamantri – Ladki bahin Yojana

५. Application Submitted या पर्यायावर क्लिक करा.

६. तेथे तुम्हाला तुम्ही केलेला अर्ज दिसेल त्यामध्ये अर्जदाराचे नाव, अर्ज क्रमांक, फोटो आणि अर्ज स्थिती पाहता येईल. नुकताच अर्ज केला असेल तर तुम्हाला Pending असा पर्याय तुमच्या अर्जापुढे दिसेल.

Ladki Bahin Portal – Bank Seeding Status

बऱ्याच जणांची फॉर्म स्थिती पेंडिंग अथवा डिसअप्रूव्ह दिसत आहे. अशा स्थितीत काय करावे हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल यासाठी तुम्ही तुमच्या बँक खात्याचा बँक सीडिंग स्टेटस चेक करून घ्या.

तुमच्या बँक खात्याचा बँक सीडिंग स्टेटस चेक करून घेण्यासाठी https://myaadhaar.uidai.gov.in या आधार पोर्टलला भेट द्या.

Bank Seeding Status

पुढे तुमचा आधार नंबर आणि दिलेला कॅपच्या कोड टाकून प्रोसेस करा तुम्हाला एक ओटीपी येईल तो ओटीपी टाकून लॉगिन करून घ्या.

Bank Seeding Status या पर्यायावर क्लिक करा आणि विचारलेली माहिती भरून प्रोसेस करा.

वरील प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला बँक स्टेटस दिसेल, लिंक असेल तर तुम्हाला तुमचे खाते डिटेल तिथे दिसेल.

तिथे Inactive असे दिसल्यास.

तुम्हाला तुमच्या बँक मध्ये जाऊन लाडकी बहीण योजना – आधार लिंक साठी एक फॉर्म घ्यावा लागेल तो फॉर्म भरून बँकेत सबमिट करा.

दोन दिवसानंतर तुमचा Bank Seeding Status – Active होईल व योजनेचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील.

Ladki Bahin Portal – योजनेचे पैसे जमा झाले की नाही हे कसे तपसावे

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सदर योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होत असल्याने महिलांचीची बरीच गर्दी ही बँकांमध्ये होताना दिसत आहे. पैसे जमा झाले की नाही हे तपासण्यासाठी बऱ्याच महिला बँकांमध्ये रांगा लावत आहेत. काही खेड्यांच्या ठिकाणी महिला पैसे आले का हे पाहण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी फेऱ्या मारत आहेत. या योजनेचे पैसे आले की नाही, हे तपासण्यासाठी आता बँकेत जाण्याची गरज नाही. ते तुम्ही तुमच्या मोबाईल द्वारे देखील चेक करू शकता. आलेल्या एसएमएस द्वारे किंवा बँकेने त्यांच्या ग्राहकांना सुलभ सेवा देण्यासाठी काही क्रमांक देण्यात आले आहेत. त्या क्रमांका वरती मिस कॉल दिल्यानंतर आपणास आपल्या खात्यातील रकमेची माहिती मिळते.

अशा प्रकारे तुम्ही तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेत आहेत की नाही हे तपासू शकता.

Ladki Bahin Portal – महत्त्वाच्या लिंक

Ladki Bahin Portalhttps://ladakibahin.maharashtra.gov.in/
Bank Seeding Statushttps://myaadhaar.uidai.gov.in
Ladki Bahin Yojana – HamipatraClick Here.

अशा प्रकारे योजनांचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी कोकण कल्चर ला नक्की फॉलो करा तसेच सदर योजनेचा फॉर्म भरताना काही अडचण येत असल्यास कमेंट करून कमेंट करून जरूर कळवा.

हे देखील वाचा

शासनाच्या इतर योजना जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Vinesh Phogat ने जाहीर केली निवृत्ती Golden boy ने रौप्य पदक जिंकत रचला इतिहास Neeraj Chopra Won Silver Medal मराठमोळ्या Avinash Sable ने रचला इतिहास पण मेडल हुकले. Mumbai’s most famous street food Famous places for Monsoon Trip in India