Chhava Trailer launch

Chhava Trailer launch

Chhava Trailer launch : अवघा महाराष्ट्र वाट बघत असलेला बहुचर्चित चित्रपट “छावा” चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये विक्की कौशल प्रमुख भूमिकेत असून त्याचा जबरदस्त लुक दिसत आहे. हा चित्रपट ६ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हा ऐतिहासिक चित्रपट आहे. त्यामध्ये प्रमुख भूमिका विक्की कौशल या हरहुन्नरी अभिनेत्याने साकारली आहे.

Chhava चित्रपटाच्या टिझरच्या माध्यमातून विक्की कौशल याचा पहिला लूक समोर आला आहे. शिवाय या ऐतिहासिक चित्रपटाच्या दमदार टिझर मध्ये सुरुवात एकमेकांना भिडणाऱ्या तलवारी आणि घोड्यांच्या टापांचा आवाजाने होते, हजारो सैनिक रक्ताने माखलेले दिसत आहेत. यामध्ये छत्रपती संभाजी महाराज हजारो सैनिकांच्या तुकडी सोबत घनघोर लढाई लढताना दिसत आहेत.

Chhava Trailer launch
Chhava Trailer launch

Chhava Trailer launch- स्टारकास्ट

या बहुप्रतिक्षित छावा चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत अभिनेता विक्की कौशल सोबतच रश्मिका मंदाना ही येसूबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे.

याव्यतिरिक्त अक्षय खन्ना – औरंगजेब, दिव्या दत्त – सोयराबाई, प्रदीप सिंह रावत – येसाजी कंक, संतोष जुवेकर, आशुतोष राणा -सरसेनापती हंबीरराव मोहिते, विनीत कुमार सिंह इत्यादी स्टार कास्ट या चित्रपट आपणास पाहायला मिळणार आहे.

छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या चित्रपटांमध्ये इतिहासातील सुवर्णकाळ पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Chhava Trailer launch

मॅडडॉक फिल्मस् या यूट्यूब चॅनल वर सदर टिझर प्रदर्शित करण्यात आला असून या टिझरला दोन दिवसात १.५ कोटी पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. टिझर मधील ऐतिहासिक लढाईची दृश्ये ही अंगावर रोमांच उभे करणारी आहेत.

chaava teaser

Chhaava या चित्रपटाचे लेखन हे ऋषी वीरमणी यांनी केले असून पटकथा लेखन आणि दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे.

या बहुचर्चित चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. भारतातील जनतेने ऐतिहासिक चित्रपटांना नेहमीच भरभरून प्रेम दिले आहे. आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा जीवनपट मोठ्या पडद्यावर पाहणे ही खास बाब आहे.

असेच नवनवीन मनोरंजनाचे अपडेट जाणून घेण्यासाठी कोकण कल्चर ला नक्की फॉलो करा तसेच सदर लेख कसा वाटला हे देखील कमेंट करून जरूर कळवा.

Jeevanvidya Mission

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

o