Bajaj freedom 125 cng info in Marathi

Bajaj freedom 125 cng info in Marathi
Bajaj freedom 125 cng info in Marathi

Bajaj freedom 125 cng info in Marathi : बजाज ऑटो ने भारतीय बाजारात ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये नेहमी वेगवेगळे प्रयोग करत भारतीयांच्या मनात आपले स्थान पक्के केले आहे. मग ते दुचाकी असो अथवा ऑटो रिक्षा, बजाज ने भारतीयांच्या गरजांचा विचार करून नेहमी अशी आव्हाने स्वीकारून वेगळे प्रयोग केले आहेत. सीएनजी ऑटो रिक्षा नंतर आता भारतीय रस्त्यांवर बजाज द्वारे दुचाकी देखील सीएनजी वर धावणार आहेत. आणि बजाज ने सीएनजी आणि पेट्रोल अशा दोन्ही इंधना वरती धावणारी हायब्रीड बाईक लॉन्च देखील केली आहे जे किफायतशीर किमतीमध्ये भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. पण सध्या फक्त महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये या बाईकची विक्री केली जाणार आहे.
बजाज ऑटो ने भारतीय दुचाकी बाजारात हायब्रीड दुचाकी लॉन्च करून पर्यावरण पूरक व किफायतशीर पर्याय भारतीयांना प्रदान केला आहे. या लेखात, आपण बजाजच्या नवीन सीएनजी बाईक बाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊ.

Bajaj freedom 125 cng info in Marathi

बजाज नेहमीच वेगवेगळे प्रयोग करत आला आहे आणि भारतीयांनी ते स्वीकारले देखील आहेत. बजाज ने तीन चाकी वाहनांमध्ये केलेली क्रांती त्यानंतर सीएनजीचा प्रयोग यांना भारतीयांनी डोक्यावर घेतले, आता बजाजची नवीन लॉन्च सीएनजी बाईक फ्रीडम भारतीय बाजारात एक नवा विक्रम करण्यासाठी तयार आहे. आणि हा जागतिक विक्रम देखील ठरू शकतो, ही दुचाकी किफायतशीर किमतीत, पर्यावरण पूरक आणि अत्याधुनिक टेक्नॉलॉजीने सुसज्ज आहे. सीएनजी (कंप्रेस्ड नॅचरल गॅस) वापरून चालणारी ही बाईक इंधनाचा खर्च कमी करणारी एक किफायतशीर पर्याय प्रदान करते. यामध्ये अनेक नवीन वैशिष्ट्यांमुळे ही बाईक अधिक कार्यक्षम आणि सुरक्षित आहे.

Pulsar 200 ची सक्सेसर म्हणून लॉन्च केली दमदार बाईक

Bajaj freedom 125 cng info in Marathi -लुक आणि सुरक्षा

बजाज फ्रीडम सीएनजी बाईकचा लुक हा फ्युचरीस्टिक असून बिल्ड क्वालिटी ही अतिशय उत्तम आहे यामध्ये चांगले मटेरियल वापरण्यात आले आहे. डिझाइन देखील आधुनिक आहे व त्यावर बजाज ने बरेच काम केलेले पाहायला मिळते. बजाज फ्रीडम मध्ये बिल्ड क्वालिटी आणि फिट अँड फिनिश चांगली आहे. तसेच सीट्स देखील आरामदायी आहे.
सुरक्षितता ही बजाजसाठी महत्त्वाची बाब आहे. बजाजच्या नवीन सीएनजी बाईकमध्ये आधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांचा समावेश आहे, ज्यामुळे चालक आणि प्रवासी सुरक्षित असतात. याशिवाय या बाईकच्या कठीणात कठीण अशा 11 विविध सुरक्षा चाचण्या देखील करण्यात आली आहे. त्यामुळे ही बाईक एक सुरक्षित बाईक म्हणून गणली जाईल.
बजाज फ्रीडम मध्ये कोटी सह एलईडी हेडलाईट, डी आर एल, एलईडी इंडिकेटर्स यासह आलोय व्हील्स या बाईकला एक प्रीमियम लुक देतात.

बजाज ने लॉन्च केली NS ची सक्सेसर NS 400z जाणून घ्या किंमत आणि सगळे अपडेट

इंजिन

Bajaj freedom 125 मध्ये 125 सीसी चे इंजिन येते, जे दमदार मायलेज देण्यास सक्षम आहे. हे इंजिन हायब्रीड असल्याने सीएनजी तसेच पेट्रोल या दोन्ही इंधनावरती चालते यामुळे प्रत्यक्षात इंधन खर्च कमी होण्यास मदत होऊन पर्यावरणालाही हानी पोहोचत नाही. हे १२५ सीसी चे इंजिन ९.३ बीएचपी पॉवर @८००० आरपीएम आणि ९.७ एनएम टॉर्क @ ६००० आरपीएम ला जनरेट करते, जे दैनंदिन वापरासाठी पुरेसे आहे.

Bajaj freedom 125 cng info in Marathi

इंजिन१२५ सीसी
पॉवर९.३ बीएचपी पॉवर @८००० आरपीएम
पार्क९.७ एनएम टॉर्क @ ६००० आरपीएम
Bajaj freedom 125 cng info in Marathi

Bajaj freedom 125 cng info in Marathi – कलर पर्याय

Bajaj freedom 125 मध्ये अनेक कलर पर्याय कंपनीने ऑफर केले आहेत यामध्ये कॅरिबियन ब्ल्यू, इबोनी ब्लॅक ग्रे, प्युटर ग्रे ब्लॅक, रेसिंग रेड, सायबर व्हाईट, प्युटर ग्रे येलो, इबोनी ब्लॅक रेड इ. पर्याय मिळतात.

किंमत आणि व्हेरियंट

Bajaj Freedom 125 ची किंमत पुढील प्रमाणे ही वेगवेगळ्या शहरात वेगवेगळी असू शकते.

व्हेरियंटकिंमत
फ्रीडम ड्रम₹ १,१३,३७०/-
फ्रीडम ड्रम एलईडी₹ १,२४,६६१/-
फ्रीडम डिस्क एलईडी₹ १,३०,३०७/-
Bajaj freedom 125 cng info in Marathi

Bajaj Freedom 125 या इंधन दरवाढीच्या काळात एक उत्तम पर्याय म्हणून बजाज ने Bajaj Freedom 125 लॉन्च केली आहे. जीचे अनावरण हे खुद्द नितीन गडकरी सर (मंत्री केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग) यांच्या हस्ते झाले. सध्या या दुचाकीची विक्री ही भारतातील दोन राज्यांमध्ये महाराष्ट्र आणि गुजरात मध्येच सुरू झाली आहे आणि लवकरच संपूर्ण भारतभर सुरू होईल. Bajaj Freedom 125 ची थेट स्पर्धा ही हिरो स्प्लेंडर, टीव्हीएस रायडर, होंडा शाईन १२५ यांच्यासोबत असेल. याची बुकिंग देखील सुरू झाली आहे.

असेच नवनवीन ऑटो अपडेट मिळवण्यासाठी कोकण कल्चर ला नक्की फॉलो करा, सदर लेख Bajaj freedom 125 cng info in Marathi कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा.

official website Bajaj Auto Click here

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Vinesh Phogat ने जाहीर केली निवृत्ती Golden boy ने रौप्य पदक जिंकत रचला इतिहास Neeraj Chopra Won Silver Medal मराठमोळ्या Avinash Sable ने रचला इतिहास पण मेडल हुकले. Mumbai’s most famous street food Famous places for Monsoon Trip in India