Pacific Ocean underwater mountain : पृथ्वीतलावर ७१ टक्के समुद्र आणि उर्वरित भूभाग आहे. जगभरातील समुद्र हा अनेक रहस्य आपल्या उराशी बाळगून आहे. कधी कधी ही रहस्य अनपेक्षित पणे नजरेस पडतात किंवा मानवाद्वारे शोधली जातात. समुद्र तळाशी अनेक कित्येक रहस्य अशी आहेत जी अजूनही प्रकाशात आलेली नाहीत. यावर काम करणाऱ्या संस्था याबाबत प्रायोगिक शोध मोहिमा राबवीत असतात व यांचा अभ्यास करत असतात. काही ठिकाणे अशी आहेत की ज्या ठिकाणी माणूस पोहोचू देखील शकत नाही.
आपल्या सर्वांना माहीतच आहे की जगभरातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा ही दुबई मध्ये आहे, तिची उंची ८२८ मीटर की आहे. आता अमेरिकन ओशोनोग्राफर्स यांना समुद्रामध्ये एक मोठा भीम काय पर्वताचा शोध लागला आहे याची उंची एकावर एक असे चार बुर्ज खलिफा ठेवले तरीही कमी पडतील इतकी उंच आहे. अमेरिकन ओशोनोग्राफर्सना समुद्रकिनाऱ्यापासून 1500 किलोमीटरवर प्रशांत महासागरामध्ये एक पर्वत शृंखला आढळून आले आणि या पर्वत शृंखलेचा सगळ्यात उंच भाग 3109 मीटर उंच आहे. या पर्वत श्रुंखलेचा शोध आणि मापन हे Schmidt Ocean Institute, California टीमच्या नेतृत्वात करण्यात आले.या टीमने R/V Falkor too या रिसर्च करणाऱ्या जहाजाच्या मदतीने 28 दिवस या प्रशांत महासागरामध्ये शोध मोहीम राबवली, त्यांनी या जहाजामध्ये लावलेले सोनार सिस्टीमच्या मदतीने या समुद्री पर्वत शृंखलेचा नकाशा विकसित केला. या पर्वत शृंखलेचा परिसर हा 70 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेला आहे. श्मिट ओशन इन्स्टिट्यूट च्या एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर ज्योती का वीरमाणी या म्हणाल्या की सोनार सिस्टीमची ध्वनी तरंगे समुद्रात सोडली जातात, हे तरंग एखाद्या अडथळ्याला आपटून पुन्हा सोनार स्टीम कडे येतात याला लागणारा वेळ आणि मापनसाठी करण्यासाठी लागणारा वेळ समुद्रतळाबाबत बरेच काही सांगून जातो.
Pacific Ocean underwater mountain
महाराष्ट्रातील सर्वात सुंदर धबधबा
ओशोनोग्राफर्स त्यांचा असा अंदाज आहे की समुद्र तळातील बऱ्याचशा गोष्टी अजूनही जगासमोर आलेल्या नाहीत, संपूर्ण जगभरात लहान मोठ्या १ लाखापेक्षा जास्त समुद्र पर्वत शृंखला आहेत. यावर कित्येक प्रकारच्या जीवसृष्टीच्या शृंखला अस्तित्वात असू शकतात. अलीकडे शोधलेला हा समुद्री पर्वत इतर समुद्री पर्वतांपेक्षा बराच मोठा आहे. अंडरवॉटर रोबोटच्या मदतीने टीमने या पर्वताचे स्कॅन केले असता त्यांना अनेक प्रकारच्या जीवसृष्टीचा भांडार येथे मिळाला. तसेच नवीन पांढरा कॅस्पर ऑक्टोपस देखील नजरेस पडला जो या अगोदर कधीही पाहिला गेला नव्हता. इतक्या खोलवर केल्या गेलेल्या या संशोधनात पर्वतासह अनेक जीवसृष्टी चे दर्शन घडले Promachoteuthis नामक कमकुवत स्नायू असलेल्या स्क्वीड ची प्रजात देखील निदर्शनास आली.
Pingback: Shahrukh Khan Net Worth in Marathi