Swatantrya Veer Savarkar movie review in Marathi

Swatantrya Veer Savarkar movie review in Marathi : भारताचा स्वातंत्र्य संग्राम आपण इतिहासाच्या पुस्तकातून वाचला आहे. स्वातंत्र्य लढा आणि वीरांचा उल्लेख आला की या पिढीला गांधी, नेहरू हीच नावे तोंडावर येतात. यांच्या व्यतिरिक्त अनेक असे वीर आहेत की ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन, सर्वस्व या देशासाठी पणाला लावले, पण अशा अनेक वीर स्मृती विस्मरणात गेलेल्या दिसून येतात. याला जबाबदार आपले शैक्षणिक धोरण, पाठ्य पुस्तकातील अभ्यासक्रम इ. होय.

Swatantra Veer  Sawarkar movie review in Marathi

Swatantrya Veer Savarkar movie review in Marathi

मित्रांनो आज आपण स्वातंत्र्यवीर यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाबाबत या लेखांमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

स्वातंत्र्यवीर सावरकर म्हटले की आपल्या समोर उभे राहते ते एक वादग्रस्त ऐतिहासिक व्यक्तिमत्व, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जीवनपट हा आताच्या पिढी पासून वगळण्यात आला किंवा इतर विरोधी गोष्टी मार्फत स्वातंत्र्यवीर सावरकरांना नेहमीच डावलण्यात आले. आताच्या आणि मागील पिढीला फक्त सावरकरांचे नाव ठाऊक आहे, काळ्या पाण्याची शिक्षेविषयी माहित आहे. पण स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्वातंत्र्य संग्रामातील योगदान, क्रांतीकारकांना प्रभावित करण्यामागचा हात, त्यांच्यामध्ये लपलेला साहित्यिक इत्यादी बाबींवर कोणतेही दडपण न ठेवता या चित्रपटामध्ये प्रकाश टाकला आहे. सावरकरांचा ज्वलंत जीवनपट आपणास आता मोठ्या पडद्यावर पाहण्यास मिळणार आहे. अलीकडेच 22 मार्च ला प्रदर्शित झालेला स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट, बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ घालत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटा मार्फत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जीवनपट आणि स्वातंत्र्य संग्रामातील त्याग, “हु किल्ड हिज स्टोरी” या टॅगलाईन खाली रणदीप हुडडा ने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जीवनप्रवास मांडण्याचा प्रयत्न केला आहे. रणदीप हुड्डा यांनी अभिनया सोबतच, निर्मिती आणि दिग्दर्शनाची जबाबदारी ही लीलया पार पाडली आहे.

ट्रेलर Swatantra Veer Savarkar movie review in Marathi

पटकथा Swatantrya Veer Savarkar movie review in Marathi

सुप्रसिद्ध अभिनेता रणदीप हुड्डा यांचा बहुचर्चित स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनपटावर आधारित चित्रपट 22 मार्चला प्रदर्शित झाला. या भूमिके मध्ये जीव ओतण्यासाठी रणदीप हुड्डा यांनी खूप मेहनत घेतली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बहुआयामी व्यक्तिमत्व रणदीप हुड्डा यांनी छान साकारले आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट त्यांच्या बालपणापासून ते आयुष्याच्या अंतिम टप्प्यापर्यंतचा प्रवास दाखवतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांची अखंड भारताची इच्छा, स्वातंत्र्य मिळवायचे तर ते अहिंसेने मिळू शकत नाही असा त्यांचा ठाम विश्वास होता. चित्रपटाची सुरुवात १८ व्या शतकात पसरलेल्या प्लेगच्या साथी पासून सुरू होते. या काळात ब्रिटिश राजवटीमुळे देश गुलाम बनला होता. याच कालखंडात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म झाला. सावरकरांना तरुण पणातच आपल्या वडिलांचा मृत्यू पहावा लागला. पुढे ते क्रांतिकारक म्हणून सक्रिय झाले. जहाल मतवादी लोकमान्य टिळकांशी भेट ते अभिनव भारत या क्रांतीकारी संघटनेची स्थापना. कायद्याच्या शिक्षणासाठी लंडनला रवाना तेथे मदनलाल धिंग्रा, कामा, श्यामजी यांच्याशी ओळखी. लंडनमध्ये ब्रिटिशांविरुद्ध क्रांती, पुढे त्यांना झालेली अटक व बेकायदेशीर रित्या भारतात आणून ठोठावलेली काळापाण्याची शिक्षा. त्यांच्या थोरल्या बंधूंचे योगदान, फ्रान्समधील आश्रयासाठी समुद्रमार्गे पलायनाचा फसलेला प्रयत्न, पुढे अंदमान येथे कारागृहात झालेले अनन्वित अत्याचार पुढे दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान जेल बाहेर पडण्यासाठी, केलेला पत्रव्यवहार अनेक वेळा पत्र व्यवहार करूनही निराशा हाती लागली, पुढे अंदमान मधून रत्नागिरी जेलमध्ये झालेली बदली, याशिवाय अनेक गोष्टींवर हा चित्रपट प्रकाश टाकतो.

बॉक्स ऑफिस कलेक्शन

स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाने चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर आता पर्यंत दमदार कमाई केली. जगभर या चित्रपटाने २५-३० दिवसात जवळपास ३१.२३ कोटीच्या आसपास कमाई केली. लोकांचा चांगला प्रतिसाद देखील या चित्रपटाला मिळत आहे.

या चित्रपटासाठी रणदीप हुड्डा यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पात्रासाठी घेतलेली मेहनत, तरुण सावरकर ते मध्यमवयीन सावरकर वयाच्या अंतरामधील परिवर्तन, आणि व्यक्तिरेखा साकारण्यासाठी घेतलेली मेहनत पडद्यावरती स्पष्टपणे दिसून येते. सावरकरांचे मोठे बंधू यांची भूमिका अमित सियाल यांनी उत्कृष्ट बजावली आहे. सावरकरांच्या पत्नीच्या भूमिकेत अंकिता लोखंडे, मदनलाल धिंग्रा यांच्या भूमिकेत मृणाल दत्त, महात्मा गांधी यांच्या भूमिकेत राजेश खेरा इ. इतर कलाकारांनीही आपली भूमिका छान बजावली आहे. तसेच चित्रपटांमध्ये ऐतिहासिक कालखंडातील १८ व्या शतकातील काळ उत्तमरीत्या दर्शविला आहे.

मित्रांनो असेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे पेज कोकण कल्चर ला नक्की फॉलो करा तसेच सदर लेख कसा वाटला हे देखील कमेंट करून कळवा.

हे देखील वाचा

दशग्रिव्हा

कोकणातील प्रेक्षणीय स्थळे

दर्जेदार पाककृती

ऑटो अपडेट

Swatantrya Veer Savarkar movie review in Marathi

1 thought on “Swatantrya Veer Savarkar movie review in Marathi”

  1. Pingback: Shopsy.in वर खरेदी करा इतर ई-कॉमर्स कंपन्यांपेक्षा कमी किमतीत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Vinesh Phogat ने जाहीर केली निवृत्ती Golden boy ने रौप्य पदक जिंकत रचला इतिहास Neeraj Chopra Won Silver Medal मराठमोळ्या Avinash Sable ने रचला इतिहास पण मेडल हुकले. Mumbai’s most famous street food Famous places for Monsoon Trip in India