Tesla model s Plaid 2023 टेस्ला हे नाव इलेक्ट्रिक व्हेईकल जगतात नवे नव्हे मुळात दर्जेदार आणि जास्त रेंज देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्सची सुरुवातच यांनी केली अस म्हणायला हरकत नाही. सध्या अमेरिकन बाजारात टेस्ला च्या मॉडेल एस, मॉडेल ३, मॉडेल एक्स, मॉडेल वाय या कार्स उपलब्ध आहेत, यासोबत टेस्लाने सायबर ट्रकची देखील बुकिंग सुरु केली आहे. यासोबत टेस्ला सोलर पॅनेल, सोलर रुफ आणि पावर वॉल देखील बनवते.
टेस्ला मोटर्स ने हल्लीच जगातील सगळ्यात वेगवान कार Tesla Model S Plaid अमेरिके मध्ये लाँच केली आहे. ही कार जगातील वेगवान कार असल्याचे सांगण्यात आले आहे. या कारची किंमत १०८,४९० युएस डॉलर आहे, भारतीय रुपयांप्रमाणे ९० लाख रुपये आसपास जाते. ही कार २ सेकंदात १०० किमी प्रतितास कमाल वेगमर्यादा गाठते असा दावा कंपनी कडून करण्यात आला आहे. टेस्ला कंपनी कडून लाँच होण्यापूर्वीच या कारची किंमत वाढवण्यात आली, तसेच टेस्लाच्या इतर कारच्या किमतीदेखील वाढवण्यात आल्या आहेत.
Tesla Model S Plaid
या इलेक्ट्रिक सेडान मध्ये तीन मोटर्सचा वापर केला आहे. या तीन मोटर्सच्या मदतीने ही कार १०२० एच. पी. जनरेट करते यामुळे २ सेकंदात ०-१०० किमी प्रतितास वेग पकडते. इलॉन मस्क यांच्या माहितीनुसार ही कार पोर्श पेक्षा वेगवान आणि वॉल्वो पेक्षा सुरक्षित आहे. या कारचा हायस्पीड 321 किमी प्रतितास इतका जातो.
कंपनी कडून १९ इंचाचे अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत, सोबतच ग्राहकांसाठी २१ इंचाचा ऑप्शन देखील देण्यात आला आहे. एकदा चार्ज केल्यास ही कार ६२७ किमी ची रेंज देते. कंपनीच्या दाव्यानुसार सुपर चार्जर ने ही कार १५ मिनिटात ३०० किमी रेंज देईल एवढी चार्ज होते.
ही कार पूर्णतः फिचर लोडेड आहे. ऑटो पायलट मोड हे या कारचं खास आकर्षण आहे.
ही ५ सीटर कार असून मागील सीट पूर्ण फोल्ड होते. यामध्ये नेव्हिगेशन, लाइव ट्राफिक व्हिज्युअलायझेशन, सेटेलाईट -व्हीव मॅप, इंटरनेट ब्रावजर असे बरेच आधुनिक फिचर मिळतात.
या कार ची स्पर्धा ही Porsche, Mercedes-Benz आणि Lucid Motors यांच्या सोबत असणार आहे. त्यामुळे कार प्रेमीं साठी आता टेस्लाच्या रूपाने अजून एक पर्याय उपलब्ध झाला आहे.
लवकरच भारतात देखील टेस्लाची इंट्री होण्याची शक्यता
भारतात देखील इलेक्ट्रिक कार्स च्या जगतात बरीच स्पर्धा सुरु आहे, भारतात सगळ्यात मोठे खिलाडी म्हणून टाटा मोटर्स कडे पाहिले जाते. भारतात देखील टेस्ला चा चाहता वर्ग खूप आहे, काही भारतीय उद्योगपतीं कडे टेस्ला कार आहे.
हल्लीच भारतीय रस्त्यांवर टेस्ला कार ची टेस्टिंग चालू आहे. इलॉन मस्क यांच्या नेतृत्वात भारतात पूर्णतः नवीन आणि आता असलेल्या टेस्ला कार्स च्या किंमतीपेक्षा कमी किमतीत नवीन कार्सची निर्मिती टेस्ला करु शकते. लवकरच भारतात देखील टेस्ला कार्स रस्त्यांवर धावताना दिसतील. भारतात टेस्ला ने आपली कार लाँच केल्यास तिची स्पर्धा ही मुख्यत्वे टाटा, ह्युंदाई, किया आणि एम जी यांच्या सोबत असेल.
टाटा नेक्सॉन ईव्ही ही सध्या भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक विकली जाणारी एस यु व्ही इलेक्ट्रिक कार आहे.
टेस्ला आणि फरारी यांची तुलना होऊ शकते का ? –
इलेक्ट्रिक कार आणि स्पोर्ट कार यांची तुलना करणे काहीसे चुकीचे ठरेल कारण दोन्ही कार या भिन्न उद्देश ठेवून निर्माण करण्यात आल्या आहेत.
मूलतः फरारी आणि टेस्ला या दोन्ही कार वेगवेगळ्या सेग्मेंट मध्ये येतात. टेस्ला ही पूर्णतः इलेक्ट्रिक कार आहे, तर फरारी हीस्पोर्ट कार रेसिंग ट्रॅक, ड्रॅग रेस साठी तयार करण्यात आली आहे. टेस्ला ही पावरफुल इलेक्ट्रिक मोटर मुळे तात्काळ टॉर्क जनरेट करते त्यामुळे हा वेग फारच जास्त असतो. फरारी ही फार पूर्वीपासून लक्झरी स्पोर्ट कार बनविणारी कंपनी आहे, जी उच्च कार्यक्षमता असणारी कार बनवते.