Tata Safari Facelift 2023 नव्या रुपात आणि दमदार फिचर सोबत जाणून घ्या किंमत

Tata Safari Facelift 2023

Tata Safari Facelift 2023 price list: टाटा मोटर्सने आपल्या वाहनांमध्ये केलेलं अमुलाग्र बद्दल आणि सुरक्षा यामुळे टाटा मोटर्सने बाजारातील इतर स्पर्धा करणाऱ्या कंपन्यांना चांगलेच धोबीपछाड केले आहे. अलीकडेच त्यांच्या टाटा सफारी फेसलिफ्ट आणि टाटा हॅरियरची किंमत यादी प्रसिद्ध केली आहे. आम्ही टाटा हॅरियरच्या किमतीबद्दल माहिती दिली आहे. आणि आता टाटा सफारीच्या ऑटोमॅटिक आणि डार्क एडिशनची किंमत प्रसारित झाली आहे. नवीन जनरेशनच्या Tata Safari च्या किंमती भारतीय बाजारपेठेत अगदी १६.१९ लाख रुपयांपासून ते २७.३४ लाख रुपये एक्स-शोरूम (मुंबई) आहेत. त्या किमतींबद्दल संपूर्ण लेख खाली दिली आहे.

Tata Safari Facelift Automatic Price in India  

जर तुम्ही टाटा सफारीच्या ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसाठी गेलात तर त्याची सुरुवातीची किंमत २०.६९ लाख रुपये एक्स-शोरूम आहे, तर ऑटोमॅटिकमधील टॉप मॉडेलची किंमत २६.९९ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. मॅन्युअल ट्रान्समिशन पेक्षा ऑटोमॅटिक ट्रान्समिशन १ लाख रुपयांनी जास्त महाग आहे. खाली Tata Safari Automatic च्या सर्व व्हेरीएंटची माहिती दिली आहे.

व्हेरीएंटकिंमत
प्युअर प्लस ATरुपये २०.६९ लाख
प्युअर प्लस एस ATरुपये २१.७९ लाख
एडव्हेंचर प्लस ATरुपये २३.८९ लाख
एडव्हेंचर प्लस ए  ATरुपये २४.८९ लाख
अक्म्प्लीश ड्युअल टोन ATरुपये २५.३९ लाख
अक्म्प्लीश+ ड्युअल टोन ATरुपये २६.८९ लाख
अक्म्प्लीश+ ६ एस ड्युअल टोन  ATरुपये २६. ९९ लाख

Tata Safari Facelift Manual Price in India  

टाटा सफारी मॅन्युअल ट्रान्समिशनच्या किमतींबद्दल पुढील माहिती दिली आहे.

व्हेरीएंटकिंमत
स्मार्टरुपये १६.१९ लाख
प्युअररुपये १७.६९ लाख
प्युअर प्लसरुपये १९.३९ लाख
एडव्हेंचररुपये २०.९९ लाख
एडव्हेंचररुपये २०.४९ लाख
अक्म्प्लीशरुपये २३.९९ लाख
अक्म्प्लीश+रुपये २५.४९ लाख

Tata Safari Facelift Dark Edition

टाटा सफारी डार्क एडिशनच्या किमती मॅन्युअल ट्रान्समिशन साठी रुपये २०.६९ लाख लाखांपासून सुरू होऊन रुपये २५.९४ लाख एक्स-शोरूम आहेत. तर टाटा सफारी डार्क एडिशनच्या ऑटोमॅटिक ट्रान्समिशनची किंमत रुपये २२.९ लाख रुपये ते रुपये २७.३४ लाख रुपये एक्स-शोरूम ठेवण्यात आली आहे. त्याच्या इतर व्हेरियंटच्या किंमती खाली दिल्या आहेत.

व्हेरीएंटकिंमत MTकिंमत AT
प्युअर प्लस एस डार्करुपये २०.६९ लाखरुपये २२.०९ लाख
एडव्हेंचर प्लस डार्करुपये २३.०४ लाखरुपये २४.४४ लाख
अक्म्प्लीश डार्करुपये २४.३४ लाखरुपये २५.७४ लाख
अक्म्प्लीश प्लस डार्करुपये २५.८४ लाखरुपये २७.२४ लाख
अक्म्प्लीश प्लस डार्क ६ एसरुपये २५.९४ लाखरुपये २७.३४ लाख

Tata Safari Facelift 2023 features

नवीन जनरेशन Tata Safari ला १२.३-इंच टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसह १०.२५-इंच हेडलाइन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि ऍपल कार प्ले कनेक्टिव्हिटी सह वायरलेस अँड्रोइड ऑटो मिळते. इतर हायलाइट्समध्ये पॉवर सीट्स सह उंची समायोजित करण्यायोग्य ड्रायव्हर सीट आणि वेलकम सीट फंक्शन, उत्कृष्ट कलर सह, सफारी बॅजिंग, जे.बी.एल. स्पीकर साउंड सिस्टम, वायरलेस मोबाइल चार्जर, एक मोठा पॅनोरामिक सनरूफ, टच पॅनेल यांचा समावेश आहे. जर तुम्ही टाटा सफारीच्या ६ सीटर साठी गेलात, तर त्याच्या मधल्या रांगेत हवेशीर जागा देखील मिळतील.

Tata Safari Facelift 2023 Safety features

Tata Safari Facelift 2023

सुरक्षेच्या दृष्टीने, त्याचे टॉप मॉडेल ७ एअरबॅगसह सुसज्ज आहे, याशिवाय, Advanced Driver- Assistant System (ADAS System) तंत्रज्ञान, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, हिल होल्ड असिस्ट, उत्कृष्ट 360 डिग्री कॅमेरा, इबिडी सह एबीएस आता इतर अनेक वैशिष्ट्यांसह उपलब्ध आहेत. Advanced Driver- Assistant System (ADAS System) तंत्रज्ञानामध्ये लेन वॉर्निंग, लेन किपिंग अलर्ट, एडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग सिस्टम, ट्रॅफिक जॅम असिस्ट, रिअर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट यांचा समावेश आहे. Advanced Driver- Assistant System (ADAS System) हल्ली सगळेच ग्राहक हे सुरक्षेला अधिक महत्व देवून अधिक सुरक्षित कार खरेदी करण्यावर भर देत आहेत, यामुळे आणि सरकारच्या वाहनाच्या सुरक्षेतील नियमावलीमुळे कार्स कंपन्या या अधिक सेफ्टी फीचर्स देत आहेत, अलीकडेच तुम्ही ADAS System बद्दल ऐकले असेल. ADAS System म्हणजे वाहनामध्ये एका सॉफ्टवेअर चा समावेश केलेला असतो. जे आपोआप काम करते, कारमधील कॅमेरे, रडार आणि इतर सेन्सर्सच्या सहाय्याने समन्वय साधून कार स्वयं नियंत्रित केली जाते आणि अपघातापासून बचाव करते.ज्यामध्ये Adaptive Cruise Control ब्लाइंड-स्पॉट डिटेक्शन सिस्टम, लेन चेंज असिस्ट, पार्क असिस्ट, रिअर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट इत्यांदींचा समावेश आहे. या फिचर मुळे कार अधिक सुरक्षित बनते.

Colors Option

टाटा हॅरीयर मध्ये बऱ्याच दमदार फिचर सोबत अनेक कलर पर्याय देखील मिळतात,

Cosmic Gold
Galactic Sapphire
Stardust Ash
Stellar Frost
Oberon Black
Supernova Copper
Lunar Slate

Tata Safari Facelift Engine  

यामध्ये 2.0 लिटर डिझेल इंजिन आहे जे १७० बी एच पी आणि ३५० एन एम टॉर्क जनरेट करते. गिअरबॉक्स पर्यायांमध्ये सहा स्पीड मॅन्युअल आणि ६ स्पीड ट्रान्समिशन समाविष्ट आहे. सध्या कोणत्याही व्हेरीएंट मध्ये पेट्रोल इंजिनचा पर्याय नसला तरी लवकरच टाटा मोटर्स १.५ लीटर टर्बो पेट्रोल इंजिन पर्याय आणू शकते.

TATA Motors Official Link

Tata Harrier new Facelift 2023

Tata Nexon Ev

Join our Whats app Group Click Here

3 thoughts on “Tata Safari Facelift 2023 नव्या रुपात आणि दमदार फिचर सोबत जाणून घ्या किंमत”

  1. Pingback: Upcoming New Ferrari Purosangue information in Marathi

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Lavasa city बद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? Saurabh Netravalkar पाकिस्तानला गुडघे टेकायला लावणारा भारतीय वंशाचा क्रिकेटर. Tejashree Pradhan हिचा सिनेसृष्टीतील प्रवास World Environment Day: A Call to Action Who is Kavya Maran?