Royal Enfield Classic 350 info in Marathi

Royal Enfield Classic 350 info in Marathi | RE Classic 350 info in Marathi | Classic 350 info in Marathi |

Royal Enfield Classic 350 info in Marathi : आयशर कंपनीची मालकी असलेली रॉयल एनफिल्ड ही भारतातील दुचाकी बनवणारी अग्रगण्य कंपनी आहे. रॉयल एनफिल्ड ही सध्या ५० हून अधिक देशात आपल्या दुचाकी विकते भारतीय दुचाकी बाजारात रॉयल एनफिल्ड ने अनेक दशके दमदार बाईक लॉन्च करून आपला दबदबा कायम ठेवला आहे. अगदी दैनंदिन वापरासाठी तसेच लॉंग ड्राईव्ह, ऑफ रोडिंग, टुरिंग साठी अनेक प्रकारच्या दुचाकींची विक्री रॉयल एनफिल्ड भारतीय बाजारपेठेत करते. यामध्ये प्रामुख्याने रॉयल एनफिल्ड क्लासिक ३५०, रॉयल एनफिल्ड हंटर ३५०, मिटीऑर ३५०, हिमालय ४५०, कॉन्टिनेन्टल जीटी ६५०, एंटरसेप्टर ३५०, सुपर मिटीऑर ६५०, शॉटगन ६५०, स्क्रॅम्ब ४११ इ. या लेखांमध्ये आपण रॉयल एनफिल्ड क्लासिक ३५० बाबत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

गेली अनेक दशके भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी रॉयल एनफिल्ड ही फक्त बाईक नसून एक इमोशन आहे. तिचा क्लासिक रेट्रो लूक आणि दमदार फायरिंग सह पावरफुल विश्वासार्ह इंजिन हीच रॉयल एनफिल्ड ची ओळख आहे.

Royal Enfield Classic 350 info in Marathi
Royal Enfield Classic 350 info in Marathi

RE Classic 350 ची (एक्स शोरूम) किंमत ही १.८४ लाख असून हिचे टॉप मॉडेल (एक्स शोरूम) २.१५ लाखांपर्यंत जाते, जी प्रत्येक राज्यानुसार बदलू शकते. बरेच वेरियंट या गाडीचे तुम्हास पहावयास मिळतात यामध्ये काही ए बी एस सह येतात तर काही विदाऊट एबीएस, अनेक कलर ऑप्शन तुम्हास यामध्ये मिळतात. स्पोक व्हील ऑप्शन, अनेक आलोय ऑप्शन, तसेच अनेक ॲक्सेसरीज मिळून एक दमदार लोक तुम्हास या बाईक सोबत मिळतो तुम्हाला पाहिजे तसे कस्टमायझेशन तुम्ही करू शकता.

बरेच जण क्लासिक 350 हे तिचा तिचा लूक आणि तिचे दमदार फायरिंग यासाठी घेतात, या गाडीचा कर्ब वेट हा १९५ किलोग्रॅम आहे. क्लासिक 350 मध्ये तुम्हाला हॅलोजन हेडलॅम्प हॅलोजन डी आर एल, हॅलोजन इंडिकेटर, अनलॉग स्पीडोमीटर ,ऑडोमीटर तसेच एक छोटा डिजिटल ट्रिप मीटर, फ्यूल गेज देण्यात आला आहे. Classic 350 मध्ये रॉयल एनफिल्ड १३ लिटर कॅपॅसिटी फ्युल टॅंक मिळतो जो तुम्हाला ४५०-४५५ किमी रायडिंग रेंज देतो. यामध्ये तुम्हाला पुढे ४१ एम एम चे टेलिस्कोपिक फोर्क्स मागे ट्वीन शॉक ऍब्जॉर्बर्स मिळतात तसेच सुरक्षेच्या दृष्टीने Classic 350 मध्ये ड्युअल चॅनेल ए बी एस ऑफर करण्यात आला आहे.

New Royal Enfield Himalayan 450

Royal Enfield Classic 350 info in Marathi रेट्रो लुक

रॉयल एनफिल्ड ने त्यांच्या डिझाईन लाईन मध्ये कोणताही बदल न करता, आधुनिक अपडेट केले आहेत त्यामुळे जुनी क्लासिक 350 आणि नवीन क्लासिक 350 यामधील फरक ओळखणे सहज शक्य नाही, पण नवीन क्लासिक 350 चा लूक थोडा बल्की केल्याने तिचा भारदस्तपणा नजरेत येतो. रॉयल एनफिल्ड या मध्ये अनेक कलर पर्याय ऑफर करते.

कलर पर्याय

  • Halcyon Black | green | Grey
  • Redditch Saga Green | Redditch Grey | Red
  • Crome Red | Bronz
  • Dark Stealth Black
  • Gunmetal Grey
  • Signal Desert Sand | Marsh Grey |
Royal Enfield Classic 350 info in Marathi
Royal Enfield Classic 350 info in Marathi

Royal Enfield Classic 350 info in Marathi इंजिन स्पेसिफिकेशन

जे१ सिरीजचे ३४९ सीसीचे सिंगल सिलेंडर फोर स्ट्रोक एअर कुल्ड इंजिन यामध्ये मिळते, जे २०.२ पी एस पॉवर आणि २७ एन एम टॉर्क जनरेट करते. ५ स्पीड गिअर बॉक्स सह, इलेक्ट्रॉनिक फ्यूल इंजेक्टेड सिस्टीम देण्यात आली आहे. सरासरी 35 के एम पी एल मायलेज देण्यास हे इंजिन सक्षम आहे.

इंजिन३४९ सी
पॉवर२०.२ पी एस @ ६१०० आरपीएम
टॉर्क२७ एन एम @ ४००० आरपीएम
मायलेज३५ के एम पी एल

बिल्ड क्वालिटी

या बाईक मध्ये पूर्णतः नवीन ट्विन ट्यूब चेसी पाहायला मिळते यामुळे गाडीची बिल्ड क्वालिटी अजूनच मजबूत झाली आहे, तसेच स्टॅबिलिटी वाढून या अगोदर असणारे व्हायब्रेशन देखील या नवीन चेसीमुळे कमी झाले आहेत.

विक्री आणि सर्विसिंग

रॉयल एनफिल्ड त्यांच्या रिलायबल इंजिन आणि विक्री पाश्चात सेवेसाठी देखील ओळखली जाते. संपूर्ण भारतभर रॉयल एनफिल्ड चे अनेक शोरूम तसेच सर्विस सेंटर देखील उपलब्ध आहेत. तसेच या गाड्यांसाठी लागणारे पार्ट्स हे सहज उपलब्ध होत असल्याने भारतीय ग्राहकांचा विश्वास रॉयल एनफिल्ड ने जिंकला आहे. या गाड्यांची क्रेझ ही अगदी तरुणांपासून ते अगदी प्रौढांपर्यंत सगळ्या वर्गामध्ये आहे.

फिचर्स

टॉप स्पीड११४ के एम पी एल
रायडिंग मोड
गिअर आणि पॅटर्न५ स्पीड – १ खाली ४ वर
ट्रान्समिशनचेन ड्राईव्ह
कूलिंग सिस्टीमएअर कूल्ड / ऑइल कूल्ड
फ्युल टॅंक१३ लिटर
फ्युल पेट्रोल
ब्रेकिंग सिस्टीमसिंगल चॅनल एबीएस/ ड्युअल चॅनेल एबीएस
कर्ब वेट१९५ किलो
सीट हाईट८०५ एम एम
ग्राउंड क्लिअरन्स१७० एम एम
ऑडोमीटरडिजिटल
किलोमीटरअनलॉग
ट्रिप मीटरडिजिटल
हेडलाईट/ टेल लाईट / टर्न सिग्नलहॅलोजन
यूएसबी चार्जिंग पोर्ट
हजार्ड लाईट
वॉरंटी३ वर्ष | ३०,००० किलोमीटर

व्हेरियंट आणि किंमत

व्हेरियंटकिंमत (on road)
क्लासिक ३५० रेडडीच सिंगल एबीएस२,४०,९०१/-
क्लासिक ३५० Halcyon सिंगल एबीएस२,४४,१७०/-
क्लासिक ३५० Halcyon ड्युअल एबीएस२,५१,२८१/-
क्लासिक ३५० सिग्नल ड्युअल एबीएस२,६४,०५६/-
क्लासिक ३५० डार्क ड्युअल एबीएस२,७२,२५४/-
क्लासिक ३५० क्रोम ड्युअल एबीएस२,७६,६२६/-

रेंज रोव्हर सारखे दमदार फीचर्स आता टाटा हॅरियर मध्ये

तुम्हाला जर प्रवासाची आवड असेल, तर लॉन्ग राईड साठी रॉयल एनफिल्ड क्लासिक ३५० हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो, क्लासिक ३५० ची स्पर्धा ही थेट होंडा सीबी ३५०, होंडा हायनेस ३५०, जावा, जावा बॉबर, येझडी यांच्यासोबत असेल.

असेच नवनवीन ऑटो अपडेट मिळवण्यासाठी कोकण कल्चर ला नक्की फॉलो करा तसेच Royal Enfield Classic 350 info in Marathi लेख कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा.

रॉयल एनफिल्ड ऑफिशियल वेबसाईट क्लिक करा.

हे देखील वाचा

Yamaha RX 100 new model launch जाणून घ्या पूर्ण माहिती !

जीवनविद्या मिशन

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Lavasa city बद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? Saurabh Netravalkar पाकिस्तानला गुडघे टेकायला लावणारा भारतीय वंशाचा क्रिकेटर. Tejashree Pradhan हिचा सिनेसृष्टीतील प्रवास World Environment Day: A Call to Action Who is Kavya Maran?