New Ferrari Purosangue information in Marathi, ferrari Upcoming four door suv, Ferrari Purosangue
New Ferrari Purosangue information in Marathi : इटलीची प्रसिद्ध कार कंपनी फरारी आपली एसयूव्ही सुपर कार Purosangue ही भारतात लवकरच लॉन्च करणार आहे. या कारची बुकिंग सध्या कंपनीने बंद केली आहे. प्रथम बुकिंग केलेल्या ग्राहकांच्या डिलिव्हरी नंतर, पुन्हा बुकिंग चालू केली जाईल. भारतात तिची प्रत्यक्ष विक्री ही सप्टेंबर 2024 च्या आसपास अपेक्षित आहे. या लेखात आपण या कारची वैशिष्ट्ये आणि या कार विषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
पूरोसांग्यू ही फरारी लाईनअप मधील पहिली एसयूव्ही आहे. Ferrari Purosangue ही फरारी रोमा कुप प्लॅटफॉर्मवर डेव्हलप केलेली आहे. किंमत ही 10.5 कोटी रुपये असून ही किंमत भविष्यात वाढण्याची शक्यता आहे. तसेच याची बुकिंग देखील सध्या पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. अगोदर बुक केलेल्या ग्राहकांच्या ऑर्डर्स पूर्ण झाल्यानंतर इतरांसाठी बुकिंग पुन्हा चालू करण्यात येईल. Ferrari Purosangue ही फरारीच्या इतिहासातली पहिली चार दरवाजे असलेली कार आहे. 75 वर्षानंतर फरारीने ही अनोखी कार लॉन्च केली आहे. याकारची स्पर्धा ही थेट रोल्स रॉइस कलीनन, लेम्बोर्गिनी उरूस, पोर्श केयेन टर्बो, बेंटले बेंटायगा, एस्टन मार्टिन डीबीएक्स, रेंज रोवर स्पोर्ट यांसारख्या हाय परफॉर्मन्स कार सोबत असेल.
Ferrari Purosangue information in Marathi इंजिन आणि परफॉर्मन्स
या कारमध्ये नॅचरली अस्पिरेटेड गॅसोलीन 6.5 लिटर V 12, 6496 cc पेट्रोल इंजिन, जे आठ स्पीड डीसीटी ट्रान्समिशनसह येते. जे 7750 आरपीएम वर 725 बीएचपी, आणि 6250 आरपीएम वर 716 एन एम टॉर्क जनरेट करते. या पॉवरफुल इंजिन तसेच या कारचे डिझाईन हे फरारीच्या इतर कार प्रमाणेच असून एरोडायनॅमिक आहे. स्पोर्टीनेस आणि पाॅवर मुळे Ferrari Purosangue ही 0 ते 100 किमी स्पीड 3.3 सेकंदात गाठते.
फीचर्स
या नवीन फरारी मध्ये खूप दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये 10.2 इंच टच स्क्रीन ड्युअल कॉकपीट डॅशबोर्ड मिळतो, 3d हाय एंड साऊंड सिस्टिम, Apple Carplay, अँड्रॉइड ऑटो, वायरलेस चार्जिंग, पुढील सीटवर मसाज फंक्शन, ऑटो हाय बीम लो बीम हेडलॅम्प, DLRs, पार्किंग सेंसर सह अनेक दमदार फीचर्स ऑफर करते. तसेच या कार मध्ये AWD ऑल व्हील ड्राईव्ह आणि RWD रीअर व्हील ड्राईव्ह हे दोन्ही पर्याय दिले जातील. पूरोसांग्यू या कारची अद्याप सुरक्षा रेटिंग चाचणी झालेली नाही.
अशाच प्रकारचे नवनवीन देश विदेशातील ऑटो – अपडेट जाणून घेण्यासाठी आमचे पेज कोकण कल्चर ला नक्की फॉलो करा, तसेच सदर लेख कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा.
हे देखील वाचा.
Pingback: Bajaj Pulsar N250 info in Marathi भरपूर फीचर्स सह दमदार लुक