Konkan Yuva Seva Sanstha : कोकणातील स्त्रियांना/भगिनींना एक प्लॅटफॉर्म मिळवून देण्यासाठी कोकण युवा सेवा संस्था आयोजित कोकण सुंदरी स्पर्धा आयोजित केली होती, या स्पर्धेमध्ये कोकणपट्ट्यातील स्त्रियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत टॉप १० मध्ये पोहोचलेल्या सुंदरी यांची महाअंतिम फेरी येत्या १९ जानेवारीला होणार आहे.
Konkan Yuva Seva Sanstha
कोकण युवा सेवा संस्थेच्या माध्यमातून दिनांक १९ जानेवारी २०२५ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन हे कोकण नगर व्यायाम शाळेचे पटांगण भांडुप पश्चिम येथे करण्यात आले आहे सदर कार्यक्रम हा सायंकाळी ५ वाजता. आयोजित करण्यात आला आहे.
सदर संस्थेच्या मार्फत कोकणातील तमाम जनतेला तसेच कंटेंट क्रियेटर, युट्युबर यांना देखील कोकण युवा संस्थेच्या वतीने आग्रहाने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
सदर कार्यक्रमाची रूपरेषा अतिशय नियोजनबद्ध असून यामध्ये आयोजित केलेले कार्यक्रम…
कोकण युवा सेवा संस्था आयोजित कार्यक्रम
कोकण सुंदरी स्पर्धा महा निकाल व बक्षीस वितरण. |
कोकण युवा सेवा संस्था संचलित “उद्योजक लॉबी” घोषणा. |
कोकण युवा सेवा संस्था वेबसाईट प्रक्षेपण |
कोकण युवा सेवा संस्था संचलित कलाकृती फाईन आर्ट्स ड्रॉइंग प्रदर्शन. |
कोकण युवा सेवा संचलित हौशी कलाकार ग्रुप भांडुप जाखडी नृत्य |
नवरंग कलामंच प्रस्तुत फॉरेनची परबीन |
महिलांसाठी विशेष कार्यक्रम |
सार्वजनिक लकी ड्रॉ |
मान्यवरांचे स्वागत सत्कार |
सुरुवात जिव्हाळा वृद्धाश्रमाची |
सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मराठी चित्रपट मालिका आणि नाट्य अभिनेते, स्टार प्रवाह वरील सुख म्हणजे नक्की काय असतं मालिका फेम गणेश रेवडेकर दादा यांना खास विशेष आमंत्रण दिले आहे यांच्या हस्ते सदर कार्यक्रम पार पडणार आहे.
कोकण युवा सेवा संस्था ही मागील तीन वर्ष विविध सामाजिक महत्त्वकांक्षी उपक्रम राबवित आहे.
कोकण युवा सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कु. अभिजीत कोटकर, सचिव श्री.अनिल गावडे, उद्योजक लॉबी प्रमुख श्री. रुपेश कोलते, खजिनदार सौ. संजना बेंद्रे. आणि सर्व सदस्य यांच्यामार्फत कोकणकर जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन कोकण युवा सेवा संस्थेद्वारे समस्त कोकणकरांना करण्यात आले आहे.
काय मग कोकणकर येताय ना…भांडुपला मनोरंजनाच्या कार्यक्रमांसह, कोकण सुंदरीचा ताज कोणाला मिळतो ते पाहण्यासाठी…
हे देखील वाचा – कोकण कल्चर