Koknatil Ranbhajya

Koknatil Ranbhajya : कोकण हा जैवविविधतेने नटलेला संपन्न परिसर आहे, या परिसराचा मोठा भाग हा जंगलांनी व्यापलेला असून येथील परिसर समुद्र, डोंगर, नद्या, यांच्या सौंदर्याने नटलेला आहे. या जंगलामध्ये अनेक वनौषधी आढळून येतात. वेगवेगळ्या मोसमांमध्ये वेगवेगळ्या भाज्या उगवतात. येथील लोकांसाठी निसर्ग हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. या निसर्गाच्या कुशीतून मिळणारा एक अनमोल खजिना म्हणजे कोकणी रानभाज्या. शिवाय या भाज्यांसाठी कोणत्याही प्रकारची लागवड, खते, कीटकनाशके यांची गरज नसते, या भाज्या निसर्गात नैसर्गिक रित्या वाढतात या भाज्यांना अनोखी चव असून त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील आढळतात.

Koknatil Ranbhajya

फ्रेंच फ्राईजला तोडीस तोड देणारा कोकणातील पदार्थ फणसाचे तळलेले गरे

Koknatil Ranbhajya विविधता

Koknatil Ranbhajya कोकणात निसर्गाच्या रूपांमध्ये जशी विविध आढळून येते तशीच विविधता येथील वनस्पतीमध्ये देखील आढळून येते. कोकणात विविध प्रकारच्या रानभाज्या वेगवेगळ्या हंगामात आढळतात. यात टाकळा, कुर्डू, सुरण, काटळ /करटोली इत्यादी रानभाज्यांचा समावेश होतो. या भाज्या जंगलात आणि डोंगरात वाढतात आणि त्यांच्या वाढीसाठी विशेष प्रकारच्या माती व वातावरणाची गरज असते, ज्यामुळे त्यांना अनोखी चव आणि गुणधर्म प्राप्त होतात.

Koknatil Ranbhajya – टाकळा

Koknatil Ranbhajya
Koknatil Ranbhajya

टाकळा ही देखील महत्त्वाची रानभाजी आहे. टाकळा ही भाजी सर्वत्र आढळून येते. रस्त्याच्या दुतर्फा, शेतावर, पडीक माळरानावरती ही भाजी मुबलक प्रमाणात उगवते या भाजीचे अनेक प्रकार देखील आहेत, टाकळा हा साधारण कोवळा असतानाच याची पाने व तुरे कुठून भाजीसाठी वापरतात, टाकळ्याच्या पानांचा स्वाद थोडा कडवट असतो, यामुळे ही भाजी बनवताना भाजीची पाने अगोदर उकडून / शिजवून घ्यावी लागतात. शक्यतो लोक टाकळ्याची कोवळी भाजी खाणं पसंत करतात. याची पण पद्धत इतर पालेभाज्यांसारखीच आहे. रोपट्याची पूर्ण वाढ झाल्यानंतर याला शेंगा येऊन त्या पिकल्यानंतर तडकतात आणि विखुरलेल्या बिया पुढील पावसाळ्यात रुजून येतात. या भाजीमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन्स, आणि खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात. टाकळाच्या भाजीमुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

कुर्डू

कुर्डू ही आणखी एक कोकणी रानभाजी आहे. शेताचे बांध किंवा शेताचा पडीक भाग, पडीक जमीन इत्यादी ठिकाणी पावसाळ्यात आपोआप रुजून येते. तशी ही भाजी संपूर्ण महाराष्ट्रभर आढळते. चवीला अतिशय उत्कृष्ट, रूचकर आणि औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असलेले ही भाजी आरोग्यासाठी उत्तम आहे. तिच्या पानांचा, फुलांचा / तुऱ्याचा उपयोग भाजी बनवण्यासाठी केला जातो. कुर्डूची कोवळी भाजी हलकी, खमंग आणि पौष्टिक असते. कुर्डूमध्ये आयर्न, कॅल्शियम आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. ही भाजी बनवताना जशी आपण माठा च्या पानाची भाजी बनवतो. त्याचप्रमाणे याची देखील भाजी बनवली जाते.
सृष्टीच्या कुशीतून आरोग्यदायीतेचा खजिना कोकणी रानभाज्या त्यांच्या औषधी गुणधर्मांमुळे प्रसिद्ध आहेत. या भाज्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे, आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात. यामुळे त्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत तसेच हाडांच्या मजबुतीसाठी उपयुक्त ठरते. पावसाळ्याच्या सुरुवातीला ही भाजी मोठ्या प्रमाणात आढळून येते साधारण गणपती सणाच्या आसपास या भाजीला रंगीत तुरे येण्यास सुरुवात होते यामध्ये मोठ्या प्रमाणात बिया असतात तुरे सुकल्यानंतर याच बिया पुढील पावसाळ्यात रुजून येतात. असे हे चक्र निरंतर चालू असते. पावसाळ्यात ही भाजी नक्की ट्राय करा.

Koknatil Ranbhajya
Koknatil Ranbhajya

भारंगी

पावसाळा सुरू झाला की भारंगी ची झुडपे हे हिरव्यागार पालवीने सजतात, याला कोवळी पाने व तुरे येतात. ही भाजी जंगला मध्ये शोधावी लागते, तसेच एकाच झाडावर बरीच भाजी मिळेल असे देखील नाही, पावसाला सुरुवात झाली की भारंगी च्या झाडाला कोवळी पाने यायला लागतात. या पानांची भाजी केली जाते, इतर पाल्याच्या भाजीप्रमाणेच ही भाजी केली जाते, यामध्ये चणाडाळ ऍड केल्यास याची चव अतिशय रुचकर लागते. या भाजीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात, भाद्रपद महिन्याच्या आसपास या झाडांना फुले यायला लागतो यांच्या फुलांची तसेच येणाऱ्या तुऱ्यांची भाजी देखील अतिशय चवदार असते. वाताच्या विकारावर भारंगीची ही भाजी अतिशय गुणकारी आहे.

Koknatil Ranbhajya
Koknatil Ranbhajya

काटळा / करटोली

कोकणात आढळणारी ही भाजी अगदी कारल्याप्रमाणेच असते, कोकणाच्या काही भागांमध्ये याला काटळा किंवा करटोली ची भाजी असं देखील म्हटलं जातं. करटोलीची फळे ही वेलीवर लागतात कातळ जमीन किंवा खडकाळ जमीन परिसरात ही भाजी आढळून येते. याची फुले, फळे साधारण कारल्या सारखीच दिसायला असतात, पावसाळा सुरू होताच जमिनीमधील काटल्याच्या कांद्याला अंकुर फुटून त्याचे वेलीमध्ये रूपांतर होते. पंधरा ते वीस दिवसात हे वेल आजूबाजूच्या झाडांचा आधार घेत पसरते व फुले यायला लागतात. ही भाजी जंगलात तुरळक प्रमाणात आढळून येते एका वेली वर साधारण दहा ते बारा काटळा / करटोली आढळून येतात, पूर्ण वाढ झालेल्या काटळा / करटोली यांची भाजी केली जाते. कोवळ्या फळांमध्ये बिया आढळत नाहीत तसेच जून फळांमध्ये बिया आढळतात त्यांची भाजी करताना कारल्याची भाजी करताना जी प्रक्रिया आपण करतो तीच प्रक्रिया या भाजीसाठी करावी. कारल्याप्रमाणे दिसत असली तरीही ही भाजी कडू नसते, तसेच चवीला चांगली असून ही भाजी मूत्र विकारांवर अतिशय गुणकारी मानली जाते. राहिलेल्या काटळा / करटोली फळे ही कालांतराने पिकून त्यातील बियांपासून अनेक वेली वाढतात. या भाजीला स्थानिक बाजारपेठेत देखील खूप मागणी असते.

रानभाज्यांचे महत्त्व त्यांच्या पौष्टिक मूल्यामुळे आहे. शहरीकरणामुळे आणि आधुनिक कृषी पद्धतींच्या वापरामुळे रानभाज्यांचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे या अनमोल खजिन्याचे जतन करणे आवश्यक आहे. कोकणातील लोक आजही रानभाज्यांचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात करतात.

Koknatil Ranbhajya

अळू / तेरा

पावसाळ्याच्या सुरुवातीला अळूच्या कांद्यांमधून कोंब फुटून त्यातून पाने वर येऊन हळूहळू आकार घेऊ लागतात. अळू / तेरा हा कोकणात सर्वत्र आढळतो याची पातळ भाजी, तसेच अळूवडी सह अनेक पदार्थ यांपासून बनवले जातात. अळू / तेरा पानाची भाजी केली जाते सर्वप्रथम स्वच्छ धुऊन त्याच्या पानावरील पातळ पापुद्रा काढून टाकला जातो कारण यामध्ये नैसर्गिक रित्या खाज असते ती कमी व्हावी यासाठी. किंवा भाजी करताना किंवा अळूवडी करताना यामध्ये कोकम किंवा आगळ टाकले जाते. कोकमामुळे अळू / तेरा मधील खाज कमी होते. अळू / तेरा पातळ भाजीमध्ये कडधान्य तसेच फणसाच्या बिया इत्यादी टाकल्याने अळू / तेरा पातळ भाजी खूप छान लागते. तसेच अळू / तेरा पानापासून अळूवडी देखील बनवली जाते. हल्ली बरेच कोकणी बांधव अळू / तेरा च्या पानांची लागवड देखील करतात त्यामुळे अळू / तेरा वर्षभर उपलब्ध असतो.

कोकणी रानभाज्यांचे सेवन पारंपारिक पाककृतींमध्ये केले जाते. पेंड्रीची भाजी, टाकळ्याची भाजी, कुर्डूच्या फुलांची भाजी, अळू आणि सुरणाचे काप, करांदे भाजी, सुरण भाजी, शेवग्याची भाजी इ. यांसारख्या अनेक पाककृती कोकणात प्रचलित आहेत. या पाककृतींमध्ये नैसर्गिक मसाल्यांचा वापर करून भाज्यांचा स्वाद वाढवला जातो.
रानभाज्यांचे संरक्षण म्हणजे जैवविविधतेचे संरक्षण. कोकणी संस्कृतीत रानभाज्यांचे विशेष स्थान आहे. विशिष्ट काळात पारंपारिक सण-उत्सवांमध्ये रानभाज्यांचा समावेश केला जातो. गणेश चतुर्थी, दिवाळी, आणि होळी यांसारख्या सणांमध्ये रानभाज्यांच्या विविध पाककृती तयार केल्या जातात. हे सण रानभाज्यांच्या सेवनाने अधिक समृद्ध होतात.

शेवग्याच्या झटपट तयार होणाऱ्या पौष्टिक रेसिपी

निष्कर्ष

कोकणी रानभाज्या या निसर्गाने दिलेले एक अमूल्य वरदान आहे. त्यांच्या सेवनाने आपले आरोग्य सुधारते आणि निसर्गाशी आपले नाते अधिक दृढ होते. त्यामुळे या अनमोल खजिन्याचे जतन करणे आणि त्यांचा योग्य प्रकारे वापर करणे हे आपले कर्तव्य आहे. कोकणातील रानभाज्यांचे महत्त्व आणि त्यांचे औषधी गुणधर्म जाणून घेऊन पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे व या भाज्यांची तोंड ओळख करून देणे, हे जरी केले तरी आपण निसर्गाशी अधिक जवळीक साधू शकतो.

अशीच कोकणातील नवनवीन माहिती मिळवण्यासाठी कोकण कल्चर ला नक्की फॉलो करा तसेच सदर लेख कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा.

फणसाचे सांदण

शेवग्याचे फायदे जाणून हैराण व्हाल

Karande Bhaji Recipe | बटाट्याला पूरक असा करांदा

सर्व कंदवर्गीय भाज्यांमध्ये सुरणाची भाजी ही सर्वश्रेष्ठ आहे. 

जीवन विद्या मिशन

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Lavasa city बद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? Saurabh Netravalkar पाकिस्तानला गुडघे टेकायला लावणारा भारतीय वंशाचा क्रिकेटर. Tejashree Pradhan हिचा सिनेसृष्टीतील प्रवास World Environment Day: A Call to Action Who is Kavya Maran?