How to change ESIC details online : ESIC (कर्मचारी राज्य विमा योजना) राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी आणि कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्य सुरक्षे संदर्भात ही महत्त्वपूर्ण योजना १९४८ मध्ये मंजूर करण्यात आली. या योजने अंतर्गत भारतातील खाजगी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये कामगारांना सुरक्षा देण्यासाठी ESIC (कर्मचारी राज्य विमा योजना) मंजूर करण्यात आली. यानुसार कामगार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कामाच्या वर्षांमध्ये आवश्यक तितक्या वेळा ESIC लाभ घेता येईल खाजगी क्षेत्रातील असंघटित कामगार किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी ही एक उपयुक्त अशी योजना आहे.
ESI ACT 1948 कायद्यानुसार कारखाने, व्यावसायिक आस्थापना, संस्था जसे हॉटेल, रस्ते वाहतूक, सिनेमा, शैक्षणिक आणि वैद्यकीय संस्था किंवा दुकाने यामध्ये १० किंवा अधिक व्यक्ती काम करतात अशा कामगारांना वैद्यकीय आवश्यक लाभ देण्यात यावे. अशी या कायद्यात तरतूद करण्यात आली आहे.
सदर How to change ESIC details online लेखात हे आपण ESIC पोर्टलला असलेली आपली डिटेल्स जर चुकीची असेल तर ती आपण ऑनलाइन कशी अपडेट करता येईल हे आपण पाहणार आहोत.
बऱ्याचदा ESIC details बरोबर देऊनही Employer मार्फत कर्मचारी राज्य विमा पोर्टलवर चुकीची माहिती टाकली जाते तर सदर माहिती आपण कशी दुरुस्त करू शकतो हे पाहू.
सदर चुकीची माहिती दुरुस्त करण्यासाठी पुढे काही स्टेप दिल्या आहेत त्या मार्फत तुम्ही तुमची डिटेल्स अपडेट करू शकता.
How to change ESIC details online
१. सर्वप्रथम गुगल सर्च इंजिन ला जाऊन www.esic.gov.in या वेबसाईटला भेट द्या.
२.वरील प्रमाणे वेबसाईट सुरू होईल त्यावरील Service या पर्यायावर क्लिक करा.
३. आता येते बरेच ऑप्शन दिसतील त्यापैकी Employee या पर्यायावर क्लिक करा.
४. पुढे वरील इंटरफेस दिसू लागेल आता दिसणाऱ्या पर्यायांपैकी IP Portal पर्यायावर क्लिक करा.
५. IP Portal पर्यायावर क्लिक केल्यानंतर एक पॉप-अप विंडो ओपन होईल त्यावरील OK या पर्यायावर क्लिक करा.
६. यानंतर तुमच्यासमोर इएसआयसी पोर्टलचे लॉगिन पेज दिसेल.
तुम्ही जर नोंदणी / Registration अगोदरच केले असेल तर तर तुमची लॉगिन डिटेल इन्शुरन्स नंबर, पासवर्ड आणि कॅपचा कोड टाकून लॉगिन करून घ्या.
पहिल्यांदाच पोर्टल ओपन करत असाल तर लॉगिन पोर्टल वरील कॅपच्या कोड च्या खाली Sign up / साइन अप करे या पर्यायावर क्लिक करा.
७. Sign up या पर्यायावर क्लिक पुढील विंडो ओपन होईल.
यामध्ये तुम्ही तुम्हाला हवी असलेली भाषा निवडून – इन्शुरन्स नंबर, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, आणि दिलेला कॅपच्या कोड टाकून साइन अप करून घ्या.
८. साइन अप केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो ओटीपी प्रविष्ट करून सत्यापित करून घ्या.
९. पुढे एक विंडो ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला पासवर्ड क्रिएट करण्यासाठी विचारले जाईल, तेथे दिलेली माहिती वाचून त्याप्रमाणे तुमच्या लक्षात राहील असा पासवर्ड टाकून कन्फर्म करून घ्या.
तुमचा पासवर्ड क्रिएट होईल.
१०. पासवर्ड बनवून झाल्यानंतर- Password Update Successfully Click Here to Login या पर्यायावर क्लिक करा.
पुढे लॉगिन पेज ओपन होईल.
लॉगिन पेज मध्ये तुमचा इन्शुरन्स क्रमांक तयार केलेला पासवर्ड आणि कॅपचा कोड टाकून लॉगिन करा.
आता नवीन पेज ओपन होईल त्यावरती बरेच पर्याय दिसतील यापैकी Update Particulars या पर्यायावर क्लिक करा.
v
त्यानंतर पुढील पेजवर तुमची सगळी डिटेल तुम्हाला पाहता येईल यामध्ये पर्सनल डिटेल, डिस्पेन्सरी डिटेल, ॲड्रेस डिटेल, नॉमिनी डिटेल, फॅमिली डिटेल आणि बँक डिटेल सर्व माहिती तुम्हाला पाहता येईल.
त्यानंतर तुम्हाला जी डिटेल अपडेट करायची आहे त्या पर्यायावर क्लिक करून Edit Particulars वर क्लिक करा.
तुमची डिटेल अपडेट करून तेथे विचारलेले डॉक्युमेंट अपलोड करून सबमिट करा.
ESIC Website – https://www.esic.gov.in/
ESIC CIRCULAR – N-16011/3/2022-BFT-II Date 22/12/2022 नुसार तुम्ही एडिट किंवा अपडेट साठी टाकलेली रिक्वेस्ट ही वरील सर्क्युलर प्रमाणे तीन दिवसात एप्रूव्हल झाली पाहिजे. तीन दिवसात तुमच्या रिक्वेस्ट ला एप्रूव्हल मिळाले नाही तर तुम्ही CPGRAM portal ला तुमची तक्रार नोंदवू शकता.
असेच इतर योजनांचे अपडेट जाणून घेण्यासाठी कोकण कल्चर ला नक्की फॉलो करा तसेच How to change ESIC details online लेख कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा.
How to change ESIC details online
हे देखील वाचा