Vinod Kambli Net Worth : भारतात क्रिकेटचे खूप सारे चाहते आहेत, क्रिकेट हा बऱ्याच जणांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. मॅच असेल त्या दिवशी तासंतास ठाण मांडून बसणारे देखील खूप सारे आहेत. अशाच या क्रिकेट विश्वातील एका दिग्गजाची ही गोष्ट.
भारतीय क्रिकेट विश्वातील क्रिकेटर विनोद कांबळी यांना तर आपण सगळे ओळखतोच, सचिन तेंडुलकर यांच्या प्रमाणे प्रसिद्धीच्या झोतात असलेला हा क्रिकेटर आज खूप दयनीय अवस्थेत आपले जीवन जगत आहे. सोशल मीडियावर नुकतीच एक क्लिप वायरल होत आहे ज्यामध्ये विनोद कांबळे सर एकदम दयनीय अवस्थेत दिसत आहेत काही लोकांचा आधार घेऊन ते चालताना दिसत आहेत. त्यांची अशी अवस्था पाहून सगळेजण हैराण झाले आहेत. एक वेळ अशी होती की सचिन तेंडुलकर यांच्यापेक्षाही विनोद कांबळे यांना उत्तम खेळाडू असे मानले जात होते.
Vinod Kambli Net Worth : वेळ कधी बदलेल हे कोणालाही सांगता येत नाही. प्रत्येकाच्या जीवनात अनेक चढ-उतार असतातच आणि त्याच्यातून बरेच काही शिकायला देखील मिळते. भारतीय क्रिकेट विश्वातील दिग्गज अशाच एका गोष्टीमुळे चर्चेत येत आहेत. ते दुसरे तिसरे कोणीही नसून भारतीय क्रिकेटर विनोद कांबळी हे आहेत, विनोद कांबळी यांनी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली तेव्हा त्यांना सचिन तेंडुलकर यांच्या पेक्षाही उत्तम मानले जात होते, पण वेळेचे चक्र असे काही फिरले की सगळी परिस्थितीच बदलून गेली. सचिन तेंडुलकर यांचे जिवलग मानले जाणारे विनोद कांबळी त्यांची परिस्थिती आज इतकी बिकट आहे की त्यांना दुसऱ्याच्या आधाराने चालावे लागत आहे.
Vinod Kambli Net Worth
Vinod Kambli Net Worth : विनोद कांबळी हे भारतासाठी अनेक विजयी मालिका खेळले आहेत. त्यांची एकूण संपत्ती त्यावेळेस १ ते १.५ मिलियन डॉलर इतकी होती. २०२२ नंतर त्यांची वार्षिक कमाई चार लाख रुपये पर्यंत येऊन पोहोचली. आणि आता त्यांची परिस्थिती अशी आहे की बीसीसीआय कडून मिळणारी ३०,०००/- रुपये मासिक पेन्शन यावर त्यांना त्यांचे घर चालवावे लागत आहे.
क्रिकेट पासून लांब झाल्यानंतर काही काळ त्यांना क्रिकेट कॉमेंट्री, जाहिराती याच्यातून चांगले उत्पन्न मिळत होते, पण वेळेनुसार त्यांची कमाईची साधने कमी होत गेली, व्यसनामुळे आणि कोरोना काळानंतर त्यांची परिस्थिती खूप बिघडली. सोशल मीडियावर वायरल झालेला विनोद कांबळे पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले.
असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी कोकण कल्चर नक्की फॉलो करा.