Vinesh Phogat Retirement : पॅरिस ऑलिंपिक २०२४ मध्ये वेगवेगळ्या खेळांची चालू असलेली धामधूम आणि येणाऱ्या अनेक बातम्या तसेच देशाच्या योगदानात खेळाडूंनी मिळवलेली पदके, केलेली दमदार कामगिरी, आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेले आपल्या देशाचे प्रतिनिधित्व या सगळ्यांमुळे आपल्या खेळाडूंना देशभरातून भरभरून प्रतिसाद आणि शुभेच्छा मिळत आहेत.
या पॅरिस ऑलिंपिक २०२४ मध्ये कुस्ती या प्रकारात भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगट हिने दमदार कामगिरी करत उपांत्य फेरीत देखील प्रतिस्पर्ध्याचा 3/2 ने पराभव केला. अशी दमदार कामगिरी करून तिने अंतिम लढतीत प्रवेश देखील मिळवला पण अचानक अपात्रतेच्या निर्णयामुळे तिला ही फायनल खेळता आली नाही. ५० किलो वजनी गटामध्ये कुस्ती या प्रकारात ती भारताचे प्रतिनिधित्व करत होती व चांगली कामगिरी देखील तिने केली. तिची कामगिरी पाहता ती सुवर्णपदका पासून एक पाऊल दूर असताना आलेल्या धक्कादायक आणि अविश्वसनीय निर्णयामुळे तिला या अंतिम लढतीतून माघार घ्यावी लागली.
५० किलो वजनी गटात नियमापेक्षा १०० ग्रॅम वजन अधिक आढळल्याने तिला अंतिम लढतीत दाखल होऊनही अपात्र करण्यात आले.
सर्व स्तरातून या निर्णयाचा निषेध करण्यात आला. यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया देखील मांडल्या.
Vinesh Phogat Retirement – कुस्ती मधून घेणार निवृत्ती
या सर्व प्रकारानंतर विनेश ने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट करत निवृत्तीची घोषणा केली, तिचा हा निर्णय संपूर्ण भारतीयांना धक्का देणारा होता.
तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की “आई, माझ्याकडून कुस्ती जिंकली, मी हरले, माफ करा, तुझे स्वप्न, माझे धैर्य, सर्व काही तुटले आहे. आता माझ्याकडे यापेक्षा जास्त ताकत नाहीये. कुस्ती 2001-2024 अलविदा, मी ऋणी राहीन.
असे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान विनेश फोगट ने निवृत्ती जाहीर केली असली तरी बहीण बबीता फोगट ने असे म्हटले आहे की ती भारतात परतल्यानंतर वडील महावीर फोगट तिच्यासोबत चर्चा करतील.
तसेच ५० किलो वजनी गटातील फ्री स्टाइल कुस्ती प्रकारात विनेशला रौप्य पदक देण्यात यावे अशी देखील मागणी जोर धरू लागली आहे.
अपात्रतेच्या निर्णयावर सुनावणी
पॅरिस ऑलिंपिक 2024 मध्ये घेण्यात आलेल्या या अविश्वासनीय निर्णयावर आता काय तोडगा निघतो हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे, Vinesh Phogat ला पहिला दिलासा मिळाला, ( Court of Arbitration for Sport ) ऑर्बिटेशन फॉर स्पोर्ट ने Vinesh Phogat चा अर्ज स्वीकारला असून CAS ने अर्ज स्वीकारला असून त्यावर सुनावणी करण्यासाठी वकिलाची नियुक्ती करण्यास सांगितले तसेच या अर्जावर १३ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.
असेच अपडेट जाणून घेण्यासाठी कोकण कल्चर ला नक्की फॉलो करा.