Fanas Sandan Recipe in Marathi :
कोकणातील निसर्ग जसा स्वर्गाची अनुभूती देणारा आहे. येथील निसर्गात कमालीची विविधता आढळून येते. प्रत्येक पट्ट्यात निसर्गाचं एक आगळे वेगळे रूप आपणास पहावयास मिळते. कोकणातील माणूस हा पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे. निसर्गात वेगवेगळ्या ऋतूत मिळणाऱ्या विविध नैसर्गिक भाज्या, कंदमुळे, फळभाज्या यांचा समावेश कोकणी माणसाच्या जेवणामध्ये असतो.
मित्रांनो कोकण म्हटला की आपणास आठवतात ते आंबे, फणस, नारळी-पोफळीच्या बागा, करवंदाच्या जाळ्या, आणि निसर्गाचे मनमोहक रूप. कोकण जितका सुंदर आहे, तितकीच संपन्न येथील खाद्य संस्कृती आहे. येथील निसर्गात मिळणाऱ्या किंवा येथे पिकणाऱ्या पिकांपासून, फळांपासून वेगवेगळे चविष्ट पदार्थ बनवले जातात. जे जगाच्या पाठीवर इतर कुठेही पहावयास मिळत नाहीत. तांदळाच्या पिठापासून बनवलेले घावणे आणि चटणी, तांदळाच्या शेवया आणि नारळाचे दूध, फणसाची भाजी, आंब्याचे लोणचे, मुरांबा, आवळा सुपारी, आवळा मावा असे नानाविध चविष्ट पदार्थ कोकणात बनवले जातात. आज आपण अशाच एका पदार्थाची झटपट तयार होणारी पाककृती – फणसाचे सांदण या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.
फणस वरून ओबडधोबड आणि काटेरी दिसणारा फणस आतून खूप रसाळ आणि गोड असतो. फणसाचे सांदण, फणसापासून बनवली जाणारी ही पाककृती पाहु. कोकणात हा पदार्थ घरोघरी बनवला जातो. कोकणपट्टी आणि गोवा या भागांमध्ये हा पदार्थ खूपच प्रसिद्ध आहे.
पाककृती साठी लागणारा वेळ – ३० मिनिटे | ४ व्यक्तींसाठी
Fanas Sandan Recipe in Marathi
साहित्य
- १०-१२ पिकलेले फणसाचे गरे
- १ वाटी तांदूळ (मिक्सरला बारीक केलेला तांदळाचा रवा)
- १/२ वाटी बारिक चिरलेला गुळ / साखर
- १/२ वाटी किसलेले ओले खोबरे
- १ टेबल स्पून वेलची पावडर
- १/२ टेबल स्पून हळद
- २ टेबल स्पून तूप
- चवीनुसार मीठ
- १/४ टेबल स्पून खाण्याचा सोडा
कृती
- सर्वप्रथम फणसाच्या बिया काढून घ्या.
- आता मिक्सर मध्ये फणसाचा गरे, १/२ वाटी किसलेले खोबरे, गुळ/ साखर, वेलची पावडर मिक्स करून घ्या. छान आता फणसाचा रस तयार होईल.
- मंद आचेवर गॅस ठेवून, एका पॅनमध्ये २ टीस्पून तूप घेऊन त्यामध्ये तांदळाचा रवा भाजून घ्या. रवा थोडा लालसर झाल्यावर त्यामध्ये हळद टाकून मिश्रण एकजीव करून घ्या. व मिश्रण थंड करून घ्या.
- फणसाच्या रसामध्ये भाजलेला तांदळाचा रवा मिक्स करून (१०-१५ मिनिटे) हे मिश्रण भिजत ठेवा.
- आता या मिश्रणामध्ये १/४ टेबल स्पून खाण्याचा सोडा मिक्स करून घ्या.
- एका पसरट भांड्यामध्ये थोडे तूप लावून त्यामध्ये हे सर्व मिश्रण पसरवून घ्या. व पंधरा मिनिटे हे मिश्रण वाफेवरती वाफवून घ्या. व थंड झाल्यावर त्याचे बर्फी सारखे तुकडे करून सर्व्ह करा.
- तुमच्याकडे इडलीचे भांडे असल्यास ते भांडे देखील तुम्ही वापरू शकता छान इटली सारखे गोल गोल सांधण त्यावर देखील तयार करता येतात.
- झटपट आणि कमी वेळामध्ये तयार होणारे फणसाचे सांदण तुम्ही दुधासोबत किंवा तुपा सोबत सर्व्ह करू शकता.
मित्रांनो ही रेसिपी या उन्हाळ्यात नक्की ट्राय करा. आणि सदर Fanas Sandan Recipe in Marathi पाककृती कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. कोकणातल्या दर्जेदार पारंपारिक पाककृतींचे अपडेट मिळवण्यासाठी आमचे पेज कोकण कल्चर नक्की फॉलो करा.
Fanas Sandan Recipe in Marathi | Fanas Sandan Recipe in Marathi | Fanas Sandan Recipe in Marathi
हे देखील वाचा
Shevga Recipes शेवग्याच्या झटपट तयार होणाऱ्या पौष्टिक रेसिपी
Pingback: Jackfruit Fries Recipe | तळलेले फणसाचे गरे