Bajaj Pulsar NS 400z info in Marathi |बजाज ने लॉन्च केली NS ची सक्सेसर NS 400z जाणून घ्या किंमत आणि सगळे अपडेट

Bajaj Pulsar NS 400z info in Marathi : भारतीय बाजारपेठेत बजाज ने सर्वसामान्य परवडतील अशा किमतमध्ये दर्जेदार स्पोर्ट बाईक लॉन्च करून आपले असे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे, अगदी प्लॅटिना पासून ते अगदी डोमिनार पर्यंत अशा दर्जेदार बाईक भारतीय बाजारपेठेतील लॉन्च करून टू व्हीलर मार्केटमध्ये आपले स्वतःचे असे स्थान पक्के केले आहे. बजाज ऑटोच्या अनेक मोटरसायकल भारतीय रस्त्यांवर आपणास पहावयास मिळतात त्यामध्ये प्लॅटिना, डिस्कवर, पल्सर सिरीज, टुरिंग सिरीज मध्ये डोमिनार अशा सर्वसामान्यांना परवडणाऱ्या बाईक १०० सीसी ते ४०० सीसी अशा बऱ्याच पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत.

Bajaj Pulsar NS 400z info in Marathi
Bajaj Pulsar NS 400z info in Marathi

अलीकडेच बजाज ऑटो ने आपली नेकेड स्ट्रीट(NS) सिरीज मधील एन एस २०० ची सक्सेसर एन एस ४०० झेड हिच्या लॉन्च ची घोषणा केली. बजाजची पल्सर सिरीज ही गेल्या दोन दशकांपासून भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

बजाजच्या स्पर्धात्मक किमती आणि सहज उपलब्ध होणारे स्पेअर पार्ट यामुळे इतर कंपन्यांच्या तुलनेत बजाज वरचढ ठरते.

एन एस ची सक्सेसर म्हणून लॉन्च केलेल्या Bajaj Pulsar NS 400z ची एक्स शोरूम किंमत ही १.८५ लाख इतकी असून त्या बाईकमध्ये अजून कोणत ते कोणते फीचर्स मिळतात? कोणत्या बदलांसह ही मोटरसायकल भारतीय बाजारपेठेत बजाज आणत आहे हे आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत.

Bajaj Pulsar NS 400z info in Marathi फीचर्स आणि किंमत

एन एस २०० अभूतपूर्व यशानंतर आता बजाजने एन एस ४०० झेड ही अत्याधुनिक फीचर्स असलेली बाईक लॉन्च केली आहे. बजाज पल्सर सिरीज मधील सर्वात शक्तिशाली बाईक म्हणून या बाईक कडे पाहिले जाईल. Bajaj Pulsar NS 400z ची साधारणतः एक शोरूम किंमत १.८५ ते २ लाख रूपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. ही किंमत वाढूही शकते. या अत्याधुनिक मोटरसायकलमध्ये ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम जी स्विच करण्यायोग्य असेल शिवाय यामध्ये मल्टिपल रायडिंग मोड स्पोर्ट, रेन, रोड आणि ऑफ रोड असे चार मोड मिळतील. एलईडी लाइटिंग, टर्न बाय टर्न नेवीगेशन साठी स्वतंत्र डिस्प्ले, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी ऑफर करण्यात आली आहे. Bajaj Pulsar NS 400z च्या बुकिंग साठी ग्राहकांना कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून किंवा अधिकृत डीलर कडून बुक करता येईल. ५००० रुपये भरून तुम्ही बाईक बुकिंग करू शकता.

Bajaj Pulsar N250 info in Marathi

Bajaj Pulsar NS 400z info in Marathi
Bajaj Pulsar NS 400z

Bajaj Pulsar NS 400z डिझाईन

बजाजच्या या नेकेड स्ट्रीट बाईक मध्ये आपणास मस्कुलर लुक मिळतो जो पल्सर एन एस २०० वरून घेण्यात आला आहे, नवीन ग्राफिक्स, गोल्डन अपसाईड डाऊन सस्पेन्शन तसेच मागे मोनोशाॅक्स, युनिक डिझाईन यामुळे चांगला रोड प्रेसेन्स Pulsar NS 400z ऑफर करते. हेडलॅम्प, इंडिकेटर, एलईडी डीआरएल इ. देण्यात आले आहे. तसेच यामध्ये १४०/७० टायर ऑप्शन दिला आहे. तसेच एन एस २०० सारखी फ्लॅट सीट मिळते. चार वेगवेगळ्या रंगांमध्ये बजाजने या बाईकला लॉन्च केले आहे तसेच कलर एलसीडी डॅशबोर्ड दिला आहे.

इंजिन

बजाज पल्सर एन एस ४०० मध्ये जे इंजिन ऑफर करण्यात आले आहे ते इंजिन डॉमिनार ४०० मध्ये देखील सेम इंजिन मिळते तेच इंजिन यामध्ये देण्यात आले आहे. हे इंजिन ३७३ सीसी सिंगल सिलेंडर, लिक्विड कॉल इंजिन आहे जे ८८०० आरपीएम वर ३९.५ बीएचपी, ६५०० आरपीएमवर ३५ एन एम टॉर्क जनरेट करते. इंजिनला सहा स्पीड गिअर बॉक्स सह असिस्ट आणि स्लीपर क्लच देखील ऑफर केला आहे. ही बाईक १५४ किमी प्रति तास कमाल वेग गाठण्यास सक्षम आहे.

कलर पर्याय

ग्लॉसी रेसिंग रेड
ब्रूकलीन ब्लॅक
पर्ल मेटालिक व्हाईट
प्युटर ग्रे
Bajaj Pulsar NS 400z info in Marathi

Bajaj Pulsar NS 400z ची स्पर्धा ही केटीएम ३९० सोबत असेल, किमतीच्या दृष्टीने पाहिल्यास केटीएम ड्युक ३९० ही बजाज पल्सर एन एस ४०० पेक्षा दुप्पट महाग आहे. भारतीय बाजारपेठेत आता ग्राहकांचा प्रतिसाद कसा मिळतो हे प्रत्यक्ष विक्री सुरू झाल्यानंतरच कळू शकेल सदर लेखांमध्ये Bajaj Pulsar NS 400z या बाईक विषयी संपूर्ण सविस्तर माहिती दिली आहे. असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी कोकण कल्चर ला नक्की फॉलो करा तसेच हा लेख कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा.

बजाज ऑटो ऑफिशियल वेबसाईट क्लिक करा

हे देखील वाचा.

Tata Altroz 2024 info in Marathi

Bajaj Pulsar N250 info in Marathi

Xiaomi SU 7 ev info in Marathi जाणून घ्या सगळे अपडेट.

New Ferrari Purosangue information in Marathi

New Mahindra Thar 5 door

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Lavasa city बद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? Saurabh Netravalkar पाकिस्तानला गुडघे टेकायला लावणारा भारतीय वंशाचा क्रिकेटर. Tejashree Pradhan हिचा सिनेसृष्टीतील प्रवास World Environment Day: A Call to Action Who is Kavya Maran?