Atal Pension Yojana in Marathi

Atal Pension Yojana, अटल पेन्शन योजना, APY, ATAL PENSION SCHEME, NPS, Atal Pension Yojana in Marathi

Atal Pension Yojana
Atal Pension Yojana

Atal Pension Yojana ही असंघटित क्षेत्रासाठी भारत सरकार द्वारा चालवली जाणारी एक महत्त्वाची योजना आहे. २०१५ च्या अंदाज पत्रका दरम्यान या योजनेचा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी उल्लेख केला होता. ९ मे २०१५ रोजी मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचे शुभारंभ करण्यात आला. २०१०-११ मध्ये सुरु झालेल्या ‘स्वावलंबन योजनेचे’ अटल पेन्शन योजनेत विलीनीकरण करण्यात आली. पुढील योजना ही वय वर्ष १८ ते ४० वयोगटातील सर्व व्यक्तींसाठी आहे, या. भारतभर सुमारे एकूण लोक संख्येच्या ११ % लोक हे भारत सरकारच्या कोणत्या न कोणत्या पेन्शनचा दरमहा लाभ घेत आहेत. अटल पेन्शन योजनेद्वारे ही संख्या अधिक वृद्धिंगत करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन नुसार (२०११-१२) मध्ये एकूण रोजगारीत ४७.२९ कोटी लोकांपैकी ८८% असंघटीत कामगार आहेत. या असंघटीत कामगारांसाठी या योजनेत हप्त्याची रक्कम ही कमीत कमी ४२ रुपये ते जास्तीत जास्त १४५४ रुपये इतकी असून ही रक्कम लाभार्थ्याच्या वया नुसार तसेच त्याच्या आर्थिक क्षमतेवर अवलंबून आहे. लाभार्थ्याला ६० वर्षे वयानंतर त्यावर आधारित पेन्शन १००० ते ५००० रु दरमहा मिळणार आहे. तसेच लाभार्थ्याच्या वारसदाराला १.७ लाख रु . ते ८.५ लाख रु एक रकमी लाभ मिळणार आहे. ही एक ऐच्छिक, परिभाषित योगदान पेन्शन योजना आहे, जी राष्ट्रीय पेन्शन प्रणाली – NPS National Pension Scheme अंतर्गत पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण {PFRDA} द्वारे प्रशासित केली जाते. या योजने या योजनेस माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देऊन योजनेचे नाव अटल पेन्शन योजना असे करण्यात आले. या योजने मार्फत सरकार लोकांच्या वृद्धापकाळातील उत्पनाच्या बाबतीतली तरतूद म्हणून या योजनेवर काम करत आहे. या योजनेत सामील होण्याचे वय हे वय वर्ष १८ ते वय वर्ष ४० आहे, तसेच या योजनेत कमीत कमी किमान २० वर्ष पैसे भरणे आवश्यक आहे. त्यानंतर ठराविक रक्कम पेन्शन स्वरूपात देण्याची हमी सरकार स्वतः घेते.

अटल पेन्शन योजना उद्दिष्टे

  • या योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट असंघटित क्षेत्रातील कामगारांना नियमित निवृत्ती वेतन देणे हे आहे.
  • कामगारांना त्यांना भविष्यात सेवानिवृत्तीसाठी बचत करण्यासाठी प्रोत्साहित करून त्यांना आर्थिक साक्षर करून सुरक्षिततेची भावना प्रदान करणे.
  • समाजातील सर्व कमी उत्पन्न गटांपर्यंत पोहोचणे तसेच त्यांना वृद्धापकाळात सुरक्षित आर्थिक आधार देणे.
  • वृद्धापकाळात लोकांना आत्मनिर्भर बनविणे.
  • असंघटीत क्षेत्राचा पेन्शन मधील सहभाग वाढवून व त्यांना निवृत्ती पाश्चात दरमहा ठराविक वेतन सुरु करणे.
  • लोकांना बचतीची सवय लावून वृद्धापकाळ सुरक्षित करणे.

अटल पेन्शन योजनेची वैशिष्ट्ये

१. अटल पेन्शन योजना वय वर्ष १८ ते ४० वयोगटातील सगळ्या भारतीय नागरिकांसाठी खुली आहे. या योजनेत लाभार्थी किंवा सामील होण्यासाठी, अर्जदाराकडे स्वतःचे बचत बँक खाते आणि आधार क्रमांक असणे आवश्यक आहे.

२. पेन्शन : सरकार या योजनेमार्फत दरमहा निश्चित पेन्शन देते. सदर रक्कम रुपये १००० ते रुपये ५००० प्रति महिना अशी असते. दरमहा मिळणारी पेन्शनची रक्कम ही लाभार्थ्याच्या योगदानाची रक्कम आणि लाभार्थ्याचे वय या या दोन गोष्टींवर अवलंबून असते.

. कालावधी : लाभार्थी वय वर्ष साठ नंतर पेन्शनची रक्कम प्राप्त करणे निवडू शकतो. पेन्शनचा कालावधी निश्चित असून लाभार्थ्याला त्यामध्ये कोणताही बदल करता येत नाही.

. योगदान : लाभार्थ्याचे वय आणि सेवानिवृत्तीनंतर त्यांना मिळणारी पेन्शनची रक्कम यावर आधारित एक योगदानाची रक्कम ठरविली जाते, त्यासाठी योगदान हे मासिक, त्रैमासिक किंवा सहामाही असू शकते. त्याचे निवड स्वातंत्र्य लाभार्थ्याला आहे. लाभार्थी त्याच्या आर्थिक स्थितीनुसार योगदानाची रक्कम ठरवू शकतो. योगदानाची रक्कम ग्राहकाचे वय आणि इच्छित दरमहा पेन्शन रक्कम यावर आधारित निश्चित केली जाते. योगदानाची रक्कम ही अगदी ४२ रुपये ते १४५४ रुपये दरमहा असू शकते. पुढील आधारावर ग्राहकांच्या बचत खात्यातून स्वयं-डेबिट केले जाते. किमान योगदान रक्कम रु. ४२ प्रति महिना आहे.

नामांकन : लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास सदर रक्कम प्राप्त करण्यासाठी नामनिर्देशन केलेले व्यक्ती बँकेला लेखी विनंती सादर करू शकतो.

परतावा : लाभार्थी वय वर्ष ६० पूर्वी कधीही योजनेतून बाहेर पडू शकतो, वय वर्ष साठ पूर्वी बाहेर पडल्यास लाभार्थ्याला केवळ दिलेल्या योगदानाची रक्कम मिळते, तसेच त्यावर कोणतेही व्याज मिळत नाही.

शासनाचे योगदान : सरकार लाभार्थी योगदानाच्या ५०% योगदान किंवा ३१ मार्च २०१६ पूर्वी जे लाभार्थी या योजनेत सामील झालेल्या आणि इतर कोणत्याही वैधानिक सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट नसलेल्या लाभार्थ्यांना १००० रुपये प्रतिवर्ष, या दोघांपैकी पैकी जे कमी असेल ते ५ वर्षांच्या कालावधीसाठी. ज्या ज्या लाभार्थ्यांनी जास्त पेन्शनची रक्कम निवडली आहे त्यांच्यासाठी सरकारी सह – योगदान उपलब्ध नसेल.

८. मृत्यू झाल्यास : लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास, लाभार्थ्याचा जोडीदार ही योजना सुरू ठेवू शकतो आणि पेन्शनची रक्कम मिळवू शकतो. जर लाभार्थ्याचा जोडीदार योजना सुरू ठेवू इच्छित नसल्यास, तर जमा झालेला निधी लाभार्थ्याच्या नामनिर्देशित वारसदारास (नॉमिनीला) परत केला जातो.

९. वेळ आधी बाहेर पडणे : लाभार्थी वय वर्ष ६० च्या अगोदर स्वईच्छेने सदर योजनेतून बाहेर पडू शकतात. फक्त मृत्यू किंवा दीर्घ आजाराच्या बाबतीत किंवा अशा प्रकरणां मध्ये, जमा झालेली रक्कम लाभार्थी किंवा नामांकित वारसदार व्यक्तीला परत केली जाईल.

atal pension yojana in marathi

अटल पेन्शन योजनेचे फायदे

सामाजिक सुरक्षा : अटल पेन्शन योजना ही योजना समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना त्यांच्या वृद्धापकाळात निश्चित पेन्शनची रक्कम देऊन सामाजिक सुरक्षा प्रदान करते.

कर कपात : अटल पेन्शन योजनेसाठी केलेले योगदान (भरलेली रक्कम) आयकर कायदा,१९६१ च्या कलम ८० क नुसार कर कपातीसाठी पात्र आहे. लाभार्थ्याने केलेल्या योगदानाच्या रकमेवर मिळणारे व्याज देखील करमुक्त आहे, करातून त्याला सूट देण्यात आली आहे.

योगदान: योगदानाची रक्कम समाजातील निम्न-उत्पन्न गटासाठी परवडणारी आहे. किमान योगदान रक्कम ४२ रुपये प्रति महिना आहे.

हमी : लाभार्थ्याला पेन्शनच्या रकमेची हमी सरकार स्वतः देते आणि ग्राहकाला बाजारातील चढउतार किंवा इतर आर्थिक घटकांबद्दल काळजी करण्याची गरज नसते.

हस्तांतरणीय : सदर योजना लवचिक असून लाभार्थी आपले पेन्शन खाते एका बँकेतून दुसऱ्या बँकेत किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज हस्तांतरित करू शकतो.

अटल पेन्शन योजना आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड

अटल पेन्शन योजना योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे आधार कार्ड आवश्यक आहे. सदर ओळखपत्र भारत सरकार द्वारा जारी केले जाते, या ओळखपत्रामध्ये व्यक्तीचे नाव, पत्ता, जन्म तारीख, लिंग इत्यादी डेटा समाविष्ट असतो. अर्जदाराकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.

बचत बँक खाते

या योजनेत नोंदणी करण्यासाठी अर्जदाराचे बचत बँक खाते असणे आवश्यक आहे. कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकचे असू शकते ते आधार कार्डशी लिंक केलेले असणे गरजेचे आहे.

वयाचा पुरावा

अर्जदाराच्या वयाची पडताळणी करण्यासाठी जन्मतारीख दर्शवणारा पुरावा आवश्यक आहे. वयाचा पुरावा जन्म प्रमाणपत्र, किंवा अर्जदाराचे वय दर्शवणारे इतर डॉक्युमेंट. नोंदणी करण्याचे किमान वय १८ वर्षे ते वय वर्ष ४० आहे.

उत्पन्न प्रमाणपत्र

सदर योजने अंतर्गत सह-योगदानासाठी पात्र अर्जदारांसाठी उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक आहे. ज्या अर्जदारांचे वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपयांपेक्षा कमी किंवा समान आहे. त्यांच्यासाठी सरकारी सह-योगदान उपलब्ध आहे. उत्पन्नाची पडताळणी करण्यासाठी उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक आहे.

नामांकन अर्ज

अर्जदाराचा मृत्यू झाल्यास पेन्शनची रक्कम मिळेल, अशा व्यक्तीचे नामनिर्देशन करण्यासाठी नॉमिनेशन फॉर्म आवश्यक आहे.अर्जदाराच्या कुटुंबातील कोणताही सदस्य असू शकतो.

मोबाईल क्रमांक

नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ओ.टी.पी. प्राप्त करण्यासाठी मोबाइल नंबर आवश्यक आहे. अर्जदाराच्या आधारकार्डशी मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे.प्राप्त संदेशामध्ये योजने योजनेचा तपशील असेल.

बँक पासबुक

बँक खात्याच्या तपशीलाची पडताळणीसाठी बँक पासबुक आवश्यक आहे.

स्वयं-घोषणा पत्र

सरकारी योगदानासाठी पात्रता निकष घोषित करण्यासाठी स्वयंघोषणा फॉर्म आवश्यक आहे. स्वयंघोषणा फॉर्मवर लाभार्थ्याची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे तसेच त्यात लाभार्च्याथ्या वार्षिक उत्पन्नाचा तपशील आवश्यक आहे.

पासपोर्ट साईझ फोटो

नाव नोंदणी प्रक्रियेसाठी पासपोर्ट साईझ फोटो आवश्यक आहे. फोटो अलीकडील आणि स्पष्ट आवश्यक आहे.

इतर कागदपत्रे

अर्जदाराची ओळख आणि पत्ता पडताळण्यासाठी अर्जदाराचे नाव आणि पत्ता असलेले मान्यताप्राप्त कागदपत्रे आवश्यक आहेत.

अर्ज प्रक्रिया

ऑफलाईन अर्ज प्रक्रिया

ऑफलाइन अर्ज प्रक्रियेमध्ये जवळच्या बँक किंवा पोस्ट ऑफिसला भेट देऊन अर्ज भरू शकता.

पायरी १ – जवळच्या बँकेच्या शाखेला किंवा पोस्ट ऑफिसला भेट द्या.

अर्ज करण्यासाठी अर्जदार या योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या बँका किंवा पोस्ट पैकी निवड स्वातंत्र अर्जदाराला असते, ते कोणत्याही पोस्ट किंवा बँकेची निवड करू शकतात.

पायरी २ – अर्ज गोळा करा.

बँकेच्या शाखेत किंवा पोस्ट ऑफिस मधून, अर्जदाराने अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज घेणे आवश्यक आहे. अर्जाचा फॉर्म विनामूल्य उपलब्ध असतो.

पायरी ३ – अर्ज भरा.

अर्जदाराने सर्व आवश्यक तपशीलांसह अर्ज भरणे आवश्यक आहे. वैयक्तिक तपशील नाव, पत्ता, जन्मतारीख आणि बँक खाते इत्यादी सर्व माहिती भरणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त, अर्जदाराने पेन्शन रक्कम आणि सेवानिवृत्तीचे वय निवडणे आवश्यक आहे.

पायरी ४ – आवश्यक कागदपत्रे जोडा

अर्ज भरल्यानंतर, आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे जसे की ओळखपत्र , पत्ता आणि वय यांचा पुरावा इ.

पायरी ५ – अर्ज सबमिट करा.

अर्ज भरल्यानंतर आणि आवश्यक कागदपत्रे जोडून, बँकेच्या शाखेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

पायरी ६ – पोहोच पावती घ्या.

एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर, अर्जदाराला पावती मिळेल. त्यामध्ये ग्राहकाचे नाव, प्राण नंबर(PRAN) आणि ग्राहकाने निवडलेली पेन्शन असते.

अटल पेन्शन योजना फॉर्म क्लिक करा.

अटल पेन्शन योजना क्लिक करा.

दंड Atal Pension Yojana in Marathi

१. अटल पेन्शन योजनेत सदस्यांना वर्गणी मासिक हप्त्यात भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.

२. उशीर झाल्यास दंड घेण्याचा अधिकार आहे, ही रक्कम १ रुपया ते १ रुपये प्रति महिना असते.

३. १ रुपये प्रती महिना १०० रुपये साठी

४. २ रुपये प्रती महिना १०१ ते ५०० रुपये साठी

५. ५ रुपये प्रती महिना ५०१ ते १००० रुपये साठी

६. १० रुपये प्रती महिना १००० रुपये किंवा त्यावरील रक,एसाठी

७. अशी दंडाची रक्कम मूळ जमा रकमेतून वजा केली जाते.

८. वर्गणी जमा करणे बंद केल्यास – सहा महिन्यात खाते बंद करण्यात येईल.बारा महिन्या नंतर खाते निष्क्रिय करण्यात येईल.२४ महिन्या ( ) नंतर खाते बंद करण्यात येईल.

आयुष्मान भारत योजना

मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना

सुकन्या समृद्धी योजना

सौर कृषी पंप योजना

Join our Whats app Group Click Here

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

o
Scroll to Top