Abhay Singh Viral BABA Kumbh Mela | Abhay Singh Viral BABA | IITANS who become a monk | Viral IIT baba | Abhay Singh
Abhay Singh Viral BABA Kumbh Mela : आयुष्यात पैसा आणि भौतिक सुखाला सर्वकाही मानणारे आपण बरेच जण पाहिले असतील. भौतिक सुखाच्या मागे पळणारे देखील आपण बरेच पाहतो. पण आज एका अशाच व्यक्ति बद्दल आपण जाणून घेणार आहोत जे कुंभमेळ्यामध्ये चर्चेचा विषय बनले आहेत. सगळीकडे त्यांची चर्चा होताना दिसत आहे.

Abhay Singh Viral BABA Kumbh Mela
Abhay Singh अभयसिंह यांची अलीकडेच एक मुलाखत वायरल झाली. आयुष्याचे सत्य जाणून घेण्याच्या जिज्ञासे पोटी त्यांनी सर्व भौतिक सुखाचा आणि कुटुंबीयांचा त्याग करून आयुष्याचे सत्य जाणून घेण्यासाठी अध्यात्मिकतेचा मार्ग स्वीकारला.
कुंभमेळ्यात एका वृत्तवाहिनीशी बोलताना अभय म्हणाले की ते कुंभमेळ्यात फक्त शिकण्यासाठी आणि नवीन अनुभव घेण्यासाठी आले आहेत ते कुठल्याही आखाड्याशी संबंधित नाही. त्यांना फक्त आयुष्याचे सत्य जाणून घ्यायचे आहे. यासाठी त्यांनी भक्तीच्या मार्गावर कूच करण्याचे ठरवले. मूळ हरियाणाचे रहिवासी असलेले अभय सिंह यांनी आयआयटी मुंबई मधून एरोनॉटिकल इंजीनियरिंग चे शिक्षण घेतले आहे. चांगले पॅकेज, प्रदेशात नोकरी आणि सर्व भौतिक सुख सोयी असताना देखील आयुष्याचे सत्य नेमके काय आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांनी भक्ती मार्गावर चालून बाबा होण्याचा निर्णय घेतला, आयआयटीमध्ये भल्याभल्यांना ऍडमिशन मिळत नाही. अशा सर्वोच्च संस्थेत शिक्षण घेऊन हा मार्ग निवडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
हे देखील वाचा – चीन मध्ये एचएमपीव्ही उद्रेक
Abhay Singh यांना घरच्यांनी आणि समाजाने देखील वेड्यात काढल्यानंतर त्यांनी हा मार्ग स्वीकारला. आयुष्यात नेमके काय हवे आहे ? काय करता येईल ? मनाला सुख मिळेल का ? अशा नानाविध प्रश्नामुळे ते डिप्रेशन मध्ये गेले. कुठेच त्यांचे मन लागे नासे झाले. त्यानंतर त्यांनी मानसशास्त्राचा अभ्यास करून पुढे श्रीकृष्ण बद्दल वाचन सुरू केले व पुढे अध्यात्माकडे वळले.
त्यांनी त्यांचे राहते घर सोडून जगभर प्रवास केला, पायी यात्रा केल्या, अनेक पवित्र स्थळांना भेटी देऊन शेवटी काशीला गेले व तिथून पुढे त्यांनी अध्यात्माचा मार्ग स्वीकारला.
सोशल मीडियावर सर्वत्र अभय सिंह यांचीच चर्चा होताना दिसत आहे.