Fateh Movie Review | Fateh Movie Marathi Review | Sonu Sud new movie | Fateh Movie Review in Marathi

Fateh Movie Review : मागील आठवड्यात बॉलीवूड अभिनेता सोनू सूद यांचा फतेह हा सिनेमा प्रदर्शित झाला. बरेच दिवसानंतर सोनू सूद मुख्य भूमिकेत चाहत्यांसमोर आला. कोविड काळात सोनू सूद च्या कार्याची बरीच चर्चा झाली. सामान्य माणसांचा मसीहा बनला.
सोनू सूद ने पहिल्यांदाच दिग्दर्शनात पदार्पण केले. त्याचा हा चित्रपट नेमका कसा आहे हे जाणून घेऊ.

फतेह चित्रपटाची कथाही पंजाब मधील एका छोट्याशा गावातून सुरू होते. फतेह म्हणजेच सोनू सूद त्याचा स्वतःचा दूध डेरीचा व्यवसाय चालवतो. कुटुंब नसल्याने तो निम्रित कडे भाडेतत्त्वावर राहतो. निम्रित व्यवसायातील लोकांना कर्ज या ॲपद्वारे कर्ज मंजूर करण्यास मदत करते आणि अशा प्रकारे या चित्रपटाच्या कथेला सुरुवात होते लोकांना या बनावट कर्ज ॲप वरून कर्ज मिळते परंतु त्यावरील व्याज जास्त असल्याने लोक त्याची परतफेड करताना उशीर वगैरे झाल्यास कर्ज ॲपच्या मास्टर माईंड कडून त्यांना धमक्या येत. अनेक धमक्या आल्याने लोकांकडून तक्रारी येण्यास सुरुवात झाली. यामुळे निम्रित ही तिचे राहते घर सोडून दिल्लीतील कर्ज ॲपच्या मुख्य कार्यालयात जाते.
यादरम्यान निम्रितची आई फतेह कडे मदत मागते. माहिती काढल्यानंतर फतेहला बनावट कर्ज ॲप आणि सायबर माफीयांच्या टोळी बद्दल कळते. ही टोळी रझा आणि त्याचा साथीदार सत्यप्रकाश यांच्या मार्फत चालवली जाते. निम्रित च्या शोधात फतेह दिल्लीला निघून जातो तेथे हॅकर खुशी ला भेटून दोघे निम्रित चा शोध घेऊन या सायबर गुन्हेगारीच्या सगळ्या प्रकरणाचा पर्दाफाश करतात. या सगळ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पहावा लागेल.

Fateh Movie Review लेखन आणि दिग्दर्शन
सोनू सूदचा हा चित्रपट बऱ्याच काळापासून चर्चेत होता, एका मोठ्या प्रतीक्षेनंतर हा चित्रपट चाहत्यांच्या भेटीस आला आहे. सोनू सूद ने या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. शक्ती सागर प्रॉडक्शन आणि झी स्टुडिओज निर्मित आणि अजय धामा द्वारे सह-निर्मित हा ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात नसीरुद्दीन शाह, जॅकलीन फर्नांडीज, विजय राज आणि दिव्येंदू भट्टाचार्य यांच्यासोबत सोनू सूद स्वतः मुख्य भूमिकेत आहेत.
हे देखील वाचा – पुष्पा २ बॉक्स ऑफिस कलेक्शन
बॉक्स ऑफिस कलेक्शन
सॅकनिल्क च्या अहवालाप्रमाणे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.
पहिल्या दिवशीच बॉक्स ऑफिसवर २.४ कोटी ची कमाई केली. तसंच संपूर्ण आठवडाभरात ९.२ कोटींची कमाई केली.
हे देखील वाचा – कोकण कल्चर