Kokan Yuva Udyojak Lobby : समृद्ध कोकणाचा ध्यास घेऊन तरुणांनी सुरू केलेल्या कोकण युवा सेवा संस्था आयोजित भांडुप मध्ये दिनांक १९ जानेवारी २०२५ रोजी इतर कार्यक्रमा दरम्यान कोकण युवा उद्योजक लॉबीचे अनावरण करण्यात येणार आहे.

Kokan Yuva Udyojak Lobby
कोकणातील उद्योजकांसाठी एक व्यावसायिक मंच उपलब्ध करून देणे आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन कोकणातील बांधवांना एकत्र आणणे. त्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी सामूहिक प्रयत्न करणे, संपर्क वाढवणे. व्यावसायिक नेटवर्क, प्रशिक्षण आणि सभांचे आयोजन, नवीन नवीन तंत्रज्ञान आणि ट्रेंड्स, व्यवसाया संबंधित सुधारणा, सरकारी योजना अनुदाने यांची माहिती इत्यादी कामे या युवा उद्योजक लॉबी तर्फे कोकणातील उद्योजकांसाठी करणार.
उद्योजक लॉबी मार्फत कोकणातील असंघटित उद्योजकांना एक मंच उपस्थित करून देऊन त्याद्वारे त्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी हातभार लावणे हा या उद्योजक लॉबीचा उद्देश असून कोकणातील असंघटित व्यावसायिक बांधवांना प्रवाहात आणणे हे मुख्य लक्ष्य उद्योजक लॉबी पढे आहे.
कोकण युवा सेवा संस्थेच्या वतीने सुरू करण्यात येणाऱ्या कोकण युवा उद्योजक लॉबीचे प्रमुख रुपेश कोलते (श्री स्वामी समर्थ डिस्ट्रीब्यूटर) हे देखील व्यावसायिक असून कोकण युवा सेवा संस्थेच्या कार्यकारणी मध्ये देखील ते सक्रिय आहेत.
कोकण युवा सेवा संस्था ही 2022 पासून सामाजिक बांधिलकी जपत विविध कामे करीत आहे.
या उद्योजक लांबीच्या मार्फत अगदी तळागाळातील असंघटित उद्योजकांपर्यंत पोहोचून त्यांना एक व्यावसायिक मंच उपलब्ध करून देऊन त्याद्वारे सामाजिक उन्नती साधण्याचा उपक्रम कोकण युवा सेवा संस्थेने हाती घेतला आहे.
हे देखील वाचा – कोकण सुंदरी महाअंतिम फेरी २०२५ | कोकण कल्चर
कोकण युवा सेवा संस्थेच्या माध्यमातून दिनांक १९ जानेवारी २०२५ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन हे कोकण नगर व्यायाम शाळेचे पटांगण भांडुप (पश्चिम) येथे करण्यात आले आहे सदर कार्यक्रम हा सायंकाळी ५ वाजता. आयोजित करण्यात आला आहे.
कोकण युवा सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कु. अभिजीत कोटकर, सचिव श्री.अनिल गावडे, उद्योजक लॉबी प्रमुख श्री. रुपेश कोलते, खजिनदार सौ. संजना बेंद्रे. आणि सर्व सदस्य यांच्यामार्फत कोकणकर जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन कोकण युवा सेवा संस्थेद्वारे समस्त कोकणकरांना करण्यात आले आहे.