Samsung Gaming Monitor : प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक्स कंपनी सॅमसंग ने (CES) Consumer Electronics Show कंजूमर इलेक्ट्रॉनिक्स शो च्या अगोदरच एका नवीन मॉनिटरचे अनावरण केले आहे. लॉस वेगास यु एस येथे 7 जानेवारी रोजी होणार आहे. सॅमसंग ने त्यांच्या 2025 मधील स्मार्ट मॉनिटर लाईन ऑफ मधील हा नवीन मॉनिटर सादर केला आहे त्यामध्ये अत्याधुनिक फीचर्स ऑफर करण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने 240Hz रिफ्रेश रेट सह 4K resolution ओलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. गेमर्स आणि कंटिन्यू क्रियेटर्स यांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंग ने हा नवीन मॉनिटर इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्ये सादर केला आहे.
सॅमसंगने सांगितल्या प्रमाणे Odyssey OLED G8 प्रकारातील हा पहिला मॉनिटर आहे ज्यामध्ये 240Hz रिफ्रेश रेट 4K resolution (3840*2160), 165 PPI पिक्सेल, तसेच हा मॉनिटर AMD free sync Premium Pro सपोर्ट सह NVIDIA G कॉम्पिटेबल आहे. यामुळे यावरील आउटपुट हे अतिशय स्मूथ आणि शार्प आहे. जे चांगले व्हिज्युअल प्रदान करण्यास सक्षम आहे.
हे देखील वाचा – विलो कॉन्टम कॉम्प्युटिंग चीप
Samsung Gaming Monitor Odyssey 3D
याव्यतिरिक्त Odyssey सिरीज मधील मॉडेल्स व्यतिरिक्त अजून एक Odyssey 3D गेमिंग मॉनिटर लॉन्च करेल, जो लेंटिक्युलर लेन्सेस आणि कॅमेरासह येईल ज्यावर आपणास थ्रीडी चष्मा शिवाय देखील थ्रीडी अनुभव घेता येईल. या मॉनिटरच्या लॉन्च नंतर गेमर्स ना जरूर आकर्षित करेल.
वरील मॉनिटरच्या लॉन्चिंगची माहिती देताना सॅमसंग ने स्मार्ट मॉनिटर M9, Samsung ViewFinity S8 यांच्या अपडेट बाबत माहिती दिली.
Samsung चा नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन | Starlink Satelite Internet