Kesar Sheti

Kesar Sheti : केशर, ज्याला “किंग ऑफ स्पाइसेस” म्हणून ओळखले जाते, Kesar हे जगातील सर्वात महागडया आणि दुर्मिळ मसाल्यांपैकी एक आहे. भारतातील केशर शेती प्रामुख्याने जम्मू-कश्मीरमध्ये होते, परंतु आधुनिक कृषी तंत्रज्ञानाच्या मदतीने आता कश्मीर व्यतिरिक्त इतर ठिकाणी देखील केशर लागवड करणे शक्य झाले आहे. कमीत कमी जागेत आणि योग्य नियोजन करून तुम्ही तुमच्या घराच्या रूम मध्ये किंवा एखाद्या कंटेनर सारख्या जागेमध्ये केशर शेती करू शकता. या लेखात आपण १०*१० क्षेत्रात Kesar Sheti कशी सुरू करावी, त्यासाठी लागणारे तापमान, फायदे, विपणन आणि कमाई कशी करावी याबद्दल सविस्तर चर्चा करू.

Kesar Sheti
Kesar Sheti

केसर शेतीची पूर्व तयारी Kesar Sheti

केसर हे एक अत्यंत संवेदनशील आणि काळजीपूर्वक लागवड करण्याचे पीक आहे. यासाठी योग्य योजना आखून सुरुवात करणे आवश्यक आहे. केसर लागवडीसाठी योग्य जागेची निवड, मातीची तयारी, बियाण्यांची निवड, तापमानाचे नियोजन, आणि पाण्याची योग्य व्यवस्था या गोष्टी अत्यावश्यक आहेत.

10*10 फूट जागेत केसर लागवड kesar sheti info

जर तुम्हाला घरातून केसर शेतीची सुरुवात करायची असेल, तर 10×10 फूट जागा देखील पुरेशी आहे. या जागेत लागवड करण्यासाठी खालील गोष्टींची काळजी घ्यावी.

केसर लागवडीसाठी हलकी, वालुकामिश्रित आणि उत्तम निचरा होणारी जमीन चांगली असते. केसरच्या कांद्यांची मुळे खोलवर जात नाहीत, त्यामुळे जमिनीचा पोत हलका असावा. जिथे पाण्याचा अडथळा येणार नाही, अशा जागी केसरची लागवड करा.

केसरचे बियाणे म्हणजे ‘कॉर्म्स’ हे छोट्या कांद्याच्या आकाराचे असतात. एक उच्च दर्जाचे कॉर्म्स निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण तेच केसर उत्पादनाच्या गुणवत्तेवर परिणाम करतात. बाजारात केसर कॉर्म्स सहज उपलब्ध असतात. 10×10 जागेसाठी तुम्हाला साधारणपणे 100-150 कॉर्म्स लागतील असें अनेक ट्रे चे लेयर मांडणी मध्ये ठेवून कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन घेता येते.केसरची लागवड साधारण १५ ते २५ अंश सेल्सिअस तापमानात उत्तम प्रकारे होते. जास्त गरम किंवा खूप थंड हवामानात केसर उत्पादन योग्य रीत्या होऊ शकत नाही. हिवाळ्याच्या थंड हवेत केसरला चांगले वातावरण मिळते, त्यामुळे केसर लागवड करताना तापमान नियंत्रण महत्त्वाचे आहे.

केसरच्या रोपांना जास्त पाण्याची गरज नसते. पाण्याचे प्रमाण योग्य राखणे आवश्यक आहे. दररोज पाणी देणे टाळा आणि पाण्याचा निचरा होईल याची खात्री करा, अन्यथा कांदे कुजण्याची शक्यता असते.

हे देखील वाचा – Machal lanja थंड हवेचे नयनरम्य ठिकाण

Kesar Sheti

केसर लागवड प्रक्रिया Saffron Cultivation Process

केसर लागवड साधारण ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात करणे चांगले असते.

पुढील स्टेप्समधून तुम्ही 10×10 फूट जागेत केसर लागवड करू शकता –

2-3 इंच खोल आणि 4-5 इंच अंतरावर खड्डे तयार करा. प्रत्येक खड्ड्यात एक कॉर्म रोपा.

कॉर्म्सना मातीमध्ये योग्यरित्या रोपून त्यांच्यावर हलक्या हाताने मातीचा थर द्या. लागवडीनंतर लगेच पाणी द्या.

केसरच्या झाडांना योग्य सूर्यप्रकाश आवश्यक आहे. त्यामुळे ती जागा अशी निवडा, जिथे पुरेसा सूर्यप्रकाश मिळतो. सावलीत केसर उत्पादन कमी होते.

सुरुवातीच्या काळात नियमित पाणी द्या, मात्र नंतर पाणी कमी करा. पाणी जास्त दिल्यास कॉर्म्स कुजतात आणि पीक वाया जाते.

Kesar Sheti

केसरचे फायदे Kesar Benefits

केसर केवळ मसाला म्हणूनच नाही, तर औषधी गुणधर्मांसाठीही प्रसिद्ध आहे. याचे अनेक आरोग्यविषयक फायदे आहेत.

केसरमधील अँटीऑक्सीडंट्स शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.

केसरमधील घटक मानसिक ताण आणि नैराश्य दूर करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

केसर त्वचेसाठी एक नैसर्गिक औषध आहे. त्वचा उजळवणे, डाग दूर करणे यासाठी केसरचा वापर होतो.

केसरमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे शारीरिक वेदना आणि सूज कमी करण्यास मदत करतात.

केसर उत्पादनानंतरचे व्यवस्थापन

केसरचे फूल साधारणपणे ऑक्टोबरच्या उत्तरार्धात येते. या फूलाच्या किंचित आतमध्ये तीन लाल रंगाचे धागे असतात, ज्याला ‘सॅफ्रॉन स्टिग्मा’ म्हणतात. हे धागे हळूवारपणे काढून घ्यावे लागतात आणि सुकवून ठेवावे लागतात. ही प्रक्रिया काळजीपूर्वक करावी लागते, कारण या धाग्यांचा दर्जा शेवटी केसरच्या गुणवत्तेवर परिणाम करतो.

केसरच्या मार्केटिंग आणि विक्रीचे मार्ग

केसर हे एक महागडे उत्पादन आहे, ज्यामुळे त्याचे विक्रीमार्ग आणि मार्केटिंग योग्यरित्या नियोजित करणे आवश्यक आहे.

तुम्ही स्थानिक बाजारपेठांमध्ये किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे केसर थेट विकू शकता. केसरचे छोटे पॅकेजेस बनवून ग्राहकांपर्यंत पोहोचवणे सोपे होते.

केसरचे आरोग्यविषयक फायदे असल्याने अनेक औषधी आणि कॉस्मेटिक कंपन्या केसर खरेदी करण्यास इच्छुक असतात. त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही मोठ्या प्रमाणात केसर विकू शकता.

अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स केसरचा वापर खाद्यपदार्थांच्या सजावटीसाठी आणि पदार्थांमध्ये चव आणण्यासाठी करतात. त्यामुळे स्थानिक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सशी संपर्क साधून तुम्ही केसर विक्री करू शकता.

आजच्या डिजिटल युगात ऑनलाईन विक्रीचा पर्याय सर्वाधिक फायदेशीर ठरू शकतो. तुम्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर केसरचे उत्पादन विकू शकता.

कमाईचे स्रोत

केसर शेती फायदेशीर ठरते कारण त्याची बाजारातील किंमत खूप जास्त असते. केसरसाठी बाजारात प्रचंड मागणी आहे. तुम्ही 10 x 10 फूट जागेत अनेक लेयर मार्फत साधारण 500 ग्रॅम ते १ किलोपर्यंत घरी केसर उत्पादन करू शकता, जे बाजारात चांगल्या दराने विकले जाऊ शकते. सुरुवातीला उत्पादन कमी असले तरी, योग्य काळजी घेतल्यास हळूहळू उत्पन्न वाढत जाते.(Kesar 1 Kg Rate) १ किलो केसर ची किंमत बाजारात साधारण ३ लाख रुपये इतकी आहे.

केसर शेती ही एक फायदेशीर शेती आहे, जी तुम्ही कमी जागेत आणि कमी गुंतवणुकीत करू शकता. योग्य नियोजन, मातीची तयारी, बियाण्यांची निवड, आणि तापमान नियंत्रणाने तुम्ही घरातूनच केसर उत्पादन करू शकता. केसरचे फायदे आणि विक्रीच्या योग्य संधी ओळखून तुम्हाला चांगले उत्पन्न मिळू शकते.

असेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी कोकण कल्चर नक्की फॉलो करा.

हे देखील वाचा – Papaya Farming in Konkan

प्रसिद्ध गंगा तीर्थ राजापूर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Vinesh Phogat ने जाहीर केली निवृत्ती Golden boy ने रौप्य पदक जिंकत रचला इतिहास Neeraj Chopra Won Silver Medal मराठमोळ्या Avinash Sable ने रचला इतिहास पण मेडल हुकले. Mumbai’s most famous street food Famous places for Monsoon Trip in India