New Kia Carnival : ऑटोमोबाईल सेक्टर मध्ये दिवसेंदिवस होणारी प्रगती आणि एकापेक्षा एक दमदार वाहने बाजारपेठेत पाहायला मिळतात. जगभरातील ऑटोमोबाईल कंपन्यांना भारतीय बाजारपेठ खुणावत असते. जगभरात चीन अमेरिका युरोप नंतर भारताचा क्रमांक लागतो. भारत देखील मोठी बाजारपेठ आहे. त्यामध्ये आपला दबदबा कायम राखण्यासाठी अनेक ऑटोमोबाईल कंपन्या नेहमीच प्रयत्न करत असतात. परदेशी कार उत्पादक कंपनी किया मोटर्स यांनी आपली नवीन कार्निवल कार भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. या नवीन लक्झरी कार्निवल mpv चे बुकिंग देखील सुरू झाले असून या Kia Carnival 2024 मध्ये कोणकोणते फीचर्स मिळतात हे या लेखांमध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेऊ.
New Kia Carnival फीचर्स
नवीन किया कार्निवल मध्ये अनेक आधुनिक फीचर्स ऑफर करण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सुरक्षेच्या ADAS level 2 सह इतर सुरक्षा फीचर्स आठ एअर बॅग, 360 डिग्री कॅमेरा, स्मार्ट इलेक्ट्रिक स्लाइडिंग रियर डूर, ॲम्बिअंट लाईट, इन्फोटेनमेंट सिस्टीम, इलेक्ट्रिक कंट्रोल ड्युअल सनरूफ इत्यादी फीचर्स या कार मध्ये ऑफर करण्यात आले आहेत. एलईडी कॉम्बिनेशन लॅम्प, एलईडी फॉग लॅम्प, १२ स्पीकर बोस साऊंड सिस्टिम, थ्री झोन ऑटोमॅटिक टेंपरेचर कंट्रोल इ.
हे देखील वाचा – सिंगल चार्ज मध्ये धावणार 590 किमी
या किया कार्निवल मध्ये तुम्हाला अगदी 6 सीट पासून ते 9, 11 सीट पर्यंत कस्टमाईज सीट्स उपलब्ध आहेत. यामध्ये चांगली राईट कॉलिटी चांगला रोड प्रेझेंट आणि पावरफुल इंजिन किया ऑफर करते या व्यतिरिक्त डायमेन्शन मोठे असल्याने शहरांमध्ये ही गाडी हाताळणे थोडे कठीण होऊन बसते.
व्हेरियंट आणि किंमत
New Kia Carnival चे किया मोटर्सने दोन व्हेरियंट लॉन्च केले आहेत यामध्ये कार्निवल लिमोझिन डिझेल ऑटोमॅटिक हे व्हेरियंट 63.90 लाख एक शोरूम किमतीला लॉन्च केले. कार्निवल लिमोझिन प्लस डिझेल ऑटोमॅटिक व्हेरियंटची किंमत अद्याप कंपनीकडून प्रकाशित करण्यात आलेली नाही.
Kia Carnival price in india
कार्निवल लिमोझिन | Rs. 63.90 Lakh (Ex – Showroom) |
कार्निवल लिमोझिन प्लस | – |
कलर पर्याय New Kia Carnival
New Kia Carnival मध्ये दोन व्हेरिएंट कंपनी द्वारे लॉन्च करण्यात आले आहेत यामध्ये कलर पर्याय देखील दोनच उपलब्ध आहेत.
१. फ्युजन ब्लॅक
२. ग्लेशियर व्हाईट पर्ल
इंजिन आणि मायलेज New Kia Carnival
किया मोटर्सच्या या फुल साइज कार्निवल एम पी व्ही मध्ये 2151 सीसीचे पावरफुल टर्बो डिझेल इंजिन मिळते. 197 बीएचपी पॉवर आणि 440 एन एम टॉर्क जनरेट करते. या इंजिन सोबत किया 9 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन ऑफर करते त्या मार्फत तुमची रायडिंग क्वालिटी आणि कंफर्ट सुधारते. 2151 सीसीचे हे इंजिन 13.5 के एम पी एल मायलेज प्रदान करते.
असेच नवनवीन ऑटो अपडेट जाणून घेण्यासाठी कोकण कल्चर ला फॉलो करा तसेच सदर लेख कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा.
Pingback: रील स्टार ते बिग बॉस विजेता Suraj Chavan Bigg boss Marathi winner 2024