New Maruti Suzuki Ertiga 2024 : भारतीय बाजारात एक प्रचंड लोकप्रिय आणि विश्वासार्ह एमपीव्ही (मल्टी-पर्पज व्हेईकल) म्हणून ओळखली जाणारी सुजुकी एर्टिगा आता आपल्या नव्या रूपात सादर करण्यात आली आहे. या लेखामध्ये आपण New Maruti Suzuki Ertiga 2024 बाबत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
New Maruti Suzuki Ertiga 2024 मारुती सुझुकी मोटर्स ने गेल्या एक दशकापासून भारतीयांच्या गरजांचा विचार करून भारतीय बाजारपेठेत आपली दमदार मायलेज देणारी वाहने उतरवून इतर कंपन्यांसाठी ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये तगडे आव्हान उभे केले. भारतीयांचा मिळणारा भरघोस प्रतिसाद आणि आपल्या विक्रीमध्ये अनेक विक्रम करत भारतामध्ये आपल्या शाखा संपूर्ण भारतभर पसरवल्या आणि भारतात आपले स्थान पक्के केले. आपल्या उत्कृष्ट डिझाइन, उत्तम कार्यक्षमता, आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानासह भारतीय ग्राहकांच्या मनात स्वतःचे स्थान कायम ठेवले आहे. पॉवर टू वेट रेशो मेंटेन ठेवल्यामुळे मारुती सुझुकी ची वाहने चांगली परफॉर्मन्स देतात शिवाय फ्युल एफिशियन्सी देखील उत्तम देतात.
New Suzuki Ertiga 2024 डिझाइन आणि रोड प्रेझेन्स
New Suzuki Ertiga 2024 नवीन सुजुकी एर्टिगाची बाह्यरचना ही स्पोर्टी आणि आकर्षक आहे. गाडीच्या पुढील बाजूस नवीन क्रोम ग्रिल आणि एलईडी प्रोजेक्टर हेडलाइट्स आणि एलईडी टेल लाइट्स ज्यामुळे गाडीला एक प्रीमियम लूक मिळतो. १५-इंच अलॉय व्हील्स आणि एर्टिगाची साइड प्रोफाइलही अत्यंत आकर्षक आहे, ज्यामुळे गाडीची ओळख सहज होते. एकंदर गाडीची डिझाईन आणि रोड प्रेझेन्स हा उत्तम आहे.
गाडीच्या इंटिरियर साठी हार्ड प्लास्टिक मटेरियल वापरून आकर्षक इंटीरियर्स तयार करण्यात आले आहेत. नवीन सुजुकी एर्टिगामध्ये ७-इंचाचा टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम आहे, ज्यामध्ये अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले यांचा समावेश आहे. याशिवाय, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, युएसबी पोर्ट, आणि मल्टी-फंक्शनल स्टीयरिंग व्हील यांसारख्या सुविधाही उपलब्ध आहेत. त्या गाडीची बिल्ड क्वालिटी ही उत्तम असून फिट अँड फिनिश चांगली आहे. पण इतर गाड्यांच्या तुलनेमध्ये या गाड्या खूप हलक्या आहेत ज्यामुळे फ्युल एफिशियन्सी चांगली आहे.
New Suzuki Ertiga 2024 इंजिन स्पेसिफिकेशन
नNew Suzuki Ertiga 2024 मध्ये १.५ लीटर पेट्रोल इंजिन आहे, जे १०३ बीएचपी पॉवर आणि १३८ एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ५-स्पीड मॅन्युअल आणि ४-स्पीड ऑटोमॅटिक ट्रांसमिशन दोन्ही पर्यायांसह उपलब्ध आहे उपलब्ध आहे. गाडीची इंधन कार्यक्षमता उत्कृष्ट असून, तिची मायलेज १९.०१ किमी/लीटर पर्यंत आहे. या इंजिनमुळे गाडीला एक स्मूथ आणि आरामदायी ड्रायव्हिंग अनुभव मिळतो. हे इंजिन सीएनजी आणि पेट्रोल अशा दोन्ही इंधनांवरती चालतात ज्यामुळे इंधन दरवाढीच्या काळात आर्थिक दृष्ट्या नवीन सुझुकी अर्टिगा हे फायदेशीर ठरते.
New Suzuki Ertiga 2024 सुरक्षा
नवीन सुजुकी एर्टिगामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने ड्युअल एअरबॅग्स, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (एबीएस) विथ इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्यूशन (ईबीडी), ब्रेक असिस्ट, रिअर पार्किंग सेंसर्स, आणि सीट बेल्ट प्री-टेन्शनर्स यांसारख्या अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांचा समावेश आहे. यामुळे गाडीच्या प्रवाशांचे सुरक्षिततेची काळजी घेतली जाते. पण या गाडीची ग्लोबल NCAP रेटिंग कळू शकली नाही.
आरामदायी प्रवास
नवीन सुजुकी एर्टिगा मध्ये आरामदायीता आणि सोयी सुविधा चांगल्या आहेत. गाडीमध्ये सात प्रवासी आरामात बसू शकतील तितकी जागा आहे. पुढील आणि मागील सीट्स आरामदायी असून, चांगल्या लेगरूम आणि हेडरूमसह येतात शेवटच्या रोमध्ये लेगरूम साठी जागा कमी असल्याने प्रौढ व्यक्ती तेथे आरामात बसू शकत नाही, लहान मुलांसाठी हा रोग परफेक्ट आहे. याशिवाय, एर्टिगामध्ये ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, रिअर एसी वेंट्स, की-लेस एंट्री, आणि पुश स्टार्ट/स्टॉप बटन यांसारख्या अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध आहेत. गाडीमध्ये हिल होल्ड कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ईएसपी), आणि क्रूझ कंट्रोल यांसारख्या फीचर्स आहेत, ज्यामुळे गाडी चालवणे अधिक सोपे आणि सुरक्षित होते.
कनेक्टिव्हिटी
नवीन सुजुकी एर्टिगामध्ये ७-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम आहे, ज्यामध्ये अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले यांची सुविधा आहे. याशिवाय, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, युएसबी पोर्ट, ऑडिओ कंट्रोल्स, आणि व्हॉईस कमांड यांसारख्या अनेक अत्याधुनिक फीचर्स आहेत. यामुळे प्रवास करणाऱ्यांना कनेक्टिव्हिटी आणि मनोरंजनाची सुविधा मिळते.
कलर पर्याय
नवीन सुजुकी एर्टिगा विविध आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये रेड, ब्लू, व्हाइट, सिल्वर, ग्रे, आणि ब्लॅक यांचा समावेश आहे. या विविध रंगांमुळे ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार रंग निवडण्याची सुविधा मिळते.
मेंटेनन्स आणि आफ्टर सेल सर्विस
सुजुकी एर्टिगाची सेवा आणि देखभाल अत्यंत सोपी आणि कमी खर्चिक आहे. सुजुकीच्या भारतभर पसरलेल्या सेवा केंद्रांच्या जाळ्यामुळे ग्राहकांना सहजगत्या गाडीचे पार्टस आणि सेवा सुविधा मिळतात. तसेच सुझुकीचे पार्ट्स हे इतर कंपन्यांच्या तुलनेमध्ये स्वस्त असल्याने लोकांचा यांच्या सेवेवर विश्वास आहे.
किंमत आणि व्हेरियंट्स
नवीन सुजुकी एर्टिगा विविध वेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे, ज्यामुळे ग्राहकांना आपल्या बजेटनुसार आणि गरजेनुसार गाडी निवडता येते. एर्टिगाची सुरुवातीची किंमत साधारणतः लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरु होते, आणि याचे टॉप व्हेरियंट्स ९.५९ लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते.
व्हेरियंट्स | किंमत |
---|---|
Ertiga Lxi O | ८.६९ लाख |
Ertiga Vxi O | ९.८३ लाख |
Ertiga Vxi O CNG | १०.७८ लाख |
Ertiga Zxi O | १०.९३ लाख |
Ertiga Vxi AT | ११.२३ लाख |
Ertiga Zxi | ११.६३ लाख |
Ertiga Zxi O CNG | ११.८८ लाख |
Ertiga Zxi AT | १२.३३ लाख |
Ertiga Zxi Plus AT | १३.०३ लाख |
नवीन सुजुकी एर्टिगा हे एक अत्याधुनिक, स्टायलिश आणि परवडणारी एमपीव्ही आहे. याची डिझाइन, कार्यक्षमता, सुरक्षा, आरामदायीता, आणि इंधन कार्यक्षमता या सर्व बाबी विचारात घेता, ही गाडी भारतीय बाजारात एक उत्तम पर्याय आहे. असेच नवनवीन ऑटो अपडेट मिळवण्यासाठी कोकण कल्चरला फॉलो करा. आणि सदर New Suzuki Ertiga 2024 लेख कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा.
मारुती सुझुकी ऑफिशियल वेबसाईट क्लिक करा.