Maha E Seva Kendra Registration 2024 : महा-ई-सेवा केंद्र रजिस्ट्रेशन २०२४ देशाला तांत्रिकदृष्ट्या डिजिटल बनवण्यासाठी सरकार अनेक योजना ऑनलाइन सुरू करत आहे. सरकार आणि जनता यांच्यातील कामे सुरळीत होण्यासाठी तसेच या अगोदर चालणारी वेळखाऊ पद्धत बंद करण्यासाठी शासन नवनवीन योजना राबवीत असते.शासनाच्या सर्व योजनांचा लाभ नागरिकांना मिळावा यामागील मुख्य उद्देश असतो. योजना आणि लाभार्थी यांच्यातील प्रक्रिया सुखकर करण्यासाठी शासनाने महा-ई-सेवा केंद्र संपूर्ण राज्यभर चालू केले आहेत. या केंद्रांमार्फत नागरिकांच्या गरजेनुसार नागरिकांना आवश्यक असणारे दाखले, प्रमाणपत्रे, परवाने, पासपोर्ट इत्यादी आवश्यक अशा कागदपत्रांसाठी या केंद्रांमार्फत अर्ज करता येणार आहे.
या अगोदर नागरिकांची होणारी फरफट थांबवण्यासाठी शासनाने हे ठोस पाऊल उचलले आहे सर्व प्रकारच्या सरकारी योजना संबंधित सुविधा या केंद्रांवर उपलब्ध असतील आणि हे केंद्र अधिकृतपणे खाजगी व्यक्ती द्वारे चालवले जाईल. सर्व नागरिकांना या केंद्रांमार्फत सार्वजनिक अथवा खाजगी अशा सगळ्या सेवांचा लाभ येथून ऑनलाइन घेता येणार आहे.
जर तुम्हाला महा-ई-सेवा केंद्र उडायचे असेल तर या लेखांमध्ये तुम्हाला त्याविषयी सविस्तर माहिती दिली आहे.
योजनेचे नाव | Maha E Seva kendra registration 2024 |
कोणी सुरू केली | महाराष्ट्र सरकार |
अधिकृत संकेतस्थळ | https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ |
लाभार्थी | राज्यातील नागरिक |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन Maha E Seva kendra registration 2024 |
Maha E Seva kendra registration 2024 संपूर्ण माहिती.
महा-ई-सेवा केंद्र या योजनेद्वारे महाराष्ट्रातील नागरिकांना शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ महा-ई-सेवा केंद्र उघडण्यासाठी ऑनलाईन अर्ज करून स्वतःचे महा-ई-सेवा केंद्र उघडता येणार आहे. ज्याद्वारे ते राज्यातील इतर नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देऊ शकतात. हे केंद्र उघडण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरून नोंदणी करून तुम्ही महा-ई-सेवा केंद्र उघडू शकता. या केंद्रामार्फत विविध नागरिकांना उत्पन्नाचे साधन निर्माण करून देणे व त्या मार्फत त्यांचे जीवनमान सुधारणे व त्यांना स्वावलंबी बनवणे. तसेच नागरिकांना शासकीय सेवा घेताना शासकीय कार्यालयात जाण्याची गरज नाही महा-ई-सेवा केंद्र मध्ये जाऊन ऑनलाईन अर्ज केल्याने नागरिकांचा वेळ व पैसा दोन्हींची बचत होऊन कार्यालयीन प्रणालीत पारदर्शकता येईल.
Maha E Seva kendra registration 2024 फायदे आणि वैशिष्ट्ये
- ज्या नागरिकांना त्यांचे महा-ई-सेवा केंद्र उघडायचे आहे त्यांच्यासाठी राज्य सरकारने अधिकृत संकेतस्थळावर अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे.
- पात्र नागरिक योजनेसाठी घरबसल्या इंटरनेटच्या मदतीने ऑनलाईन नोंदणी करू शकतात.
- राज्यातील प्रत्येक पात्र नागरिक त्याच्यावर रोजगारासाठी सरकारने चालवलेल्या या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
- राज्य शासनाने महाराष्ट्रातील नागरिकांच्या सेवेसाठी महा-ई-सेवा केंद्रे सुरू केली आहेत.
- या योजनेद्वारे सर्व नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेता येणार असून प्रत्येक वेळेस शासकीय कार्यालयात जाण्याची गरज राहणार नाही.
- महाराष्ट्रातील नागरिक ही सेवा केंद्राच्या मदतीने शासनाच्या इतर सेवांचा लाभ घेऊ शकतात जसे दाखले काढणे, परवाने काढणे इ.
- महा-ई-सेवा केंद्रांमुळे अनेक नागरिकांना रोजगार उपलब्ध होऊन बेरोजगारीचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.
- लाभार्थ्यांचे जीवनमान उंचावून अधिक सक्षम आणि स्वावलंबी बनतील.
- ऑनलाइन सुविधेमुळे वेळ आणि पैसा यांची बचत होऊन सरकार आणि नागरिक यांच्यातील पारदर्शकता वाढण्यास मदत होणार आहे.
Maha E Seva kendra registration 2024 पात्रता निकष
- अर्ज करणारा व्यक्ती हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा.
- वय वर्ष १८ पूर्ण झालेला व्यक्ती महा-ई-सवा केंद्राचा लाभ घेण्यास पात्र असेल.
- अर्जदारास स्थानिक भाषा लिहिता, बोलता येत असावी तसेच इंग्रजी भाषेचे प्राथमिक ज्ञान असणे गरजेचे आहे.
- अर्जदाराची शैक्षणिक पात्रता किमान १० वी पास असावी.
- अर्जदाराला संगणक कौशल्याचे पूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे.
महा-ई-सेवा केंद्र उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रहिवासी पुरावा
- उत्पन्न दाखला
- जन्मतारीख/ वय पुरावा
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल क्रमांक
- ईमेल आयडी
महा-ई-सेवा केंद्र उघडण्यासाठी अर्ज प्रक्रिया Maha E Seva kendra registration 2024
- प्रथम महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- वेबसाईट सुरू झाल्यानंतर नवीन पेज उघडेल.
- या पेजवरील New User Register Here या पर्यायावर क्लिक करा.
- आता नवीन पेज ओपन होईल.
- आता तुम्हाला पर्याय १ किंवा २ निवडावा लागेल.
- पर्याय क्रमांक एक निवडल्यास पुढे मोबाईल नंबर आणि आलेला ओटीपी प्रविष्ट करून यूजर आयडी पासवर्ड टाकावा लागेल.
- पर्याय क्रमांक दोन निवडल्यास तुम्हाला अर्जाचा तपशील पत्ता मोबाईल क्रमांक छायाचित्र इत्यादी सर्व माहिती द्यावी लागेल.
- त्यानंतर तुम्हाला महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करावी लागतील, पुढे रजिस्टर या पर्यायावर क्लिक करा.
- यानंतर रजिस्टर या पर्यायावर क्लिक करून रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या.
- आता लॉग इन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन VLE Login वर क्लिक करा.
- नंतर स्क्रीनवर लॉगिन फॉर्म येईल त्यामध्ये युजर आयडी आणि पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉगिन करा.
- या पेजवर तुम्हाला विचारलेली माहिती आणि एप्लीकेशन आयडी प्रविष्ट करा.
- आता Go या पर्यायावर क्लिक करा. आता संपूर्ण माहिती तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
- महा-ई-सेवा केंद्रासाठीचे रजिस्ट्रेशन येथे पूर्ण होईल.
महा-ई-सेवा केंद्र यादी पहा
- महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन, तेथील होम पेजवर महा-ई-सेवा केंद्राच्या लिंक वर क्लिक करावे लागेल.
- पुढे नवीन पेज ओपन होईल यावर तुमचा जिल्हा व तालुका निवडून झाल्यावर पुढे नवीन पेज ओपन होईल.
- त्या पेजवर तुम्हाला संपूर्ण महा-ई-सेवा केंद्रांची यादी पाहता येईल.
अधिकृत वेबसाईट क्लिक करा
हेल्पलाइन क्रमांक टोल फ्री- १८०० १२० ८०४०
इतर शासकीय योजना क्लिक करा
Pingback: प्रधानमंत्री मुद्रा योजना | PM Mudra Yojana in Marathi