देशभरातील युवकांची पहिली पसंती असलेली यामाहा आर एक्स १०० बाबत यामाहा ने घोषणा केली की, आर एक्स १०० ची पुढील जनरेशन ही नव्या इंजिन अपडेट सह आधुनिक फिचर्स सोबत पुन्हा येत आहे. मीडिया रिपोर्टस् नुसार यामाहा इंडियाचे प्रेसिडेंट इशिन चिहाना बोलले की, आर एक्स १०० पुन्हा भारतातील रस्त्यांवर धावेल. त्यांच्या मते आर एक्स १०० आपले मार्केट मध्ये असलेले नाव कायम ठेवेल. या दुचाकी ची जागा दुसरी कोणतीही दुचाकी घेऊ शकत नाही. असा विश्वास व्यक्त केला.
आपल्या माहितीसाठी आम्ही नव नवीन गाड्यांचे अपडेट देत असतो.
यामाहा आर एक्स १०० YAMAHA RX100 दुचाकी संपूर्ण देशभरात १९८०-१९९० या दशकात खूपच फेमस झाली. १९८० पासून आजपर्यंत तरुणाई ला वेड लावणारी दुचाकी ठरली.
यामाहा आर एक्स १०० ही दुचाकी तिच्या वेगासाठी खुप प्रसिध्द होती. परंतू काही कारणास्तव ही दुचाकी काही वर्षांपूर्वी बंद करण्यात आली, या दुचाकीला यामाहा पुन्हा बाजारात आणत आहे.
Yamaha rx 100 आर एक्स १०० बाबत यामाहा ने केली घोषणा
Yamaha rx 100 यामाहा आर एक्स १०० च्या काही गोष्टी…
आर एक्स १०० चे उत्पादन बदलत्या इमिशन नॉर्म्स मुळे भारतात बंद करण्यात आलं.
भारतात आजही जुन्या वाहन खरेदी विक्री डिलर्स कडे या दुचाकी आजही उपलब्ध आहेत, आणि आजही भारतात या दुचाकी रस्त्यावर धावताना दिसतात.
९० च्या दशकात आर एक्स १०० ही दुचाकी तरुणांची पहिली पसंती बनली होती.
त्या वेळेस यामाहा आर एक्स १०० केवळ ७ सेकंदात १०० किमी प्रति तास वेग पकडत असे. यामुळेच ही दुचाकी त्याकाळी खुप प्रसिद्ध झाली होती.
Yamaha rx 100 कसे असू शकते इंजिन…
नवीन आर एक्स १०० ही पहिल्यापेक्षा अधिक शक्तिशाली इंजिनसोबत येऊ शकते.
यामाहा च्या १५० सीसी व २५० सीसी इंजिन वाल्या दुचाकी देखील खुप फेमस आहेत. यामुळे आशा आहे की येणारी आर एक्स १०० हि १२५ ते २०० सीसी सेगमेंट मध्ये येऊ शकते. तसेच यामध्ये तुम्हाला आधुनिक फीचर्स देखील पाहायला मिळतील. एबीएस, आधुनिक इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, इत्यादी.
असेच नवनवीन ऑटो अपडेट मिळवण्यासाठी कोकण कल्चर ला नक्की फॉलो करा.
अधिक माहितीसाठी आपण यामाहाची अधिकृत वेबसाईट पाहु शकता.
हे देखील वाचा
Xiaomi SU 7 शाओमी लॉन्च केली पहिली इलेक्ट्रिक सेडान
Pingback: Bajaj Pulsar NS 400 z info in marathi लवकरच NS 400 होणार लाँच