Upgraded PAN Card

Upgraded PAN Card : भारत सरकार PAN 2.0 द्वारे पॅन कार्ड पूर्णतः अपग्रेड करणार आहे, त्यामुळे करदात्यांना त्याचा वापर करणे सोपे होईल. देशभरातील सुमारे ७८ कोटी नागरिकांचे पॅन कार्ड अपडेट करण्यास भारत सरकारने मंजुरी दिली असून यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला जाणार आहे. पॅन कार्ड युजर चा डेटा हा सुरक्षित करण्याच्या उद्देशाने व इतर डिजिटल प्रक्रिया सुधारण्याच्या दृष्टीने हे बदल करण्यात येत आहेत.

Upgraded PAN Card

१९७२ पासून वापरात असलेले तुमचे जुने पॅन कार्ड आता नवीन रूपात आणि अधिक ऍडव्हान्स होणार आहे. यासाठी भारत सरकारने PAN 2.0 चा नवीन एडिशन साठी मंजुरी दिली आहे.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितल्याप्रमाणे नवीन पॅन कार्ड आधुनिक वैशिष्ट्यांसह येईल त्यावरील आपला जुना पॅन क्रमांक तसाच राहील या नवीन पॅन कार्ड वरती QR कोड दिला जाईल ज्यामध्ये तुमची संपूर्ण माहिती असेल. या माहितीचा वापर करून टॅक्स भरणे, नोंदणी करणे इत्यादी अनेक गोष्टी सोप्या होणार आहेत.

Upgraded PAN Card नवीन फीचर्स

नवीन पॅन कार्ड मध्ये नवीन तंत्रज्ञान वापरले जाईल, त्यामुळे सर्व प्रकारच्या व्यवसायांचे ओळख नोंदणी व इतर कामे करण्यासाठी आधुनिक वैशिष्ट्य जोडली जातील, पॅन कार्ड सेवा संबंधी एक इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म तयार करून पॅन कार्ड युजर्स ना चांगला अनुभव आणि डेटा सुरक्षितता प्रदान केली जाईल. यामुळे आर्थिक फसवणुकीसारख्या घटनांना आळा घालता येईल.

शुल्क

पॅन कार्डच्या अपडटेड वर्जन साठी सर्वसामान्य माणसाला काही करण्याची गरज लागणार नाही, अर्ज करण्याची गरज नाही किंवा कोणतेही शुल्क देण्याची गरज नाही, लोकांकडे अगोदरचे कार्ड आहेत त्या लोकांना संबंधित विभागाकडून नवीन पॅन कार्ड पाठवण्यात येणार आहेत.

अर्ज

या नवीन Upgraded PAN Card साठी कोणत्याही प्रकारचा अर्ज करण्याची गरज नाही किंवा कुठेही पैसा खर्च करण्याची गरज नाही भारत सरकार हे नवीन पॅन कार्ड तुमच्या पत्त्यावर पाठवून देईल.

या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तुमचे पॅन नंबर बदलले जाणार नाहीत, तसेच नवीन पॅन कार्ड मिळेपर्यंत तुमचे जुने पॅन कार्ड तुमच्या कामांसाठी व्हॅलिड राहील. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने म्हटले आहे की, जोपर्यंत अपडेट किंवा सुधारणा आवश्यक नसतील तोपर्यंत जुने पॅन कार्ड वैध राहील.

हे देखील वाचा – Suzuki e Vitara info in Marathi

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

o
Scroll to Top