Tata Sierra EV : भारतीय ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये टाटा मोटर्सने केलेल्या कमबॅकची चर्चा सगळीकडे होताना दिसत आहे. एक वेळ अशी होती की टाटा मोटर्सला सेल्स मध्ये आवश्यक टप्पा गाठण्यासाठी खूप मोठी कसरत करावी लागत होती, पण टाटा मोटर्स अलीकडच्या काळात त्यांच्या वाहनांमध्ये केलेले अमुलाग्र बदल आणि नवीन टेक्नॉलॉजीचा पुरेपूर वापर भारदस्थ डिझाइन्स, आणि सुरक्षितता यामुळे भारतीय ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. नवीन बदलांमुळे इतर कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत.
Tata Sierra EV
टाटा मोटर्स भारतीय बाजारपेठेत आपल्या अनेक वाहनांची विक्री करते, सर्वसामान्य भारतीयांना परवडणाऱ्या किफायतशिर किमतीमध्ये सुरक्षित वाहने लॉन्च करून इतर कंपन्यांचे विक्रम मोडीत काढले आहेत.
टाटा मोटर्सने 2023 च्या एका एक्सपो मध्ये टाटा सिएरा ची एक झलक दाखवली होती टाटा सिएरा चे इलेक्ट्रिक व्हर्जन येथे अनावरण केले होते. यावरून असा अंदाज वर्तवण्यात येतोय की टाटा सियारा ही लवकरच भारतीय रस्त्यांवर धावताना दिसेल. इलेक्ट्रिक कार मध्ये टाटा मोटर्स 65 ते 70 किलो वॅट ची बॅटरी ऑफर करू शकते या दमदार बॅटरी मार्फत ही कार 590 ते 600 किमी ची रेंज प्रदान करू शकते.
एका चार्ज मध्ये 500 किमी रेंज देणारी Tata Curvv EV
सध्या भारतीय बाजारपेठेत टाटा नेक्सॉन ईव्ही, टाटा पंच ईव्ही, टाटा टियागो ईव्ही यांना मोठी मागणी आहे. टाटा मोटर्स ने एक नवीन ईव्ही एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये न्यू ईव्ही…गेस व्हाट… या व्हिडिओमध्ये सांगत आहे सदर व्हिडिओ ही नवीन टाटा सिएरा ईव्हीसाठी असू शकतो असा अंदाज बांधण्यात येतो आहे.
यामध्ये अनेक आधुनिक फीचर्स ऑफर करण्यात आले आहेत. गाडीची लांबी ही 4.1 मीटर असून ही गाडी कॉम्पॅक्ट आहे. आत मध्ये 12 इंचाचा मल्टीफंक्शनल इन्फोटेनमेंट सिस्टीम डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, पॅनोरमिक सनरूफ, 360° डिग्री कॅमेरा इत्यादी फीचर्स ऑफर करण्यात आले आहेत.
Pingback: किया मोटर्स ने दमदार फीचर्स सोबत New Kia Carnival केली लॉन्च