Pushpa 2 The Rule Box office Collection

Pushpa 2 The Rule Box office Collection बहुचर्चित असा Pushpa 2 हा सिनेमा डिसेंबर मध्ये प्रदर्शित झाल्यानंतर अनेक विक्रम करत बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. पुष्पा या पहिल्या यशस्वी चित्रपटानंतर चाहत्यांना तीन वर्ष पुष्पा २ ची वाट बघावी लागली होती. अल्लू अर्जुन च्या दमदार अभिनयाने अवघ्या चित्रपटसृष्टीला भुरळ घातली. अनेक चित्रपटांचे विक्रम तोडत दुसऱ्या आठवड्यात देखील शो हाऊसफुल्ल होत आहेत. प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद या चित्रपटाला मिळत असून जगभरात देखील उत्तम कामगिरी करत करोडो रुपयांचा गल्ला या चित्रपटाने जमवला आहे.

Pushpa 2 : The Rule Box office Collection
Pushpa 2 : The Rule Box office Collection

Pushpa 2 The Rule Box office Collection

Pushpa 2 The Rule हा सगळ्यात जलद १००० कोटींचा टप्पा पार करणारा चित्रपट ठरला आहे, भारतातच अवघ्या दोन दिवसांमध्ये ६४५ कोटीच्या आसपास कमाई केली. व जगभरात पाच दिवसातच ९०० कोटींचा टप्पा ओलांडला. सहाव्या दिवशीच १००० कोटी क्लब मध्ये जलद प्रवेश करणारा पहिला चित्रपट ठरला.

Pushpa 2 The Rule Box office Collection

Pushpa 2 हा बहुप्रतिक्षित सिक्वल, Pushpa : The Rise चा दुसरा भाग आहे, ज्याने बॉक्स ऑफिसवर प्रचंड धुमाकूळ घातला आहे. दिग्दर्शक सुकुमार आणि प्रमुख भूमिका असलेल्या अल्लु अर्जुन यांच्या दमदार अभिनयामुळे हा चित्रपट प्रत्येक ठिकाणी चर्चेचा विषय बनला आहे. खाली Pushpa 2 च्या दिवसाप्रमाणे कलेक्शन माहिती दिली आहे.

दिवसएकूण संकलन (₹ कोटी)
(ओपनिंग डे)१०
पहिला दिवस१६४.२५
दुसरा दिवस९३.८
तिसरा दिवस११९.२५
चौथा दिवस१४१.०५
पाचवा दिवस६४.४५
सहावा दिवस५१.५५
एकूण दुसऱ्या आठवड्यात कलेक्शन२७५

एकूण कलेक्शन

Pushpa 2 The Rule Box office Collection
Pushpa 2 The Rule Box office Collection

तसेच Pushpa 2 : The Rule चित्रपटामुळे अल्लू अर्जुन हा भारतातील सगळ्यात जास्त मानधन घेणारा अभिनेता ठरला. Pushpa या प‌‌हिल्या चित्रपटातील पुष्पा राज भूमिकेसाठी अल्लू अर्जुन यांना अभिनेता श्रेणीतील राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता.

चंदन तस्करीच्या कथेवर आधारित असलेला हा सिनेमा दिग्दर्शक सुकुमार यांनी दिग्दर्शित केला असून हे दोन्ही सिनेमे प्रचंड यशस्वी ठरले. चंदन तस्करी चे साम्राज्य आणि अल्लू अर्जुन तसेच फहाद फासिल यांच्यातील संघर्ष हे या सिक्वल मधील प्रमुख आकर्षण ठरले.

३ तास २१ मिनिटांसह हा चित्रपट सर्वाधिक लांबीचा चित्रपट ठरला.

पुष्पा २ यशस्वी चित्रपट ठरला आहे, जो भारत आणि विदेशातही चांगली कमाई करत आहे. त्याच्या सुरुवातीच्या दोन आठवड्यांचे जगभरातील कलेक्शन आणि स्थिर कामगिरी ह्यामुळे तो एक मोठा बॉक्स ऑफिस हिट ठरला आहे. आगामी काही आठवड्यात या चित्रपटाचे कलेक्शन अधिक वाढण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा – किती आहे बॉलीवूडच्या बादशहाची संपत्ती

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

o
Scroll to Top