Passport Seva Portal Down : पासपोर्ट सेवा पोर्टल पोर्टल हे २९ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री ८.०० वाजल्यापासून ते २ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ६ पर्यंत मेन्टेनन्स साठी बंद राहील, सदर कालावधीमध्ये नागरिकांसाठी ३० ऑगस्ट २०२४ अगोदर केलेल्या सर्व अपॉइंटमेंट योग्यरीत्या पुन्हा रीशेड्युल केल्या जातील असे अर्जदारांना पासपोर्ट सेवा पोर्टलने म्हटले आहे.
Passport Seva Portal Down
२९ ऑगस्ट ते २ सप्टेंबर पर्यंत हे पोर्टल या काळात नागरिकांसाठी तसेच MEP/RPO/BOI/ISP/DoP/Police Authorities यांच्याकरिता बंद राहील.
सदर ऍक्टिव्हिटी ही पासपोर्ट सेवा पोर्टलचा नियमित प्रक्रियेचा एक भाग आहे. देशभरातील सर्व केंद्रांमध्ये अपॉइंटमेंट साठी, अर्जदार हे पासपोर्ट सेवा पोर्टलचा वापर नवीन पासपोर्ट काढण्यासाठी तसेच जुन्या पासपोर्टचे नूतनीकरण करण्यासाठी या पोर्टलमार्फत नियुक्त केंद्रांवर वेळ निश्चित करतात. नियुक्त केलेल्या वेळेच्या दिवशी त्यांना पासपोर्ट केंद्रावर पोहोचणे आवश्यक असते यानंतर पोलीस वेरिफिकेशन टप्प्यानंतर अर्जदारांना पासपोर्ट दिला जातो. यासाठी ३० ते ४५ दिवसांचा कालावधी जातो.
सूत्रांच्या माहितीनुसार ऑनलाइन पासपोर्ट सेवा पोर्टल ही सेवा बंद असल्याने, सर्व अपॉइंटमेंट रीशेड्युल करण्यात येतील. तसेच मेंटेनन्स काळ हा अगोदरच नियोजित केलेला असतो यामुळे लोकांची गैरसोय होत नाही.
भारतातील पासपोर्ट चे प्रकार
भारतात तीन प्रकारचे पासपोर्ट दिले जातात यामध्ये ब्ल्यू कव्हर, मरून कव्हर आणि ग्रे कव्हर. ब्लू कव्हर पसपोर्ट हा सामान्य पासपोर्ट असून हा पासपोर्ट कोणत्याही भारतीय नागरिकाला दिला जातो.
मरून कव्हर पासपोर्ट हा डिप्लोमॅटिक पासपोर्ट असून हा पासपोर्ट अधिकृत अधिकारी किंवा सरकारी पदे असलेल्या व्यक्तींसाठी भारत सरकार द्वारे दिला जातो.
ग्रे कव्हर पासपोर्ट हा भारताचा अधिकृत पासपोर्ट असून हा पासपोर्ट विदेशात काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना आणि अधिकृत केलेल्या इतर सदस्यांना दिला जातो.