टाटा नेक्सॉन ईव्ही मॅक्स बाजारात दाखल | New TATA Nexon EV Max launch

TATA Nexon EV Max launch टाटा नेक्सॉन ईव्ही ही सध्या भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक विकली जाणारी एस यु व्ही इलेक्ट्रिक कार आहे. एप्रिल २०२१ मध्ये सर्वाधिक विक्री झालेली ईव्ही ठरली, अगदी लाँच झाल्यापासून ती भारतीय वाहन बाजारावर वर्चस्व गाजवतेय. सध्या कॉम्पॅक्ट एस यु व्ही कार्स ना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. नुकतीच टाटा मोटर्स ने त्यांच्या लोकप्रिय इलेक्ट्रिक कार टाटा नेक्सॉन ईव्ही चे मॅक्स व्हेरीएंट लाँच केलं आहे. या लेखात आपण TATA Nexon Ev Max चे स्पेसिफिकेशन पाहणार आहोत. TATA Nexon Ev Max  ही प्रिस्टीन व्हाईट, डेटोनो ग्रे, मिडनाईट ब्लॅक आणि इंटेन्सी टील या रंगांमध्ये उपलब्ध आहे.

Tata Nexon ev prime

TATA Nexon EV ३५० किमीपर्यंत  रेंज

TATA Nexon Ev Max  चा बॅटरी पॅक अगोदरच्या  Nexon Ev पेक्षा जवळपास ३०% जास्त आहे. कंपनीचा दावा आहे कि ही एका चार्ज मध्ये ४३७ किमी मायलेज देईल. साधारणतः ३५० किमी रेंज अपेक्षित आहे. ही रेंज अगोदरच्या Nexon Ev पेक्षा खूप जास्त असल्याचा दावा करण्यात आला आहे. बॅटरी आणि मोटरवर आठ वर्षांची किंवा १ लाख किलोमीटर ची वॉरंटी देते.

चार्जिंग

TATA Nexon Ev Max जलद चार्जिंगसाठी सक्षम आहे, ७.२ kW एसी फास्ट चार्जर कंपनी देते. ज्यामुळे कार केवळ ६ तासात पूर्णपणे चार्ज होते. तसेच चार्जिंग स्टेशन वर ५० kW डीसी चार्जर ने केवळ ५६ मिनिटात ०-८० टक्के चार्ज होते. सध्यस्थितीत पाहिजे तेवढे चार्जिंग स्टेशन उपलब्ध नसल्याने थोडी अडचण निर्माण होते, अनेक कंपन्या या चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर वर काम करत आहेत, त्यामुळे २०२५ पर्यंत संपूर्ण भारत भर मुबलक प्रमाणात चार्जिंग स्टेशन उपलब्ध होतील. फास्ट चार्जिंगचा पर्याय उपलब्ध झाल्याने बराचसा वेळ वाचेल.

किंमत

वाढत्या पेट्रोल, डीझेल यांच्या किमतीमुळे लोकांचा काळ इलेक्ट्रिक वाहनांकडे वाढताना दिसत आहे. प्रदूषण तसेच इंधनाच्या किमतीने शंभरी पार केली. आणि काही दिग्गज कंपन्या आपल्या कार बाजारात उतरवण्याच्या तय्यारीत आहेत, TATA Nexon Ev देखील भारतीयांच्या पसंतीस उतरली असून या कारची मागणी भारतीय बाजारपेठेत वाढली आहे. या कारने विक्रीच्या बाबतीत अनेक विक्रम केले आहेत. अलीकडेच TATA MOTORS ने TATA Nexon च्या किमतीत वाढ करून झटका दिला आहे. भारतात पुढील व्हेरीएंट विक्री साठी उपलब्ध आहेत.

TATA Nexon Ev Max चे दोन व्हेरीएंट ‍उपलब्ध आहेत तसेच याची किंमत १६.४९ लाख रुपयांपासून १९.५४ लाख रुपयांपर्यंत आहे.

XM 3.3 KW Rs.16.49 Lakh

XM 7.2 KW Fast Charger Rs.16.99 Lakh

XZ Plus 3.3 KW Rs.17.49 Lakh

XZ Plus 7.2 KW Fast Charger Rs.17.99 Lakh

XZ Plus Lux 3.3 KW Rs.18.79 Lakh

XZ Plus Lux 3.3 KW Dark Edition Rs.19.04 Lakh XZ Plus Lux 7.2 KW Fast Charger Dark Edition Rs.19.54 Lakh

New TATA Nexon EV Max

TATA Nexon Ev Max मध्ये मल्टी drive मोड आहेत. इको, सिटी, आणि स्पोर्ट जे तुम्हाला एक वेगळा अनुभव देतात.

टाटा नेक्सॉन ईव्ही च्या काही हाय क्लास व्हेरीएंट मध्ये लेदर सीट्स तसेच काझीरंगा एडिशन मध्ये फारच दमदार सीट्स तसेच पुढच्या आणि मागच्या दोन्ही सीट्स साठी आर्मरेस्ट मिळतात.

टायर प्रेशर मॉनेटरिंग सिस्टम (TPMS)

टाटा नेक्सॉन ईव्ही मध्ये टायर प्रेशर मॉनेटरिंग सिस्टम देखील मिळते, यामुळे चालकास टायर प्रेशर बद्दल माहिती मिळते.

इलेक्ट्रिक सनरुफ

TATA Nexon च्या  XMS व्हेरीएंटच्या वरील सर्व मॉडेल्सना इलेक्ट्रिक सनरुफ मिळतो.

स्वयंचलित वाइपर TATA Nexon च्या  XMS व्हेरीएंटच्या वरील सर्व मॉडेल्सना स्वयंचलित हेड लॅम्प रेन सेन्सिंग वाइपर्स मिळतात.

 

अशा अनेक आधुनिक फिचरसह येते.

किंमत १६.४९ ते १९.५४ लाख
इंधनइलेक्ट्रिक
मोटरपर्मनेंट मॅग्नेट सिंक्रोनस एसी मोटर
रेंज ४५३ किमी
चार्जिंग  वेळ ६.५
सुरक्षा ५ स्टार
ट्रान्स्मिशन ऑटोमॅटिक
सिटींग ५ सीटर
परिमाणे३९९३ एम एम *१८११ एम एम
बॅटरी ४०.५ kWh
बुट स्पेस ३५० लिटर्स

ईव्ही मार्केट मध्ये दुसऱ्या क्रमांकावर MG ZS EV आहे त्यामागोमाग Tata Tigor EV, Hyundai Kona EV या कारचा नंबर लागतो.

TATA Motors Official Site

TATA Harrier new Facelift

Tesla S Plaid

Join our Whats app Group Click Here

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Lavasa city बद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? Saurabh Netravalkar पाकिस्तानला गुडघे टेकायला लावणारा भारतीय वंशाचा क्रिकेटर. Tejashree Pradhan हिचा सिनेसृष्टीतील प्रवास World Environment Day: A Call to Action Who is Kavya Maran?