Marathi Ukhane

Marathi Ukhane : मित्रांनो महाराष्ट्र मध्ये लग्न असो, पूजा असो किंवा इतर कार्यक्रम असेल तर महिला मंडळी नाव घे…उखाणे घेण्यासाठी नववधू यांना किंवा पूजेला बसलेल्या महिलेला आग्रह करतात. महाराष्ट्र मध्ये नाव घेण्याची ही अनोखी पद्धत आहे ज्यामध्ये महिला काव्यात्मक रित्या आपल्या पतीचे नाव घेतात.

नव वधूंना तर दारातच अडवले जाते… नाव घेतल्याशिवाय/ उखाणा घेतल्याशिवाय सोडले जात नाही, तुमचे जर नवीनच लग्न झाले असेल आणि तुम्हाला दारावर अडविण्यापासून वाचायचे असेल, तर तुम्हाला आमचे उखाणे वाचलेच पाहिजे. आम्ही घेऊन आलो आहोत उखण्यांचा एक अनोखा संग्रह इथे तुम्हाला सर्व प्रकारचे उखाणे मिळतील तेही एकाच ठिकाणी.

चला तर जाणून घेऊया सोपे झटपट लक्षात राहतील असे, मजेदार Marathi Ukhane…

उखाण्या व्यतिरिक्त आमच्या वेबसाईटवर तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा संग्रह देखील पहायला मिळेल.

Marathi Ukhane
Marathi Ukhane

नवरदेवासाठी सोपे मजेदार मराठी उखाणे Marathi Ukhane

फुलांच्या तोरणामध्ये आंब्याचे पान, ____ ला पाहून विसरलो देहभान…!

देवगड आंबा आहे छान, त्याला राजाचा मान_____ चे नाव घेतो ऐका देऊन कान.!

डाळी मध्ये डाळ, तुरीची डाळ______च्या मांडीवर खेळविन, एका वर्षात बाळ…

कावळा करी काव काव, चिमणी करी चिव चिव______चे नाव घेतो बंद करा तुमची टीव टीव.

आकाशी उडतोय पक्ष्यांचा थवा, ________चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा.

चांदीच्या ताटात श्रीखंडाची वाटी_________चे नाव घेतो सात जन्मांसाठी.

महाराष्ट्राच्या पैठणीला सोन्याचा काठ________चे नाव घेतो पुढचं नाही पाठ.

चांदीच्या कपावर चांदीची बशी_____च्या सौंदर्या पुढे फिक्या पडल्या स्वर्गातल्या रंभा उर्वशी.

फुलावर फुलपाखरू बसले होते छान______चे नाव घेतो राखून तुमचा मान.

पंचपक्वान्नाच्या ताटात गोड शिऱ्या ची वाटी________चे नाव घेतो पुढील सात जन्मासाठी.

पब्जी खेळता खेळता आला ब्लु झोन,_________चे नाव घेतो शोधून सेफ झोन.

Marathi Ukhane
Marathi Ukhane

नवरीसाठी सोपे मजेदार मराठी उखाणे Marathi Ukhane

फुले आशीर्वादांची वेचावी वाकून,______रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांचा मान राखून.

आकाशात शोभे इंद्रधनुचा रंगीत पट्टा______चे नाव घेते पुरे आता थट्टा.

संसारात करताना स्त्रीने असावे नेहमी दक्ष_______रावांचे नाव घेते, द्या इकडे लक्ष.

मेच्या उकाड्यात झाले सगळे त्रस्त____आणि_____ची जोडी एकदम जबरदस्त.

स्वच्छंदी उडतोय पक्षांचा थवा_____नाव घ्यायला उखाणा कशाला हवा.

तुम्हा सर्वांच्या साक्षीने बनली आमची जोडी, ________रावांच्या साथीने माझ्या आयुष्याला आली गोडी.

सोन्याची अंगठी, चांदीचे पैंजण, _____रावांचे नाव घेते ऐका सर्वजण.

मोगऱ्याच्या फुलांचा गजरा आणि गुलाबाच्या फुलांचा हार,______तुझ्या रूपाने भेटला मला उत्तम जोडीदार.

आकाशात चमकत होते चंद्र आणि तारे, ________ रावांसाठी सोडून आले सारे.

इंद्रधनु मध्ये रंग आहेत सात, ______रावांचे नाव ठेवून पाऊल टाकते आत.

नवीन जोडपे आशीर्वादासाठी वाकले, तुम्हा सर्वांच्या साक्षीने____ रावांसोबत मी सासरी पाऊल टाकले.

जमले सगे सोयरे_____च्या दारात,_____चे नाव घेते, येऊ द्या ना घरात.

https://www.facebook.com/share/4RKe8iuUunTKSByM/?mibextid=qi2Omg

लग्न समारंभ, पूजा विधी अशावेळी म्हणावे लागणारे पारंपरिक उखाणे वर दिले आहेत, तसेच नवनवीन मजेशीर उखाणे, शुभेच्छा यांच्या अपडेट मिळवण्यासाठी ओपन कल्चर ला नक्की फॉलो करा तसेच वरील उखाणे कसे वाटले हे देखील कमेंट करून जरूर कळवा.

50+ Best Birthday Wishes for Sister in Marathi | बहिणी साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Vinesh Phogat ने जाहीर केली निवृत्ती Golden boy ने रौप्य पदक जिंकत रचला इतिहास Neeraj Chopra Won Silver Medal मराठमोळ्या Avinash Sable ने रचला इतिहास पण मेडल हुकले. Mumbai’s most famous street food Famous places for Monsoon Trip in India