Redmi Note 12 Pro 5G भारतामध्ये रेडमी नोट सिरीज सगळ्यात जास्त फेमस आहे. आणि आता पर्यंत सगळ्यात सक्सेसफुल सिरीज राहिली आहे. रेडमी नोट १२ प्रो ५ जी हा स्मार्टफोन ५ जानेवारी २०२३ रोजी लाँच करण्यात आला. याची डिझाईन चांगली असून बॉक्सी टाईप आहे. समोरील बाजूस गोरिला ग्लास चे प्रोटेक्शन मिळते तसेच या स्मार्टफोन ला आय पी ५३ रेटिंग मिळते ती याला स्प्लॅशप्रुफ बनवते.
Redmi Note 12 Pro डिस्प्ले
Redmi Note 12 Pro 5G याचा डिस्प्ले हा ६.६७ इंच एफ एच डी प्लस प्रो एमोलेड टचस्क्रीन सह येतो, १०८०*२४०० पिक्सेल रिझोल्यूशन आणि २०:९ चा अस्पेक्ट रेशो ऑफर करतो, याला गोरिला ग्लास ५ च प्रोटेक्शन येतं. तसेच ९०० निट्स ब्राईटनेस सह येतो, जो भर उन्हातही चांगली विजीबिलिटी देतो. नेटफ्लिक्स एच डी आर ला सपोर्ट करतो. आणि डॉल्बी विजन मुळे तुम्हाला चांगला मल्टीमिडिया अनुभव मिळतो. टच रिस्पाँस देखील चांगला असुन १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट मिळतो.
Redmi Note 12 Pro ऑडीयो
Redmi Note 12 Pro 5G यामध्ये स्टिरीओ स्पीकर आहेत जे डॉल्बी एटमॉस ला सपोर्ट करतात. याला ३.५ एम.एम. जॅक दिला आहे.
Redmi Note 12 Pro बॅटरी / चार्जिंग
५००० mAh ची बॅटरी आहे तुम्हाला पूर्ण १ दिवस मल्टिटास्किंग करिता कामी येते. Redmi Note 12 Pro 5G १२०w हायपर चार्ज फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो यामुळे हा २० मिनिटात ०-१०० चार्ज होतो, पण बॉक्स मध्ये ६७w चार्जर येतो त्याने ०-१०० चार्ज होण्यास ४६ मि. वेळ लागतो.
प्रोसेसर
१२८ जीबी, २५६ जीबी इनबिल्ट स्टोरेज येतो. यात ६ जीबी, ८ जीबी रॅम असे व्हेरिएंट आहेत.
कनेक्टिव्हिटी
Redmi Note 12 Pro 5G हा ड्युअल-सिम नेटवर्क नॅनो-सिम (५ जी, ४ जी, ३ जी, २ जी) ला सपोर्ट करतो. कनेक्टिव्हिटी पर्याय वाय फाय, जीपीएस, युएसबी टाईप सी आहेत. जर ५जी तुमची प्राथमिकता असेल तर तुम्ही कोणताही स्मार्टफोन घेण्याआधी तो स्मार्टफोन कोणत्या ५जी बँड ला सपोर्ट करतो याची खात्री करूनच घ्या.
कॅमेरा
५० मेगा पिक्सेल + ८ मेगा पिक्सेल + २ मेगा पिक्सेल ट्रिपल कॅमेरा सेटअप, फ्रन्ट कॅमेरा १३ मेगा पिक्सेल. ५० मेगा पिक्सेल सोनी आयमॅक्स ७६६ मेन कॅमेरा सोबत आय ओएस ८ मेगा पिक्सेल अल्ट्रा वाईड अँगल तसेच मायक्रो कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये बरेच मोड देण्यात आले आहेत ५० मेगा पिक्सेल मोड, पॅनारोमा, टाईम लॅप्स, ए आय वाटरमार्क, लॉंग एक्स्पोजर, नाईट मोड, पोर्टेट मोड, डॉक्युमेंट मोड, प्रो मोड, मूवी फ्रेम, फिल्म कॅमेरा, शओमी प्रो कट. विडीओ – 4k रेकॉर्डिंग, शोर्ट व्हिडीओ, स्लोव मोशन, व्लॉग मोड, अल्ट्रा वाईड व्हिडीओ, मायक्रो व्हिडीओ, प्रो व्हिडीओ 4k @30fps, 1080@ 60 fps, 1080@ 30 fps, स्लोव मोशन 1080@120 fps.
कुलिंग सिस्टम
12 लेयर ग्रेफाईट शीट
वायब्रेशन मोटर
एक्स एक्सिस वायब्रेशन मोटर
सेन्सर्स
प्रॉक्सिमिटी सेन्सर, अँबीएन्ट लाईट सेन्सर, जय्रोस्कॉप, इलेक्ट्रोनिक कंपास, आय आर ब्लास्टर, जिओमॅग्नेटीक सेन्सर.
Redmi Note 12 Pro 5G किंमत ६ जीबी १२८ जीबी २८,०००/-, ८ जीबी २५६ जीबी ३२,०००/- वेग वेगळ्या व्हेरीएंट नुसार तसेच ई – कॉमर्स साईट वरील ऑफर्स नुसार किंमत बदलत असते.
ब्रँड | शाओमी |
मॉडेल | रेडमी नोट १२ प्रो ५ जी |
किंमत | २८,०००/- ते ३२,०००/- |
लाँँच | ५ जानेवारी २०२३ |
परिमाणे | १६३.६४ * ७४.२९ * ८.८० |
बॅटरी | ५००० mAh |
चार्जिंग | ६७ w (इन बॉक्स) / सपोर्ट १२० w |
रिफ्रेश रेट | ६०/९०/१२० |
स्क्रीन | ६.६७ इंच |
रिझोल्यूशन | 2400 x 1080 पिक्सेल 2k |
गुणोत्तर | २०:९ |
प्रोसेसर | मिडीयाटेक डायमेंसिटी १०८० (६ एन एम |
रॅम | ६ जीबी/८ जीबी |
स्टोरेज | १२८ जीबी, २५६ जीबी इनबिल्ट स्टोरेज |
कॅमेरा | ५० मेगा पिक्सेल + ८ मेगा पिक्सेल + २ मेगा पिक्सेल ट्रिपल कॅमेरा |
ऑपरेटिंग सिस्टम | Android 13/14 |
कनेक्टिव्हिटी | वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ, यूएसबी टाइप-सी |
सेन्सर्स | प्रोक्सिमिटी सेन्सोर, अम्बिएन्त लाईट सेन्सोर, जय्रोस्कॉप, इलेक्ट्रोनिक कंपास,आय आर ब्लास्टर, जिओमेग्नतिक सेन्सोर. |
सिम | नॅनो-सिम- GSM/CDMA /GSM/3G /4G/5G |