Mukhyamantri Saur Krushi Pump Yojna 2023 | Solar Pump Yojna Maharashtra | सौर कृषी पंप योजना ऑनलाईन अर्ज मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना २०२३ । maharashtra solar pump yojana online application.
Mukhyamantri Saur Krishi Pump Yojana 2023 – १९ व्या शतकाच्या सुरुवातीलाच वाढत्या लोकसंख्येला अन्न धान्याचा पुरवठा करण्यासाठी शेतीच्या उत्पादन वाढीची गरज जाणवायला लागल्याने, शासन स्तरावर सन १८८१ च्या फेमिन कमिशन ने केलेल्या शिफारसीनुसार जुलै १८८३ मध्ये कृषी खात्याची स्थापना करण्यात आली. शेती क्षेत्राशी निगडीत सर्व विभागांचा यात समावेश करण्यात आला. mukhyamantri saur krushi pump yojana राज्यातील शेतकरी वर्ग संपन्न आणि सुखी व्हावा असे उद्दिष्ठ समोर ठेऊन त्यादृष्ठीने महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना आणि धोरणे राबवीत असते. याच धोरणाचा अवलंब करून महाराष्ट्र सरकार सौर कृषी पंप योजना यासारख्या योजना शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून याची अंमलबजावणी करत आहे. सदर लेखात आपण मुख्यंमत्री सौर कृषी पंप योजना २०२३ विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप आस्थापित करण्याची योजना जाहिर केली आहे. सौर ऊर्जा हा ऊर्जेचा निरंतर स्त्रोत आहे. भारतात आठ महिने कडक उन असते, त्यामुळे या ऊर्जा स्त्रोताचा वापर शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंपाच्या माध्यमातून शेतीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. पारंपारिक ऊर्जा ही अल्प प्रमाणात उपलब्ध असल्याने तसेच त्याचा अतिप्रमाणात वापर झाल्याने निसर्गामध्ये असमतोल निर्माण झाला आहे. सध्य स्थितीत सिंचनासाठी शेतकऱ्यांकडे विजेवर चालणारे आहेत. हीच वीज सौर ऊर्जेद्वारे मिळाली तर त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना होईल यासाठी व निसर्गाचा समतोल राखण्यास मदत होईल. या लेखात आपण मुख्यमंत्री सौर कृषी योजना २०२३ बाबत जाणून घेणार आहोत. Mukhyamantri Saur Krishi Yojana 2023, Atal Saur Krishi Pamp Yojana महाराष्ट्र शासनाने राज्यात अटल सौर कृषी योजना राबविण्या संदर्भात घेतलेल्या निर्णयामुळे राज्यात १ लाख सौर कृषी पंप आस्थापित करण्यासाठी मान्यता दिली आहे. १ लाख सौर कृषी पंप आस्थापित करण्यासाठी ३ टप्पे केले आहेत. पहिला टप्पा – २५००० नग, दुसरा टप्पा – ५०००० नग, तिसरा टप्पा – २५००० हे टप्पे ३ वर्षात साध्य करण्याचे शासनाचे ध्येय आहे. या योजनेची अंमलबजावणी शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केली आहे. तसेच शेतकऱ्यांकडे सध्य स्थितीत विजेवर चालणारे पंप असल्याने कृषी पंपांना पुरवठा होत असणाऱ्या विद्युत पुरवठ्यामध्ये होणारे बिघाड यामुळे खंडित होणारा वीज पुरवठा, तांत्रिक वीज हानी, रोहित्र बिघाड, विद्युत अपघात, वीज चोरी अशा असंख्य समस्यांमुळे नियमित वीज पुरवठा होण्यास अडचणी निर्माण होतात. याव्यतिरिक्त जेथे विद्युत पुरवठा उपलब्ध नाही अशा ठिकाणी शेतकरी बांधव हे डीझेल चा वापर करून कृषी पंप चालवतात. इंधनाच्या वाढत्या किंमतीमुळे शेतकऱ्यांना खूप खर्च येतो. या सर्व समस्या शेतकऱ्यांना वेठीस आणतात. या सर्व समस्यांवर पर्याय म्हणून शासनाने शेतकऱ्यांना सौर कृषी पंप योजना वरील सर्व समस्यांवर उपाय म्हणून राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी योजना २०२३ राबविण्यास सुरुवात केली आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सर्वसाधारण माहिती Mukhyamantri Saur Krishi Pump Yojana
योजनेचे नाव | मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना |
विभाग | कृषी विभाग |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | राज्यातील शेतकरी |
लाभ | सौर कृषी पंप |
उद्देश | सौर पंप विकत घेण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
मुख्यमंत्री सौर कृषी योजनेची वैशिष्टे
विजेवर चालणाऱ्या पंपांना रात्री विद्युत पुरवठा होतो त्यामुळे शेतकऱ्यांना रात्री सिंचनाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसल्याने, सौर कृषी पंप योजने मुळे शेतकऱ्यास दिवसा सिंचन शक्य होईल. त्याचप्रमाणे कृषी पंप जोडणी खर्च आणि शासनाकडून मिळणाऱ्या सबसिडीपोटी देण्यात येणाऱ्या अनुदानात बचत करण्याचे उद्दिष्ठ साध्य करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी सिंचनासाठी ३ टप्प्यात एक लाख सौर कृषी पंप उपलब्ध करून देण्याचा शासनाचा उद्देश आहे.
टप्पा | सौर कृषी पंप |
---|---|
पहिला टप्पा | २५,००० पंप |
दुसरा टप्पा | ५०,००० पंप |
तिसरा टप्पा | २५,००० पंप |
सदर योजने अंतर्गत प्रत्येक टप्पा सुरु झाल्यापासून १८ महिन्यात राबवण्यात येईल.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने अंतर्गत महाराष्ट्र शासन सौर कृषी पंपाच्या किंमतीच्या ९५ % अनुदान देणार आहे आणि यामध्ये लाभार्थ्यांना ५ % रक्कम भरायची आहे. ५ एकरपर्यंत शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना ३ एच.पी. पंप देण्यात येतील आणि ५ एकर पेक्षा अधिक शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना ५ एच.पी. आणि ७.५ एच.पी. पंप देण्यात येतील. यामध्ये विदर्भातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामध्ये तसेच महाराष्ट्रातील इतर दुर्गम भागातील शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाईल. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेत लाभार्थींना कमीत कमी हिस्सा भरून उर्वरित हिस्सा हा वित्तीय संस्थांमार्फत कर्ज स्वरुपातदिला जाईल वा पुढे या कर्जाची परत फेड ही महावितरण द्वारे टप्प्या टप्प्याने करण्यात येईल. या लाभार्थ्यांमध्ये सर्वसाधारण लाभार्थ्यास सौर कृषी पंपाच्या किंमतीच्या १० % आणि अ.जा. / अ.ज. लाभार्थ्यांसाठी ५ % हिस्सा असेल.
Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana 2023 सर्वसाधारण लाभार्थी आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती लाभार्थी हिस्सा
लाभार्थी | ३ एच.पी. पंप | ५ एच.पी. पंप | ७.५ एच.पी. पंप |
---|---|---|---|
सर्वसाधारण लाभार्थी | १६,५६०/- रुपये ( १० % ) | २४७१०/- रुपये ( १० % ) | ३३,४५५/- रुपये ( १० % ) |
अनुसूचित जाती | ८,२८०/- रुपये ( ५ % ) | १२,३५५/- रुपये ( ५ % ) | १६,७२८/- रुपये ( ५ % ) |
अनुसूचित जमाती | ८,२८०/- रुपये ( ५ % ) | १२,३५५/- रुपये ( ५ % ) | १६,७२८/- रुपये ( ५ % ) |
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचे लाभ
१) राज्यातील जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणणे त्यासाठी शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने अंतर्गत शेतकऱ्यांना कमीत कमी दरात सौर कृषी पंप उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
२) या योजनेचा लाभ हा महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना होणार आहे, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने अंतर्गत विद्युत कृषी पंपाच्या जागेवर शेतकऱ्यांना सौर कृषी पंप उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
३) या पंपावर शासनाकडून सबसिडी देण्यात येणार आहे, शासन सौर कृषी पं पाच्या किंमतीवर ९५% सबसिडी देणार वा ५ % रक्कम ही लाभार्थ्यास भरावी लागेल.
४) मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेच्या माध्यामतून पर्यावरण संरक्षणाचे उद्दिष्ट सध्या करता येईल.
५) पाच एकर शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना ३ एच.पी. पंप तसेच पाच एकर पेक्षा जास्त शेत जमीन असल्यास ५ एच.पी. पंप, ७.५ एच.पी. पंप देण्यात येतील.
६) या योजनेच्या पहिल्या टप्प्यात शासनाकडून २५,००० पंप तसेच दुसऱ्या टप्प्यात ५०,००० पंप आणि तिसऱ्या टप्प्यात २५,००० पंप असे १,००,००० सौर पंप टप्प्या टप्प्याने वितरीत करण्यात येतील.
७) ज्या शेतकऱ्यांकडे आधीच विद्युत कनेक्शन आहे त्यांना या योजनेंतर्गत सौर कृषी पंप सुविधा दिली जाणार नाही.
८) या योजनेसाठी अर्ज करताना आपण ऑनलाईन अर्ज करू शकतो.
९) जुने डिझेल पंप बदलून त्याजागी वने सौर कृषी पंप बसवल्या मुळे प्रदूषण कमी होईल तसेच विजेचा अतिरिक्त भार कमी होण्यास मदत होईल.
१०) या योजनेमुळे शासनाचा वीज अनुदान यावरील होणारा खर्च देखील कमी होईल.
११) सदर योजनेमुळे शेतकऱ्याचा आर्थिक भार कमी होऊन, शेत्कार्यचे उत्पन्न वाढल्यास शेतकरी संपन्न होईल.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना – पात्रता निकष
महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना २०२३ मोठ्या प्रमाणात राबविण्यास सुरुवात झाली आहे. योजना राबविताना त्यात सुसूत्रता यावी यासठी शासनाने काही निकष ठरवले आहेत, यासाठी सदर निकष हे शेतकऱ्यांना माहित असणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेच लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे जलस्त्रोत उपलब्ध आहे असे सगळे शेतकरी या योजनेस पात्र असतील, परंतु शेतकऱ्याकडे पंपासाठी पारंपारिक विद्युत कनेक्शन नसणे आवश्यक आहे.
या योजने अंतर्गत पाच एकर शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना ३ एच.पी. पंप तसेच पाच एकर पेक्षा जास्त शेत जमीन असल्यास ५ एच.पी. पंप, ७.५ एच.पी. पंप देण्यात येतील.
विद्युत कनेक्शन नसलेले शेतकरी, विद्युतीकरणासाठी वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसलेले शेतकरी, महावितरण कंपनीकडे विद्युत कनेक्शन साठी पैसे भरूनही प्रलंबित असणाऱ्या शेतकऱ्यांपैकी, ज्यांना कनेक्शन मिळणे शक्य अनही असे शेतकरी यांना या योजनेत प्राधान्य राहील.
शेततळे, बारमाही वाहणारी नदीच्या शेजारी शेतजमीन असणारे शेतकरी सुद्धा या योजनेसाठी पात्र असतील.
सौर कृषी पंपासाठी सर्व साधारण गटातील लाभार्थ्यांकडून १० % आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती लाभार्थ्यांकडून ५ % याप्रकारे लाभार्थी हिस्सा भरणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना – यंत्रणा
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेची अंमलबजावणी दिलेल्या वेळेत पूर्ण करण्याची महावितरणची राहील.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना जिल्हास्तरीय समिती :-
शासनाने निश्चित केलेल्या निकषानुसार, लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची स्थापना केलेली आहे.
समितीची रचना
जिल्हाधिकारी – अध्यक्ष
उपविभागीय अधिकारी तहसीलदार, महसूल विभाग – सदस्य
जिल्हा आदिक्षक, कृषी विभाग – सदस्य
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण – सदस्य
वरिष्ठ भू वैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा – सदस्य
प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास विभाग – सदस्य
अधीक्षक अभियंता, महावितरण – सदस्य सचिव
विभागीय महाव्यवस्थापक – सदस्य
अंमलबजावणी प्रक्रिया
सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र राज्यामध्ये महावितरण कडून प्रामुख्याने जिल्हाधिकारी, सामाजिक न्याय विभाग, आदिवासी विकास विभाग,भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा,जिल्हा कृषी अधिकारी इ. च्या समन्वयाने राबविली जाते.
- या योजनेतील सौर कृषी पंपासाठी शासनाने निर्धारित केलेल्या निकषानुसार लाभार्थ्यांची निवड जिल्हास्तरीय समिती द्वारे करण्यात येईल.
- शिफारस केलेल्या पात्र लाभार्थ्याने सौर कृषी पंपासाठी आवश्यक लाबह्र्थीर्थी हिस्सा महावितरणच्या कार्यालयात जमा करावा.
- शासनाद्वारे एच.व्ही डी.एस. योजने अंतर्गत वीज पुरवठा करण्याकरिता पायाभूत खर्च हा अडीच लाखापेक्षा जास्त आहे, तेथे वीज ग्राहकांना सौर कृषी पंप प्राधान्याने देण्यात यावा. तसेच लागणाऱ्या पंपा करिता खुल्या निविदा प्रक्रीये द्वारे महावितरण कडून करण्यात यावे, लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पंपांकरिता कार्यादेश महावितरण तर्फे पुरवठा दारास देण्यात यावे.
- सौर कृषी पंप आस्थापित करण्यासाठी दर निश्चिती करून महसुली विभागवार पुरवठादारांचे पॅनल तयार करण्यात येईल, शेतकऱ्यांना पॅनल मधील कोणत्याही एका पुरवठादाराकडून सौर कृषी पंप आस्थापित करता येईल, याबाबतीत शेतकऱ्यांना पूर्ण निवड स्वातंत्र्य राहील, योजनेची अंमलबजावणी करताना ही बाब अवलंबण्यात येईल.
- सौर कृषी पंप आस्थापित करताना जे पेड पेंडिंग शेतकरी आहेत त्यांना पंप वितरीत करताना त्यांना प्राधान्य देण्यात येईल. व त्यांनी भरलेली रक्कम लाभार्थी हिश्श्यासोबत समाविष्ठ करण्यात येईल.
- नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या निर्धारित मार्गदर्शक तत्वानुसार सौर कृषी पंपाचे तांत्रिक मापदंडानुसार बनविण्याची व गुणवत्ता नियंत्रणाची जबाबदारी महावितरणची राहील.
- महावितरण द्वारे निश्चित तांत्रिक मापदंडानुसार सोलर मोड्यूल हे भारतीय बनवटीचे असावेत. आय.ई.सी. प्रमाणित अथवा तत्सम राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय मानांकानुसार प्रमाणित तसेच आर. एफ. आय.डी. टॅग सुविधेसह पुरवणारे पुरवठादार असावेत. याबाबत महावितरण द्वारे पुरावठादार कंपनीमध्ये साहित्याची तांत्रिक मापदंडानुसार पहाणी करून साहित्याच्या योग्यतेबाबत खात्री करेल.
- सौर कृषी पंपासाठी हमी कालावधी हा पाच वर्षाचा असणे, व सोलर मोड्यूल्सची वॉरंटी १ वर्ष आवश्यक आहे. यासाठीच्या आवश्यक अटींचा करार करताना समावेश करण्यात येईल, सौर कृषी पंपा साठी पुरवठादाराकडून ५ वर्षा साठी देखभाल व दुरुस्ती करार महावितरण कडून नोंदणीकृत करून घेण्यात येईल.
- सौर कृषी पंप बसविल्यानंतर तो संबंधित लाभार्थ्यास हस्थांतरित करण्यात येईल. त्यानंतर त्याची देखभाल व देखरेख सदर लाभार्थ्याची असेल.
- सौर कृषी पंप आस्थापित झाल्यावर त्याची आस्थापना व कार्यान्वित अहवाल अधीक्षक अभियंता, महावितरण यांच्याकडून महावितरण कार्यालयाच्या मुख्यालयास सदर करण्यात येईल.
- वित्तीय सहाय्याची मागणी करून निधी प्राप्त करून घेण्याची जबाबदारी महावितरण ची असेल.
- सौर कृषी पंपाची तांत्रिक तपासणी महावितरण मार्फत करण्यात येईल.
- योजनेची अंमलबजावणी करताना आवश्यक असणारे अर्जाचे नमुने आस्थापना अहवाल, उपयोगिता प्रमाणपत्र व संबंधित बाबी इ. महावितरण मार्फत निर्गमित करण्यात येतील.
- यासाठी आवश्यक लेखे महावितरण मार्फत ठेवण्यात येतील.
मुख्यंमत्री सौर कृषी पंप योजना -३ एच.पी. सोलर पंप आणि ५ एच.पी. सोलर पंप लाभार्थी पात्रता
- शेतकऱ्याकडे शाश्वत जलस्त्रोत असलेली शेतजमीन असणे आवश्यक आहे.
- पारंपारिक पद्धतीने कृषी पंपाकरिता विद्युत जोडणी न झालेले शेतकरी.
- पाच एकर शेतजमीन धारक शेतकऱ्यास ३ एच.पी. सौर कृषी पंप व पाच एकर पेक्षा अधिक शेतजमीन धारकास ५ एच.पी. पंप आणि ७.५ एच.पी. सौर कृषी पंप देय राहिल.
- दुर्गम भागातील शेतकऱ्यांना प्राधान्य.
- अद्याप विद्युतीकरण न झालेल्या गावातील शेतकरी किवा वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसलेले शेतकरी.
- धडक सिंचन योजने अंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी.
- महावितरण कंपनीकडे विद्युत कनेक्शनसाठी पैसे भरूनही प्रलंबित असलेले शेतकरी.
मुख्यंमत्री सौर कृषी पंप योजना ७.५ एच.पी.सोलर पंप लाभार्थी पात्रता
- विहीर किंवा कुपनलिका यया दोघांपैकी एक जलस्त्रोत असणे आवश्यक आहे.
- आधुनिक भूजल अंदाज अहवालानुसार अतिशोषित, शोषित आणि अंशत शोषित गावांमधील विहिरीमध्ये व कुपनलिकां वर सौर पंप अनुज्ञेय असणार नाही.
- आधुनिक भूजल अहवालानुसार ज्या सुरक्षित पाणलोट क्षेत्रांची उपसा करण्यची स्थिती ६० % पेक्षा कमी आहे अशा क्षेत्रातील गावामधील विहिरी व कुपनलिकांसाठी नवीन सौर पंप देण्यात येतील.
- खडकाळ क्षेत्रांमध्ये खोदल्या जाणाऱ्या बोअरवेल, विहिरी हे सिंचनाचे शाश्वत साधन नसल्याने अशा बोअरवेल, विहिरींमध्ये नवीन सौर पंप देणे अनुज्ञेय असणार नाही. गाळाच्या क्षेत्रामध्ये खोदलेल्या कुपनलिका हे शाश्वत सिंचनाचे साधन असल्यामुळे या कुपनलिकांमध्ये नवीन सौर पंप देण्यात येतील.
- कोणत्याही क्षेत्रातील ६०मीटरपेक्षा खोल असलेल्या विहिरींमध्ये किंवा कुपनलीकेमध्ये नवीन सौर पंप देण्यात येणार नाही.
मुख्यंमत्री सौर कृषी पंप योजना आवश्यक कागदपत्रे
या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी निकषानुसार पात्र शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज करणे आवश्यक आहे, अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्र पुढील प्रमाणे.
- अर्जदाराचे आधार कार्ड
- मुल निवासाचे प्रमाणपत्र
- शेतीचे कागदपत्र
- ७/12 उतारा व ८ अ (खाते उतारा)
- बँक पासबुक झेरोक्स / कॅन्सल चेक
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईझ फोटो
- विहीर अथवा शेती सामाईक असल्यास भागीदाराचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक
- कुपनलिका शेतात असल्यास त्याची नोंद ७/१२ उताऱ्यावर असणे आवश्यक.
मुख्यंमत्री सौर कृषी पंप योजना अर्ज प्रक्रिया
सदर योजनेसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारणे सध्य स्थितीत बंद आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज करण्यासाठी
१. ऑनलाईन https://www.mahadiscom.in/solar/index.html या वेबसाईट वर जाऊन अर्ज करणे आवश्यक आहे.
२. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महावितरणच्या अधिकृत वेबसाईट भेट द्यावी लागेल.
३. त्यानंतर होम पेज उघडेल या होमे पेज वर Beneficiary Services या पर्यायावर क्लिक करा.
४. पुढे Apply Online या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर New Consumer या पर्यायावर क्लिक करा.
५. नवीन अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली माहिती भरायची आहे.
६. Paid Pending AG Connection Consumer Details- शेतकऱ्याने जर विद्युत कनेक्शनसाठी पैसे भरून अद्यापही वीज जोडणी झाली नसे तर त्या विषयी माहिती भरावी.
७. Details of Applicant And Location – अर्जदाराने आधार कार्ड प्रमाणे संपूर्ण माहिती आणि जागेचा तपशील भरावा
Nearest MSEDCL Consumer Number – ज्या शेतजमिनीवर सौर पंप बसविण्याचा आहे त्या शेतीबद्दल संपूर्ण माहिती भरावी लागेल. तसेच तुम्हाला जवळचा महावितरण ग्राहक क्रमांक द्यावा लागेल.
८. Details Of Applicant Residential Address And Location – नंतर तुम्हाला तुमच्या घराचा संपूर्ण पत्ता आणि पंप आस्थापित करण्याच्या ठिकाणाबद्दल माहिती भरावी लागेल.
९. यानंतर अर्जामध्ये मागितलेले सर्व कागदपत्रे तुम्हाला अपलोड करावी लागेल, त्यानंतर संपूर्ण माहिती भरल्यानंतर पुन्हा एकदा संपूर्ण पडताळणी करून घ्या.
यानंतर सबमिट बटनावर क्लिक करून अर्ज सबमिट करा, या प्रकारे तुमची योजनेमध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
सौर कृषी पंप मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी
सौर कृषी पंप मिळाल्यानंतर लाभार्थ्याना त्याची विक्री करता येणार नाही.
विक्री केल्याचे निदर्शनास आल्यास त्या लाभार्थ्यावर गुन्हा नोंदविण्यात येईल. सौर कृषी पंप मिळाल्यानंतर त्याची विक्री केल्यास किंवा असे आढळून आल्यास सदर लाभार्थ्यास पुन्हा राज्य शासन तसेच केंद्र शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेता येणार नाही.
Join our Whats app Group Click Here
FAQ : Mukhyamantri Solar Krushi Pump Yojana 2023
Q. सोलर पंपावर किती अनुदान मिळते ?
मुख्यमंत्री सौर कृषी योजने अंतर्गत सोलर पंपावर ९५ % अनुदान मिळते.
Q. मुख्यंमत्री सौर कृषी पंप योजना २०२३ कोणत्या राज्यासाठी आहे ?
मुख्यंमत्री सौर कृषी पंप योजना २०२३ ही योजना महाराष्ट्र सरकार कडून सुरु करण्यात आली असल्यामुळे फक्त महाराष्ट्रासाठी आहे.
Q. Mukhyamantri Solar Pump Yojana 2023 Registration ?
मुख्यंमत्री सौर कृषी पंप योजना २०२३ सोलर पंप योजनेचे रजिस्ट्रेशन अजून सुरू झालेले नाही.