MSEDCL Junior Assistant (Account) Recruitment : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत ४६८ कनिष्ठ सहाय्यक (लेखा) पदाच्या भरतीसाठी महावितरण कडून अधिकृतपणे सूचना प्रसिद्ध झाली आहे. ऑनलाइन अर्जासाठी लिंक उपलब्ध झाली असून इच्छुक उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात.
MSEDCL Junior Assistant (Account) Recruitment कनिष्ठ सहाय्यक भरती २०२४
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या. ने कनिष्ठ सहाय्यक (लेखा) या पदासाठी ४६८ रिक्त जागा जाहीर करून २०२४ सालासाठी अधिकृत भरती जाहीर केली आहे व त्याची सूचना देखील महावितरणच्या अधिकृत साईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरात क्रमांक Advertisement No. 05/2023 तुम्ही महावितरणच्या ऑफिशियल साईट वर उपलब्ध आहे.
जाहिरात क्रमांक : ०५/२०२३
पद : कनिष्ठ सहाय्यक (लेखा)
पात्रता : १. बी.कॉम /बी.एम.एस./बी.बी.ए. २. एम एस सी आय टी किंवा समतुल्य
वय : २९ डिसेंबर २०२४ रोजी ३० वर्षापर्यंत
नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र
वेतन श्रेणी : ३
फी : खुला प्रवर्ग ५००/- , मागासवर्गीय २५०/-
अर्ज सुरू झाल्याची तारीख : १ मार्च २०२४
अर्जाची शेवटची तारीख : २० जून २०२४
कनिष्ठ सहाय्यक भरती २०२४ रिक्त जागा
महावितरण अंतर्गत कनिष्ठ सहाय्यक लेखा पदासाठी एकूण ४६८ रिक्त जागा जाहीर केल्या आहेत त्यांचा तपशील पुढील प्रमाणे.
आरक्षण | जागा |
---|---|
सामान्य (OPEN) | १०२ |
अनुसूचित जाती (SC) | ७२ |
अनुसूचित जमाती (ST) | ४७ |
विमुक्त जाती/ अ – अधिसुचित जमाती | १४ |
भटक्या जमाती – ब (NT – B) | ७ |
भटक्या जमाती – क (NT – C) | १८ |
भटक्या जमाती – ड (NT – D) | १७ |
विशेष मागासवर्गीय (SBC) | ४ |
इतर मागासवर्गीय (OBC) | ११६ |
आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभाग (EWS) | ७१ |
एकूण | ४६८ |
आरक्षण तपशिलाची पाडताळणी करण्यासाठी जाहिरात वाचा.
पात्रता
MSEDCL Junior Assistant (Account) कनिष्ठ सहाय्यक (लेखा) पात्रता निकष पुढीलप्रमाणे.
शैक्षणिक पात्रता
१) उमेदवाराकडे वाणिज्य शाखेची पदवी B.com./बिझनेस मॅनेजमेंट स्टडी BMS / सह व्यवसाय प्रशासन BBA पुढीलपैकी एक पदवी प्राप्त केलेली असावी
२) MSCIT / एम एस सी आय टी प्रमाणपत्र नसल्यास तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीचे मान्यता प्राप्त प्रमाणपत्र किंवा टॅली द्वारे केलेले प्रमाणपत्र प्रदान करू शकता.
वय
उमेदवाराचे वय हे वय वर्ष १८ कमी नसावे आणि वय वर्ष ३५ पेक्षा जास्त नसावे.
मागासवर्गीय | ५ वर्ष |
माजी सैनिक | ५ वर्ष |
गुणवंत क्रीडापटू | ५ वर्ष |
अपंग | १५ वर्ष |
अनाथ | १५ वर्ष |
राखीव श्रेणी | ५ वर्ष |
मानधन
मानधन: क्र. वर्षाची रक्कम (रु.) प्रति महिना १ ले वर्ष १९,०००/- २ दुसरे वर्ष २०,०००/- ३ रे वर्ष २१,०००/-
टीप १. कॉमर्स/फायनान्समधील पदव्युत्तर पदवीधारकांना अतिरिक्त मोबदला दिला जाईल रु. १०००/- दरमहा कराराच्या कालावधीत.
टीप २. निवडलेले उमेदवार CPF आणि ग्रॅच्युइटी आणि इतर भत्ते यासाठी पात्र आहेत पासून सुधारित कंपनीच्या प्रचलित नियमांनुसार त्यांना लागू होईल वेळोवेळी.
टीप ३. CPF साठी कंपनीचे योगदान वैयक्तिक CPF मध्ये जमा केले जाईल करार कालावधी दरम्यान खाते आणि कुटुंब निवृत्ती वेतन निधी योगदान प्रशिक्षणार्थींना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयात नुसार जमा केले जातील नियम.
टीप ४. जर विभागीय उमेदवार (म्हणजे MSEDCL कर्मचारी) करारा व्यतिरिक्त कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासाठी अर्ज केला आणि निवडले, त्यांचे सध्याचे वेतन आणि इतर सेवा परिस्थिती संरक्षित केली जाईल.
टीप ५. कराराचा कालावधी यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना त्यात सामावून घेतले जाईल मध्ये कंपनीच्या नियमांनुसार लोअर डिव्हिजन क्लर्क (लेखा) चे नियमित पद वेतनश्रेणी रु. २९०३५-७१०-३२५८५-९५५-४२१३५-१०६०-७२८७५.
अर्जाची श्रेणी आणि शुल्क
- सामान्य ५००/-
- मागासवर्गीय २५०/-
उमेदवार डेबिट, क्रेडिट, कार्डद्वारे तसेच इंटरनेट बँकिंग, यूपीआय किंवा स्कॅनर द्वारे शुल्क भरू शकतात, शुल्क भरण्याची अंतिम अर्जाप्रमाणे तारीख 20 मार्च 2024 आहे.
कनिष्ठ सहाय्यक (लेखा) अर्ज
- महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या. च्या ऑफिशियल वेबसाईटवर जा.
- होम पेजवर करियर पर्यायावर क्लिक करा.
- Apply online पर्यायावर क्लिक करून Recruitment of Junior Assistant (Accounts) 2024
- महावितरण ने प्रकाशित केलेली संपूर्ण जाहिरात वाचून घ्या.
- अर्ज भरण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करून रजिस्ट्रेशन करून घ्या.
- रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमची माहिती आणि शैक्षणिक माहिती तसेच इतर माहिती आणि फोटो स्वाक्षरी अपलोड करा.
- माहिती भरून झाल्यानंतर फी भरून फॉर्म सबमिट करा.
कनिष्ठ सहाय्यक (लेखा) महत्त्वाच्या लिंक
महावितरण अधिकृत वेबसाईट क्लिक करा.
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा.
ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी क्लिक करा.
शुद्धीपत्रक क्लिक करा.
असेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे पेज कोकण कल्चर ला फॉलो करा