Marathi Kavita Maitri : मनुष्य प्राणी म्हणून आपण दिवसरात्र कष्ट करतो, मेहनत करतो, अनेक संकटांना तोंड देतो, परिस्थितीशी लढा देतो. अनेकदा आपण दुख झेलतो तर कधी आपण सुख त्यागतो. हे सर्व करताना आपण बर्याच गोष्टी विसरतो. पण अशी एक गोष्ट आहे की ती कधीही विसरता येत नाही ती म्हणजे मैत्री. कॉलेज जीवन संपले की जो तो नोकरीच्या शोधत लागतो, मेहनत करून स्वताचे विश्व तयार करतो पण आपल्या मित्रांशिवाय त्याला हे विश्व अपुरे वाटू लागते. त्याला आपल्या मित्रांची माफी मागावीशी वाटते, भावना दाटून येतात, नयनी अश्रु वाहू लागतात आणि शेवटी शब्दांचा बांद फुटतो. कवितेचे नाव आहे मी विसरलो नाही कुणाला…..
Marathi Kavita Maitri
मी विसरलो नाही कुणाला Marathi Kavita Maitri
मी विसरलो नाही कुणाला
कधी वेळ देऊ शकलो नाही
तर स्वार्थी नका समजू या मित्राला…
या लहानश्या जीवनात
अडचणी खूप आहेत
या जगात माझे छान छान मित्र आहेत
मित्रांनो फक्त जरा गुंतलो आहे…
सुखाच्या शोधात.
मी विसरलो नाही कुणाला!
या धकाधकीच्या जीवनात
दिवस कसा काय निघून जातो
काहीच कळत नाही
मित्रांनो मी जरा भरकटलो आहे…..
या गुंतागुंतीच्या जगात.
मी विसरलो नाही कुणाला!
हल्ली एकांतात असताना
जुने दिवस आठवतो
मनातल्या मनात मग खूप रडतो
पुन्हा ते कॉलेजचे दिवस जगता येतील का…..
या भरकटलेल्या मनात.
मी विसरलो नाही कुणाला!
कवि :- मनिष महादेव जोशी.
हे देखील वाचा – प्रेमाच्या कविता