Premachya Kavita : आपली प्रिय व्यक्ति आपल्यापासून लांब असली तरी आपल्या मनात तिच्या आठवणी कायम रेंगाळत असतात. अश्याच आठवणीत रेंगाळणार्या प्रियकराला जेव्हा आपल्या प्रेयसीची आठवण येते तेव्हा. प्रियकर पुढील कवितेच्या जाळ्यात गुंतत जातो आणि अलगत त्याच्या हृदयात पुढील शब्द उमटतात. कवितेचे नाव आहे हरवलीस तू तुझ्याच दुनियेत…..

Premachya Kavita : हरवलीस तू तुझ्याच दुनियेत
हरवलीस तू तुझ्याच दुनियेत Premachya Kavita
हरवलीस तू तुझ्याच दुनियेत
कधी तरी माझी आठवण काढत जा
विसरू नकोस या प्रियकराला
तुझ्या हृदयात माझे घर बांधीत जा
मोरपिसांचा फुलोरा फुलवूनी
पुन्हा एकदा मयूरापरी नाचून जा
जे प्रेम गीत गायले होते दोघांनी
त्या गीतांना सप्तसुर तू देऊनी जा
हरवलीस तू तुझ्याच दुनियेत
कधी तरी माझी आठवण काढत जा
विसरू नकोस या प्रियकराला
तुझ्या हृदयात माझे घर बांधीत जा
फूल पाखरांचा रंग मनोहारी
माझ्या या जिवनी तू रंगउनी जा
भंगलेले आयुष्य माझे
त्यात प्रेमाचा सुगंध तू देऊनि जा
हरवलीस तू तुझ्याच दुनियेत
कधी तरी माझी आठवण काढत जा
विसरू नकोस या प्रियकराला
तुझ्या हृदयात माझे घर बांधीत जा
फुलउनी पिसारा मयूरा परी मी
तू पावसाची रिमझिम धार बनून जा
तुझेच वेड लागले या जीवाला
एकदा तरी मला तू भेटून जा…..
कवि : मनिष महादेव जोशी.
हे देखील वाचा – कोकण कल्चर