Lek Ladki Yojana

Lek Ladki Yojana : केंद्र शासन तसेच राज्य शासन राज्यातील जनतेसाठी विविध महत्त्वकांक्षी योजना राबवीत असते. कष्टकरी शेतकरी, महिला वर्ग, विद्यार्थी विद्यार्थिनी, प्रौढ इत्यादींसाठी वेगवेगळ्या योजना वेळोवेळी शासन हाती घेत असते. अशाच प्रकारची महत्त्वकांक्षी लेक लाडकी योजना ही महाराष्ट्र शासनाने राज्यात राबविण्यास सुरुवात केली आहे.

राज्य सरकारने मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजनेची घोषणा केली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लेक लाडकी योजेनेचा शुभारंभ करण्यात आला. गरीब मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या मुलींना या योजनेचा लाभ होणार आहे. मुलींच्या जन्मापासून ते तिचे शिक्षण पूर्ण होई पर्यंत वेग वेगळ्या पाच टप्प्यांत ही रक्कम मुलीला दिली जाईल.

Lek Ladki Yojana
Lek Ladki Yojana

ही योजना राबविण्यामागचा मुख्य उद्देश अनेक ठिकाणी मुलींचे शिक्षण हे पैशाअभावी थांबवले जाते, वय वर्ष १८ अगोदरच लग्न लावून देणे. अशा गोष्टींवर मात करण्यासाठी राज्य शासनाने लेक लाडकी योजना हाती घेतली आहे. राज्यातील पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

सदर योजने नुसार मुलीचा जन्म झाल्यावर ५ हजार रुपये. शाळेत जाऊ लागल्यानंतर ४ हजार रुपये, मुलगी इयत्ता सहावी मध्ये गेल्यानंतर ६ हजार रुपये, इयत्ता अकरावी मध्ये गेल्यानंतर ८ हजार रुपये तसेच मुलीचे वय वर्ष १८ पूर्ण झाल्यानंतर राज्य शासनाकडून ७५ हजार रुपयांची मदत दिली जाईल. अशाप्रकारे लाभार्थी मुलीला एकूण १,०१,०००/- रुपयांची मदत मिळेल.

हे देखील वाचा – बिमा सखी योजना

Lek Ladki Yojana योजनेची थोडक्यात माहिती

लेक लाडकी योजना कोणाला मिळणार लाभ

१. एप्रिल २०२३ किंवा त्यानंतर जन्माला आलेल्या एक किंवा दोन मुलींसाठी ही योजना लागू असेल.

२. कुटुंबातील मुलीला या योजनेचा फायदा मिळेल.

३. दुसऱ्या अपत्याच्या प्रसुती दरम्यान एक मुलगी किंवा दोन्ही मुलींचा जन्म झाल्यास त्यांनाही या योजनेचा फायदा मिळेल मात्र त्यानंतर मुलीच्या आई-वडिलांपैकी एकाने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेणे बंधनकारक राहील.

४. पहिल्या मुलीच्या तिसऱ्या हप्त्यासाठी आणि दुसऱ्या मुलीच्या दुसऱ्या हप्त्यासाठी या योजनेचा अर्ज भरताना आई किंवा वडिलांनी कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

५. सदर योजना ही महाराष्ट्रातील रहिवाशांसाठीच फक्त लागू आहे.

६. सदर योजनेसाठी लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे एक लाखांपेक्षा जास्त नसावे.

आवश्यक कागदपत्रे

१. कुटुंब प्रमुखाचे उत्पन्न प्रमाणपत्र / उत्पन्न दाखला.

२. लाभार्थी मुलीचा जन्म दाखला

३. लाभार्थी मुलीचे आधार कार्ड ( पहिल्यांदा योजनेचा लाभ घेताना ही अट लागू नसेल)

४. पालकांचे आधार कार्ड

५. बँक पासबुक

६. पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड

७. अनुक्रमे दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या हप्त्यासाठी शिक्षण घेत असल्याचे प्रमाणपत्र / दाखला.

८. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र

९. शेवटचा हप्ता घेताना मुलीचे लग्न झालेले नसावे.

महत्वाच्या लिंक

लेक लाडकी योजना अर्ज डाउनलोड करा.

अर्ज कुठे करायचा

तुमच्या परिसरातील अंगणवाडी सेविकेकडे तुम्हाला लेक लाडकी योजनेसाठी अर्ज करावा लागेल वर दिलेला अर्जाचा नमुना त्यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती, पत्ता, मोबाईल क्रमांक, कौटुंबिक माहिती, बँक खात्याची माहिती, योजनेचा टप्पा / कोणत्या टप्प्याच्या लाभासाठी अर्ज करत आहोत त्याची माहिती, तारीख, ठिकाण संपूर्ण माहिती भरून सही करून विचारलेली कागदपत्रे जोडून सदर अंगणवाडी सेविकेकडे अर्ज करावा.

या योजने संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी लेक लाडकी योजना शासन निर्णय जरूर वाचा.

Lek Ladki Yojana | Lek ladki yojana marathi Mahiti | Lek ladki yojana in marathi | लेक लाडकी योजना

हे देखील वाचा – इतर योजना , महिला व बालकल्याण विकास विभाग

असे योजनांचे महत्वाचे अपडेट मिळवण्याकरिता फॉलो करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

o
Scroll to Top