PM Kisan Nidhi : शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येऊ शकतो १९ वा हप्ता

PM Kisan Nidhi

PM Kisan Nidhi : पी एम किसान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळण्याची व्यवस्था केंद्र / राज्य शासनामार्फत केली गेली आहे. PM Kisan योजनेचे पैसे हे २-२ हजार रुपयांच्या तीन टप्प्यांमध्ये दिले जातात. भारत सरकार द्वारे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये देण्याची तरतूद करण्यात आली आहे या योजनेमार्फत पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो.

PM Kisan Nidhi
PM Kisan Nidhi

आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे त्या शेतकऱ्यांना १८ हप्ते मिळाले आहेत आणि १९ वा हप्ता मिळणार आहे. जर तुम्ही पी एम किसान योजनेसाठी पात्र आहात. पण १९ वा हप्ता मिळवण्यासाठी कोणती कामे करणे जरुरी आहे. ते आपण पाहू.

PM Kisan Nidhi – DBT

जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहात तर तुम्हाला बँक खात्यात (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) डीबीटी द्वारे शासनामार्फत डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे दिले जातात. अशात जर बँक डीबीटी पर्याय चालू नसेल तर सदर हप्ता येण्यास अडचण येऊ शकते.

PM Kisan Nidhi
PM Kisan Nidhi

PM Kisan Nidhi – e KYC

तसेच इ केवायसी देखील महत्त्वाची बाब आहे. जर तुमच्या खात्याची इ केवायसी झाली नसेल, तर त्वरित करून घ्या. केवायसी तुम्ही ऑनलाईन देखील करू शकता यासाठी पीएम किसान पोर्टल वर जाऊन इ केवायसी पर्याय निवडून मोबाईल द्वारे केवायसी पूर्ण करू शकता. तसेच ऑफलाईन केवायसी देखील तुम्ही करू शकता यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या सीएससी सेंटरला जाऊन केवायसी करून घ्यावी लागेल.

PM Kisan Nidhi
PM Kisan Nidhi

तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल आणि केवायसी झाली नसेल तर शेतकरी असून देखील तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही त्यामुळे केवायसी जर बाकी असेल तर लवकर लवकर करून घ्या. तुम्ही घरबसल्या देखील केवायसी करू शकता मोबाईल वरून पीएम किसान या वेबसाईटवर जाऊन इ केवायसी पर्यावर क्लिक करून आधार नंबर आणि मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून तुम्ही घरबसल्या eKYC करू शकता

सदर योजनेचा १७ वा हप्ता माहे जून मध्ये तर १८ वा हप्ता हा ऑक्टोबर मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता.

पी एम किसान पोर्टल येथे क्लिक करा.

हे देखील वाचा – शेतकऱ्यांसाठी विहीर अनुदान योजना संपूर्ण माहिती. | प्रधानमंत्री सुर्योदय योजना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

o