Kokan Yuva Seva Sanstha : Kokan Sundari 2025, कोकण युवा सेवा संस्था आयोजित विविध कार्यक्रम तसेच कोण होणार….. कोकण सुंदरी महा अंतिम फेरी २०२५ मिनी कोकण नगरीत म्हणजेच भांडुप मध्ये पार पडले.
कार्यक्रमाची सुरुवात गणरायाच्या आराधनेने करून, नटराज, छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून गाऱ्हाणे घालून, नारळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात केली कोकण युवा सेवा संस्थेच्या कार्यक्रमास भांडुप चे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व मा. बणे शेठ (शिक्षक) शिक्षण क्षेत्रातील नावाजलेले नाव यांसह मा. गणेशजी जाधव (सामाजिक कार्यकर्ता), मा. नंदु परब (पखवाज वादक), साक्षी सावंत (स्त्री शक्ती), हेमालता लक्ष्मण मेस्त्री (स्त्री शक्ती), श्रावणी मिलिंद पारकर, सीतारामजी गावडे, राजेंद्र सातार्डेकर -राजू दादा इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यांचा सत्कार सन्मान करण्यात आला.
मा. गणेशजी जाधव, मा. बणे शेठ यांनी आपले मनोगत व्यक्त करत कोकण युवा सेवा संस्थेच्या कार्यकर्त्यांना तसेच तमाम रसिकांना संबोधित केले.
Kokan Yuva Seva Sanstha
कोण होणार….. कोकण सुंदरी महाअंतिम फेरी २०२५ कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून – श्रिया चव्हाण, स्मिता निकेतन धुमाळ यांनी कार्यभाळ संभाळला.
महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या शिरीषजी सावंत, वैष्णवी ताई, अनिलजी राजभोग, साक्षी नाईक, कविता राणे, संदीप निवळकर या मनसे पदाधिकाऱ्यांनी देखील कार्यक्रमाला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
मा. अभिजित कोटकर, संस्थापक अध्यक्ष कोकण युवा सेवा संस्था यांनी कोकण युवा सेवा संस्थे बद्दल थोडक्यात माहिती देत संस्थे मार्फत केली जाणारी कामे, संस्था सुरू करण्यामागे नेमका उद्देश काय हे सांगितले. कोकणी बांधवांसाठी चालू केलेला हा मंच यास तीन वर्ष पूर्ण होत असून, संस्थेने जिव्हाळा नामक वृद्धाश्रम बदलापूर येथे सुरू केले असून या कार्यात कोकणवासीयांना तसेच उपस्थित मान्यवरांना सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन करण्यात आले.
कोकण युवा सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत कोटकर, सचिव श्री.अनिल गावडे, उद्योजक लॉबी प्रमुख श्री. रुपेश कोलते, खजिनदार सौ. संजना बेंद्रे आणि सर्व सदस्यांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात मोलाचे योगदान दिले.
ध्यास समृद्ध कोकणचा हे ब्रीद वाक्य घेऊन कोकण सुंदरी स्पर्धा २०२५ चालू झाली. स्पर्धकांना कोकणाशी निगडित विविध प्रकारचे प्रश्न विचारले गेले. स्पर्धकांचा आत्मविश्वास वाखाणण्याजोगा होता.
कोकण युवा सेवा संस्थे मार्फत उद्योजक लॉबीचे अनावरण करून, लॉबी मागील विचारधारणा या बाबत माहिती दिली. मा. रुपेश कोलते उद्योजक लॉबी प्रमुख यांनी कोकण युवा सेवा संस्थे बद्दल माहिती देताना उद्योजक लॉबी कशा प्रकारे काम करणार, त्यामागील उद्देश आणि व्यवसाय वृद्धी बाबत माहिती दिली. सोबत प्रत्येक असंघटित उद्योजकांना एकमेकांसोबत मिळून मिसळून एकत्र येऊन व्यवसाय वृद्धी करण्यासाठी उद्योजक लॉबी सारखा मंच कोकण युवा सेवा संस्थेमार्फत उपलब्ध करून देण्यात आला आहे.
हे देखील वाचा – उद्योजक लॉबी संपूर्ण माहिती
निर्विक गणेश वागळे या बाल कलाकाराने छत्रपती शिवाजी महाराजांची मानवंदना साजरी केली. संस्कार संस्कार म्हणजे नक्की काय ते ह्या बालकलाकारात पहायला मिळाले.
हौशी कलाकार ओढ परंपरेची ह्यांच्या मार्फत गण, गवळण, गोंधळ, झाकडी नृत्याच्या संगतीत पुन्हा एकदा कलाकारांद्वारे कोकण डोळ्यासमोर उभा केला गेला. पायात घुंगर, हातात रुमाल, संपूर्ण शरीराने घेतलेला ताल, सुबक नृत्य योजना सर्व काही डोळ्याचे पारणे फेडून टाकणारे होते.
कोकण युवा सेवा संस्थेच्या वेब साईटचे अनावरण केले गेले. रक्तदान, क्रीडा, शिक्षण, महिला संरक्षण, गडकिल्ले संवर्धन, कोकणी बांधवांना एकत्र आणणे, व्यवसाय निर्मिती करून देणे, उद्योजक लॉबी उभारणे, पर्यावरण पूरक व्यवसायांना प्राधान्य देणे, अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करणे, विविध कार्यक्षेत्रात कोकण युवा सेवा संस्था सध्या कार्यरत आहे.
धीरज कदम, मनिष जोशी, परेशजी, रातेशजी, दीपिका भोसले, सुप्रियाताई, दीपिका भोसले, अनघा खांडेकर, सचिन खांडेकर, साई फाउंडेशन विविध कार्यक्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
कोकण युवा सेवा संस्था वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
नवरंग कलामंच भांडुप यांनी फॉरेनची परबीण ह्या नाट्याचे सादरीकरण केले.
कोकण युवा सेवा संस्था आयोजित कोकण सुंदरी २०२५ यामध्ये महिलांनी तसेच भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यापैकी फायनल मध्ये प्रीती वसंत मोरजकर, सायली सलील मांजरेकर, कस्तुरी तानाजी देसाई, नीता नितीन नवले, प्रियांजली पांढुरंग कुरुप, काव्या नितीन देसाई, अंतरा बागवे इत्यादी सौंदर्यवतींनी यांनी बाजी मारली. यापैकी कस्तुरी तानाजी देसाई या सौंदर्यवतीने Kokan Sundari 2025 च्या ताजवर नाव कोरले.
कोकण युवा सेवा संस्थेचा हा पहिलाच कार्यक्रम कोकण नगरी भांडुप मध्ये अतिशय नियोजनबद्ध यशस्वीरित्या पार पडला संपूर्ण वातावरण हे कोकणमय झाले होते. या कामी संस्थेचे सर्व पदाधिकारी, सभासद आणि भांडुपच्या जनतेचे मोलाचे योगदान लाभले.